Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक तरुण-तरुणी सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात पण चाळीशी पार केलेले अनेक जण सोशल मीडियावर मैत्रीणी शोधत असल्याने पुणे शहरातील ४६ वर्षीय व्यावसायिकाने अशीच मैत्रीण शोधली. मग दोघांमध्ये चॅटींग सुरु झाले. त्यामध्ये तो व्यावसायिक तिच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. दोघांमधील संवाद प्रेमाचे होत होते. मग तिने त्याला पुण्यातील वारजे भागातील हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलवले. हॉटेलमध्ये गेल्यावर जे घडले, त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. काय घडली घटना ? पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ४६ वर्षीय व्यावसायिकाबाबत हा प्रकार घडला आहे. त्याने फेसबुकवरुन मनिषा नावाच्या मुलीशी मैत्री केली. ‘मनिषा जी’ नावाने तिचे फेसबुक अकांउट होते. दोघांमध्ये…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मंत्री महोदय ना. गुलाबराव पाटील यांना तीन दिवस मुंबईत मंत्री मंडळाच्या बैठकांना हजर रहावे लागते. त्यामुळे मंत्र्यांची भेट घेणे नागरीकांना शक्य होत नाही. परंतु, आता प्रत्येक गणात बैठक घेऊन नागरीकांच्या समस्या जागेवरच सोडवल्या जातील. त्यासाठी तलाठी, तहसिलदार, प्रांत यांनाही गावातच बोलावून घेऊ, अशी हमी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी आज दिली. वावडदा येथे झालेल्या पंचायत समिती गण संपर्क बैठक या अभियानाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. या अभियानांतर्गत मंत्री महाेदयांनी गेल्या चार वर्षात केलेल्या विकासकामांची माहिती बॅनर, माहिती पुस्तीकेच्या स्वरुपातून नागरीकांपर्यंत पोहोचवण्याची विनंती प्रतापराव पाटील यांनी केली. वराड गावातील स्मशानभुमीचे वॉल कंपाऊंड व शिवरस्ता म्हसावद…

Read More

धरणगाव प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्याचे खासदार उन्मेष पाटील यांनी धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत स्कीम अंतर्गत मंजूर केल्याबद्दल मंत्री यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे व्यक्त केले आभार व विविध मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा करण्यात आली. भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका व रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना DRUCC मेंबर श्री प्रतिक जैन यांचेकडून देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि, भारतीय जनता पार्टी,धरणगाव/ अंमळनेर तालुका रेल्वे सल्लागार समिती,यांनी रेल्वे विषयी सुचविलेल्या विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना शासकीय दौऱ्या दरम्यान जळगाव येथे निवेदन देण्यात आले. 1. भुसावळ ते पुणे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानच्या टोंक जिल्ह्यात हनीट्रॅपप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पती-पत्नीला अटक केली आहे. पोलिसांनी या जोडप्याला एका व्यक्तीकडून 50 हजार रुपये घेताना पकडले. पोलिसांनी आरोपींकडून एक लाख 30 हजारांची रोकड आणि एक दुचाकी असा एकूण एक लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पकडलेल्या जोडप्याने एका व्यक्तीचा अश्लील व्हिडिओ बनवून त्याला आपल्या जाळ्यात अडकवले होते. नंतर ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्यात गुंतले. या संपूर्ण प्रकरणाचा खुलासा करताना पोलीस अधीक्षक राजर्षी राज वर्मा यांनी सांगितले की, या संदर्भात मालपुरा येथील रहिवासी तक्रारदाराने जुने टोंक पोलिसांना तक्रार दिली होती. मालपुरा येथे दुकान असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीने त्याच्या दुकानदाराकडून…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका पत्नीने पतीवर बॅटने हल्ला करून त्याची हत्या केली. या हत्येमागचे कारण अवैध संबंधातून समोर आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याने पत्नी संतापली होती. हि घटना राजस्थानच्या झुंझुनू शहरात घडली आहे. त्यामुळे घरात दोघांमध्ये भांडण व्हायचे. शनिवारीही यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. त्यादरम्यान रागाच्या भरात आलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात बॅटने वार करून त्याचा खून केला. या जोडप्याला तीन मुले आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. हत्येचा बळी ठरलेला तरुण झुंझुनू नगरपरिषदेत सफाई कामगार होता. स्टेशन ऑफिसर राममनोहर थोलिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामगडचा रहिवासी बंटी वाल्मिकी (४२) हा झुंझुनू नगरपरिषदेत सफाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील गोलानी मार्केट परिसरातून एकाने तब्बल ४५ हजारांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल लांबविण्याचे घटना उघडकीस आली आहे याप्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील गोलाणी मार्केट परिसरात कुणाल रावलानी (वय ४२) यांच्या मालकीची व्हीकेच गॅलेक्सी नावाचे मोबाईल दुकान असून दिनांक २५ मार्च रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी आश्चर्य सचन हा दुकानात आला असता त्यांनी ४५ हजार रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल दुकानावरील काउंटरवर असताना चोरून नेला आहे याप्रकरणी कुणाल राहुल रावलानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी आश्चर्य संचन याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

Read More

जळगाव : प्रातिनिधी जळगाव शहरातील एका भागातील 70 वर्षीय वृद्ध महिला हरविले असून याबाबत वृद्ध महिलेचे परिवार त्यांचा शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरात नजीक असलेल्या रेल्वे पुलाजवळ रहिवासी असलेले लक्ष्मीबाई पाराजी कुलधे (वय ७०) हे गेल्या दोन दिवसापासून हरविलेले आहेत तरी कुणाला या वृद्ध महिला कुठल्याही परिसरात दिसल्यास त्यांनी लागलीच ८१ ८०० ३४५८० किंवा ९४२३९ ५२८७२ या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

जामनेर तालुक्यात एका ३५ वर्षीय महिलेला जीवेठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलिसात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३४ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्यास असून या महिलेवर २ जुलै ते २५ जुलै या दरम्यान जामनेर शहरातील एका ठिकाणी व मलकापूर शहरात देखील वेळोवेळी ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करण्यात आल्याची घटना १९ ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी महिलेने जामनेर पोलिसात धाव घेत संशयित आरोपी इरफान इस्माईल सय्यद (वय २५) रा.बोदवड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) एका तस्कराला अटक करून त्याच्याकडून जवळपास ४४ लाख रुपये किमतीचे ७४३.५६ ग्रॅम सोने जप्त केले. डीआरआयने आरोपीचा पासपोर्ट जप्त करून हे प्रकरण केंद्रीय सीमाशुल्क विभागाकडे सोपविले आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथील सचिन चांदोस्कर असे आरोपीचे नाव आहे. तो शुक्रवारी पहाटे एअर अरेबियाच्या विमानाने शारजाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला होता. त्याने हे सोने पेस्ट स्वरूपात अंतर्वस्त्रात लपवून आणले होते. तस्करीबाबत गुप्त माहिती डीआरआयला मिळाली. अधिकाऱ्यांना एका प्रवाशाच्या चालण्याचे हावभाव संशयास्पद वाटले. त्याची तत्काळ झडती घेतली असता त्यांच्या अंडरवेअरमध्ये लपविलेले ७४३.५६ ग्रॅम सोने सापडले. त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासल्यानंतर तो दुबईहून…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात रात्री तर चालतोच पण दिवसा देखील देह व्यापार सुरु असल्याची घटना गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये स्पा च्या आडून सुरू असलेल्या देह व्यापारावराचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईदरम्यान पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश मधील तीन महिला आणि तीन युवतींची पोलिसांनी सुटका केली. या देहव्यापार प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. नागपूरचा सदर हा परिसर नामांकित परिसर असून, या ठिकाणी स्पाच्या आडून देह व्यापाराचा सर्रास धंदा सुरू होता. वेगवेगळ्या राज्यातील युवती आणि महिलांना आमिष दाखवून या ठिकाणी आणलं जायचं आणि त्यांच्याकडून देह व्यापार करून घेतला जायचा. या स्पा चा मालक हा…

Read More