नागपूर : वृत्तसंस्था अनेक तरुण तरुणी सोशल मिडीयावर दिवस रात्री सक्रीय असतात, याच घटनेतून अनेकदा धक्कादायक घटना घडत असतात. अशीच एक घटना घडली आहे. सोशल मिडियावर मैत्री झाल्यानंतर पैसे उकळून युवतीचा विनयभंग केल्याची घटना मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी युवतीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे. आजम रशीद खान (वय २१, रा. श्याम लॉन मागे, जाफरनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. १८ वर्षाच्या युवतीची आरोपी आजमसोबत सोशल मिडियावर ओळख झाली. त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात फसवून पैशांची मागणी केली. आरोपीने तिला वारंवार पैसे मागितल्याने तिने पैसे देण्यास नकार दिला.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात बसच्या अपघाताची जणू मालिका सुरु आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास पहूर येथील रेल्वे क्रॉसिंग जवळ समोरून येणाऱ्या कंटेनरने जामनेर कडे जाणाऱ्या एसटीला समोरून जोरदार धडक दिली. यात बस चालकाला दुखापत झाली असून त्यांच्यावर जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास पैठण आगाराची पैठण भुसावळ बस (क्र. एमएच २० बीएल ३९०१) पहूरकडून जामनेरकडे जात होती. तेव्हा रेल्वे क्रॉसिंग जवळ जामनेरकडून पहूरकडे भरधाव येणाऱ्या कंटेनरने ( क्र. एचआर ३८ एबी ९२३५) एसटीला जोरदार धडक दिली. यात बसचे चालक ए. व्ही. बढे यांच्या कमरेला व पायाला गंभीर…
ठाणे : वृत्तसंस्था नवरा बायको यांचे नाते खूप प्रेमाचे असते पण काही काही कारणाने ते इतक्या टोकाला पोहचत असते कि त्यातून काय घडेल हे कुणाला सांगता देखील येत नाही अशीच एक घटना ठाणे जिल्ह्यात घडली आहे. बायकोने नवऱ्यासाठी भात शिजवला नाही. म्हणून पतीने पत्नीला मरेपर्यंत मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. यावेळी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे खोणी गावातुन एका चाळीतून आरोपीला अटक केली आहे. आरोपी २३ वर्षीय रद्दी व्यापारी आहे. त्याचे नाव शंकर वाघमारे असे आहे. वर्षभरापूर्वी 20 वर्षीय ज्योत्स्नाशी शंकरने लग्न केले होते. हे दाम्पत्य भिवंडीत राहत होते. मंगळवारी आरोपीने पत्नीवर लाकडी…
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे बनावट नोटा चलनात आणायच्या प्रयत्नात असणाऱ्या दोन जणांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी विजय प्रकाश बडगुजर (रा. पिंप्री खुर्द) यांच्या फिर्यादीवरून प्रवीण नंदलाल जयस्वाल (वय २६ राखांडवा), शरद जाखेडे (वय ४१, रा. जळगाव) तसेच शिव किशोर ब्राह्मणे (वय २६, रा. इंदूर, मध्य प्रदेश) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन धरणगाव न्यायालयात हजर केले असता, धरणगाव न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा थांब्याजवळ बसलेल्या वृद्ध महिलेची पाच हजार रुपये ठेवलेली पैशांची पिशवी चोरट्याने चोरून नेली. ही घटना शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या सुमनबाई नारायण पाटील (६२) या वृद्ध महिला धुणीभांडी करून आपला उदरनिर्वाह करतात. १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता त्या धुणीभांडी करण्यासाठी गोविंदा रिक्षा स्टॉपजवळील एका फर्निचर दुकानासमोर आल्या. थोडा थकवा वाटू लागल्याने, दुकानाच्या पायऱ्यावर बसल्या व कमरेला असलेली पैशांची पिशवी बाजूला ठेवली. त्यावेळी एक अज्ञात व्यक्तीने बाजूला बसण्याचे सांगून त्यांची ५ हजार रुपये ठेवलेली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – ममुराबाद रस्त्यावर झाला अपघात जळगाव जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी व बसचे होत असलेल्या अपघातामध्ये नियमित वाढ होत असतांना आढळून येत आहे. दुचाकीवर लिफ्ट घेऊन शेताजवळ पोहोचले अन् मागून आलेल्या बसने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला व दुचाकीचालक मयूर संजय पाटील (२४) व अनिता अविनाश सावळे (वय ४०, दोघे रा. ममुराबाद) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील मयूर पाटील हा शुक्रवारी सकाळी शेतात जात होता. त्या वेळी रस्त्याने एका शेतकरी महिलेने त्याला लिफ्ट मागितली. दोघे…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाने गावठी हातभट्टी चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात तब्बल ९२ जणांना अटक करीत सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ व १८ ऑगस्ट या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४० गुन्हे नोंदविले. १८ ऑगस्ट रोजी पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात येऊन त्यात १०५ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईमध्ये ९२ जणांना अटक केली असून इतर १३ जणांचा गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमध्ये एक हजार ३२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून नियमितपणे गुन्हेगारी घटना घडवून आणणाऱ्या विरोधात जळगाव पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरु केला असून जिल्ह्यातील दोघांना पुन्हा एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगार धास्तावले आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा.वराडसीम, ता.भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) यांना स्थानबद्ध करण्यात आले आह.े इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तीन, फैजपूर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण जवळील जॉगिंग ट्र्कवर दुचाकी अपघातानंतर २३ वर्षीय तरूणाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जबरी हिसकावून फरार झालेल्या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण ट्रॅकवर १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) हे त्यांच्या दुचाकीने जात असताना दुचाकीने (एमएच १९, डीयू ४६१०) धडक दिली होती. अपघात करणाऱ्या व त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेल्या एकूण चार जणांनी तारीक खाटीक यांना अपघाताच्या कारणावरुन मारहाण करुन २५ हजार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाला भरधाव वेगाने येणारी अनोळखी चारचाकीने जोरदार धडक दिल्याने तरूण जखमी झाल्याची घटना गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता घडली. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अंजाळे येथील रहिवासी किरण सोभा कोळी (वय-४३) हा तरूण जळगावात खासगी कामासाठी दुचाकी (एमएच १९ डीएल ४३४०) ने गेला होता. काम आटोपून घरी परतत असतांना गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारावाजेच्या सुमारास देऊळगाव जवळून जात असतांना त्याच्या दुचाकीला मागून अज्ञात भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत किरण कोळी हा पडल्याने त्यांच्या दोन्ही…

