अमळनेर : प्रतिनिधी शहरातील पिंपळे रस्त्यावर भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकत साडेपाच लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना बुधवार (दि. २५) रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाजार समितीचे व्यापारी यतीन कोठारी हे आपल्या स्कुटीवरून पिंपळे रस्त्यावरील लामा जीनकडे जात होते. त्यावेळी तोंडाला मास्क लावलेले तीन संशयित मोटरसायकलस्वार त्यांच्या जवळ आले. संशयितांनी प्रथम कोठारी यांचा चष्मा काढून फेकला आणि तत्काळ त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कोठारी गोंधळून गेले. याच वेळी त्यांच्या जवळील साडेपाच लाख रुपयांची रोकड…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील नवीपेठ परिसरात भरदिवसा धाडसी चोरीची घटना घडली असून, बँकेतून काढलेले तब्बल १० लाख रुपयांपैकी ८ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. ही घटना बुधवारी (२५ रोजी) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुन्या बसस्थानकासमोरील गल्लीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मजुरांना वेतन देण्यासाठी मक्तेदार मयुर रवींद्र चौधरी यांनी त्यांचे सुपरवायझर प्रेम महारू जाधव यांना बँकेतून १० लाख रुपये काढण्यास सांगितले होते. जाधव यांनी रक्कम काढून ती दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि निघाले. मात्र काही अंतरावरच दुचाकी पंक्चर झाली. त्यामुळे त्यांनी जवळील पंक्चर दुकानासमोर गाडी लावली. पंक्चर काढण्याचे काम सुरू असताना जाधव समोरील नाश्त्याच्या दुकानात गेले. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दुचाकीच्या…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील सालबर्डी येथे ट्रॅक्टरच्या चाकाखाली दबून २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ रोजी सकाळी घडली. सालबर्डी येथील सर्वेश प्रकाश (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. ते सालबर्डी शिवारातील योगेश लक्ष्मण झोपे यांच्या शेतात शेतीकामासाठी गेले असताना अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरच्या मागील चाकाखाली आल्याने सर्वेश यांचा जागीच गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेनंतर जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टरखालून त्यांना बाहेर काढण्यात आले तत्काळ त्यांना मुक्ताईनगर जिल्हा उप रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार नोंदविण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक संदीप वानखेडे पुढील तपास…
आजचे राशिभविष्य दि.२६ फेब्रुवारी २०२६ मेष राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत निवांत वेळ घालवण्याचा प्रयत्न कराल. घरातील वातावरण आनंददायी राहील. लहान मुलांना मोठे आश्चर्य मिळू शकते. ऑफीसच्या कामात काही लोकं मदत करू शकतात. तुमच्या आर्थिक समस्या सुटतील. आज तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करण्याचा विचार कराल. तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल थोडे काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ राशी आजचा दिवस प्रवासात जाऊ शकतो. ही सहल कामाच्या ठिकाणी काही कामाशी संबंधित असू शकते. तुम्ही थोड्या मौजमजेच्या मूडमध्ये असाल आणि तुमचे मन आनंदी असेल. तुम्ही एखाद्या पारंपारिक गोष्टीकडे आकर्षित होऊ शकता. आज तुम्ही तुमच्या बालपणीच्या मित्राला भेटाल आणि काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. तुमच्या दैनंदिन…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी मतदान 16 मार्च रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे सहा दिवस उरल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी उमेदवार ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि सुमारे 12 प्रमुख नेते उपस्थित होते. भाजपकडून गेल्या काही दिवसांपासून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी चर्चा जोरात होती. तसेच विजया रहाटकर यांचे नावही जवळपास निश्चित समजले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांची नावे देखील…
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत सरकारने विलंब केल्याने नाराजी व्यक्त करत, मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी जून महिन्यात पुन्हा उपोषणाचा इशारा दिला आहे. जर विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द झाले किंवा आरक्षणाचा लाभ मिळाला नाही, तर कोणत्याही विनंतीकडे सरकारकडून लक्ष दिले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी संबंधित मंत्र्यांकडे परिस्थितीची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी केली आहे. हैदराबाद गॅझेटीयरच्या आधारे राज्य सरकारने अखेर नवीन समिती स्थापन केली असून, ही समिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली काम करणार आहे. समिती मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक निकष, कागदपत्रे, पडताळणी प्रक्रिया यांची आखणी करेल आणि अहवाल राज्य सरकारकडे…
रावेर : प्रतिनिधी बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्यांना अडवून ८ लाख रुपये लुटणाऱ्या टोळीचा रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ७ संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. बऱ्हाणपूर येथील मसाला व्यापारी दीपक सुरेश धर्मानी यांनी ६ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांचे कर्मचारी गौरव वाघ आणि तौफिक तेली यांना सावदा, फैजपूर आणि रावेर भागात वसुलीसाठी पाठवले होते. रात्री सुमारे ९ वाजता खानापूर आरटीओ बॅरेलजवळ ८ ते ९ इसमांनी त्यांच्या दुचाकीला अडवून पैशांची बॅग हिसकावून नेली. या प्रकरणी…
मालेगाव : वृत्तसंस्था मालेगाव महानगरपालिकेच्या विद्युत विभागाच्या कार्यालयात नागरिकांनी सामूहिक नमाज अदा केल्याची घटना समोर आली असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे शहरात तसेच राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांनी त्यांच्या प्रभागात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याबाबत महापालिकेकडे निवेदन दिले होते. मात्र, समस्येची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत त्या प्रभागातील नागरिकांनी थेट महापालिकेच्या विद्युत विभागात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, अधिकाऱ्यांनी दुपारी तीन वाजता बैठकीसाठी बोलावले होते. वीज समस्येवर चर्चा करण्यासाठी संबंधित अधिकारी उपस्थित राहतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अधिकारी बैठकीला अनुपस्थित राहिल्याचा आरोप आंदोलकांनी…
मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे पदाधिकारी तुषार दामगुडे आणि काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यात सोमवारी झालेल्या वादाचा पडसाद मंगळवारी राजकीय वर्तुळात जाणवला. सोमवारी दोघेही एका मराठी वृत्तवाहिनीवर राजकीय चर्चासत्रात सहभागी झाले होते. परत येताना दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हनुमंत पवार यांना मारहाणी केली. दामगुडेंनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना आपल्याला या कृत्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, हनुमंत पवार यांनी पूर्वी धमकी दिली होती तसेच चर्चासत्रात जातिवाचक शिवीगाळही केली होती. त्यामुळे मी त्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर दिले, असे त्यांनी सांगितले. दामगुडेंनी आणखी सांगितले की, हनुमंत पवार ज्या विचारसरणीतून येतात, त्यांना ठोस प्रत्युत्तर देणे आवश्यक होते. चर्चासत्रात पवारांनी त्यांना उद्देशून “तू…
बारामती : वृत्तसंस्था अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून १ जानेवारी २०२६ पर्यंत नाव नोंदविलेल्या मतदारांना मतदानाचा अधिकार असणार आहे. १० मार्च रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार असून त्यानंतर निवडणुकीची अधिकृत घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या बारामतीतून उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचे समजते. ही निवडणूक शक्यतो बिनविरोध व्हावी, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रारूप…

