Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !
    राजकारण

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    editor deskBy editor deskFebruary 24, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सहा महिने उलटूनही प्रशासकीय स्तरावर कार्यपद्धती (SOP) अद्याप निश्चित झालेली नाही, अशी कबुली सरकारने २० फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशातून दिली आहे.

    सरकारच्या या कबुलीमुळे प्रशासकीय यंत्रणेतील ढिसाळ कारभार आणि आरक्षणाबाबतची उदासीनता उघड झाली आहे. SOP नसल्यामुळे अर्ज कमी येत आहेत आणि प्रमाणपत्र वाटपही संथ गतीने होत आहे.

    यावर उपाय म्हणून छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कोणती कागदपत्रे ग्राह्य धरावीत आणि पात्रता कशी ठरवावी, याची सविस्तर SOP तयार करणार आहे. SOP तयार झाल्यानंतर ती राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली जाईल आणि त्यानंतरच प्रमाणपत्र वाटपाला वेग येण्याची शक्यता आहे, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी स्पष्ट केले.

    डिसेंबर २०२५ मध्ये समोर आलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतून तीन महिन्यांत फक्त ५९४ अर्ज आले, त्यापैकी फक्त ९८ जणांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले. या आकडेवारीवरून मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

    सहा महिन्यांच्या दिरंगाईनंतर आता राजकीय व सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा आरक्षणासंदर्भातील मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रशासकीय दिरंगाईवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.