Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » प्रेग्नन्सीत निवडणूक लढवणाऱ्या योगिता गवळींचा पराभव; पतीची भावनिक प्रतिक्रिया
    क्राईम

    प्रेग्नन्सीत निवडणूक लढवणाऱ्या योगिता गवळींचा पराभव; पतीची भावनिक प्रतिक्रिया

    editor deskBy editor deskJanuary 19, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी

    मुंबई महापौरपदाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच, ‘डॉन’ अरुण गवळी यांची कन्या योगिता गवळी यांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उमेदवार रोहिदास लोखंडे यांच्याकडून योगिता गवळी पराभूत झाल्या. मात्र, निकालानंतर त्यांचे पती व प्रसिद्ध अभिनेता अक्षय वाघमारे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत योगिता यांच्या जिद्दीचा, संघर्षाचा आणि जनसेवेचा मनापासून गौरव केला आहे.

    अक्षय वाघमारे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “प्रिय बायको, सर्वप्रथम तुझे मनापासून आभार आणि मला तुझा प्रचंड अभिमान आहे. प्रेग्नन्सी आणि त्यानंतर अवघ्या एका महिन्याच्या मुलीची आई असताना, एवढी मोठी जबाबदारी खांद्यावर घेऊन तू ज्या धैर्याने निवडणूक लढवलीस, ते खरंच थक्क करणारं आहे.”

    ते पुढे म्हणतात, “सत्ताधारी असो वा विरोधक, भाजप, शिंदे गट, ठाकरे गट किंवा मनसे — कोणाच्याही तुलनेत वैयक्तिक पातळीवर तुला सर्वाधिक ६,३०० मते मिळाली. तुझ्या आसपासही कुणी नाही, हे तू पुन्हा सिद्ध केलं आहेस. हे तुझ्या कष्टांचं आणि अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांच्या प्रामाणिक मेहनतीचं फळ आहे.”

    भायखळा परिसरातील जनतेने योगिता गवळी यांना भरभरून प्रेम दिल्याचे नमूद करत अक्षय वाघमारे यांनी सांगितले की, “जनतेने जातीपातीच्या राजकारणापेक्षा तुझ्या कामावर आणि विकासावर विश्वास ठेवला आहे. गेल्या काही महिन्यांत तू घेतलेले कष्ट, शारीरिक वेदना, कुटुंबापासून दूर राहून १२-१२ तास केलेलं काम मी जवळून पाहिलं आहे.”

    पोस्टच्या शेवटी त्यांनी म्हटले आहे की, “हा पराभव तुझा नाही, तर राजकारणातील तुझी दमदार एन्ट्री आहे. आता आणखी जिद्दीने काम करूया. मला तुझा खूप अभिमान आहे.”

    योगिता गवळी यांच्या पराभवानंतरही मिळालेल्या मतांची संख्या आणि जनतेचा प्रतिसाद पाहता, आगामी काळात त्या भायखळा परिसरातील राजकारणात प्रभावी भूमिका बजावतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.