Author: editor desk

मुंबई : प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील चोरी ची एक घटना सध्या चांगलीच चर्चेची ठरली आहे. काय तर या चोरट्यांनी चोरी केली. चोरीही मोठी होती. परंतु चोरी करण्यापूर्वी त्यांनी ज्योतिषीचा सल्ला घेतला होता. मग तो सल्ला कितपत यशस्वी झाला? परंतु हे चोरटे मात्र चोरी केल्यानंतर पोलिसांच्या सापळ्यात आले. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये एक कोटी रुपयांची चोरी झाली होती. सागर गोफेन यांच्या घरी ही चोरी झाली होती. ते घरी नसताना त्यांच्या पत्नीस चोरट्यांनी बंधक बनवले होते. त्यानंतर त्यांच्या घरातून 95 लाख रुपये रोकड आणि 11 लाख रुपये किंमतीचे सोने, चांदीचे दागिने घेऊन फरार झाले होते. पोलिसांनी या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील जळके तांडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा याठिकाणी आज माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले या शाळेत पटसंख्येनुसार १२० विद्यार्थी आहेत परंतु या शाळेत मागील पटसंख्येनुसार ६० गणवेश प्राप्त झाले होते त्यामुळे उर्वरित विद्यार्थी गणवेशापासुन वंचित राहतील अशी खंत येथील शिक्षक कर्मचारी यांना वाटत होती ही बाब जळके वि.वि.का.सोसायटी सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या लक्षात आली व त्यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य पवन भाऊ सोनवणे यांना विनंती केली व नियमित सामाजिक कार्यासाठी पुढे असणारे पवन भाऊ सोनवणे यांनी उर्वरित विद्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून दिले या…

Read More

धरणगाव :प्रतिनिधी  येथील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्थेचा पर्यटन क्षेत्र ‘क’वर्ग यादीत समावेश करण्यात आला असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी नुकतीच केली आहे. जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रलंबित विषयांवर चर्चा झाल्यानंतर धरणगाव तालुक्यातील डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत मधील क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती स्थळास ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्र /पर्यटन क्षेत्र दर्जा देण्याची पालकमंत्री गुलाबरावजी पाटील बैठकीत घोषित केले. क्रांतिकारी खाज्याजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील भिल्ल समाज बांधव येथे भेट देण्यासाठी येतात. त्यामुळे स्मृती स्थळास पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात यावी, अशी सतत मागणी समाज बांधवांकडून होत होती. त्याची दखल…

Read More

जळगाव : प्रतिनिधी   पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जिल्हा नियोजन बैठकीत केळी विकास महामंडळाला हरिभाऊ जावळे यांचे नाव देण्याची घोषणाचे ठराव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बहिणाबाई चौधरी यांचा पुतळा बसविण्यासाठी 1 कोटी रूपये व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे जन्मस्थानी असोदा येथे स्मारकासाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाकडून १२ कोंटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. महाऊर्जा (MEDA) मार्फत जिल्ह्यातील ज्या – ज्या शाळांना आजही विजेची सोय नाही किंवा वीज बिल भरु शकत नाही अशा शाळांना सौर उर्जा प्रकल्प बसविणे जाणार असून खेडी शिवारात अद्यावत ७ कोटीच्या वारकरी भवन उभारणीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील…

Read More

कल्याण : वृत्तसंस्था शाळेतील शिक्षक व विद्यार्थीमध्ये नेहमीच प्रेमाचे नाते असते. याच गुरु शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना राज्यातील कल्याण शहरात घडली आहे. पूर्व परिसरातील एका नामांकित शाळेत पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलावर शाळेत डान्स शिकवण्यासाठी आलेल्या डान्स टीचरने लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी डान्स टीचर समीर कदमला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून कल्याणपूर्वमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. पोलिसांकडून देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र त्यानंतरही गुन्हेगारी वाढत असल्याने ही गुन्हेगारी थांबवण्याचे आव्हान कल्याण कोळसेवाडी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. कल्याण पूर्वेतील एका नामांकित शाळेत शिकणाऱ्या एका पाच वर्षीय मुलाला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक लहान मुलांना टॉफी आवडत असते. अगदी गल्लीतील कुणीही टॉफी दिली तर लहान मुले आवडीने घेत असतात अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी टॉफी खाल्ल्यामुळे आजारी पडलेल्या आणखी एका मुलीचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी टॉफी खाल्ल्याने आतापर्यंत तीन मुलींचा मृत्यू झाला आहे, तर आणखी एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. टेरेसवर झोपायला गेलेल्या मुलींना विषारी टॉफी देण्यात आली होती. चौघींनी त्या टॉफी खाताच त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यामध्ये तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र हे कृत्य जाणूनबुजून करण्यात आले असून, पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. आपल्या दोन पत्नींच्या आत्महत्येनंतर बदला घेण्यासाठी लहान मुलींचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अनेक भावीक महादेव मंदिरात दर्शन घेण्यासाठी जात आहेत. वसईतील तुंगारेश्वर येथे महादेवाचे दर्शन घेण्यासाठी येतात. पण दर्शनाला आलेल्या एका महिलेसोबत हृदयद्रावक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. हि घटना वसईत घडली आहे. पतीसोबत बुलेटवर बसून तुंगारेश्वर दर्शनाला गेलेल्या पत्नीचा ओढणीने घात केला. बुलेटवरुन जात असताना महिलेची ओढणी बुलेटच्या मागच्या चाकात अडकल्याने गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याची धक्क्दायक घटना घडली. मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई बाफाणे हद्दीत ही घटना घडली. प्रतिमा यादव असे मयत महिलेचे नाव असून, ती कांदिवलीतील रहिवासी आहे. या घटनेमुळे कांदिवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कांदिवलीतील रहिवासी असलेले यादव पती-पत्नी रविवारी सुट्टी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात पुणे शहरातून पोलिसांनी दोन दशतवाद्यांना अटक केली असल्याची घटना ताजी असतांना त्यापूर्वी मुंबई अन् पुणे शहरात ३ जुलै रोजी काही जणांना अटक केली होती. यानंतर पुणे शहर दहशतवाद्यांचे केंद्र झाले की काय? अशी प्रकरणे उघड होऊ लागली. दहशतवादी प्रकरणाचा तपास एटीएस आणि एनआयएने केला. त्यानंतर आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रथमच या प्रकरणावर जाहीरपणे मत मांडले. पालकमंत्र्यांनी पुणे शहरात दहशतवाद्यांची साखळी कार्यरत असल्याची कबुली दिली. इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशवादी संघटनांशी पुण्यातील दहशतवाद्यांचे संबंध समोर आले आहे. तसेच हे दशतवादी स्टुडंट इस्लामिक मुव्हेमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सिमी आणि इंडियन मुजाहिदीन या बंद पडलेल्या संघटनांचे…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणावर एका पुरुष जातीचे प्रेत वाहून आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. घटनास्थळी अमळनेर पोलीस पथक दाखल होवून असून मारवड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाच्या काठावर एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत दिनांक २१ रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास गुराख्याना दिसून आले. कुत्रे प्रेताचे लचके तोडत होते. गुराख्यानी पोलीस पाटील उमाकांत पाटील यांना कळवल्या नंतर त्यांनी मारवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहा पोलिस निरीक्षक शितलकुमार नाईक व पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली असता मयत पुरुषाच्या अंगावर कपडे नव्हते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक तरुण व तरुणीसाठी तलाठी भरतीची परीक्षा घेण्यात आली होती. पण अनेक ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्यामुळे तलाठी भरतीची परीक्षा तब्बल दोन तास पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेला विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असून विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. जळगाव शहरातील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी सकाळी नऊ वाजता तलाठी भरतीचा पहिला पेपर होता. मात्र, सर्व्हर डाऊन झाल्यामुळे हा पेपर साडेअकरा वाजता सुरू झाला. त्यामुळे परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले असून पुढील सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा दुपारी साडेबारा ऐवजी दुपारी अडीच वाजता होणार आहे.…

Read More