Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दहावी पास आहात ; मिळणार ‘ही’ नोकरी !
    राज्य

    दहावी पास आहात ; मिळणार ‘ही’ नोकरी !

    editor deskBy editor deskJuly 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक बेरोजगार तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, अशाच तरुणासाठी हि बातमी महत्वाची असणार आहे. अनेक तरुणाचे किमान शिक्षण १० वी झालेले असते. त्यामुळे खूप जास्त शिक्षण लागेल असे काही वाटत नाही. भारत तिबेट सीमा पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. आयटीबीपीने आपल्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे.
    आयटीबीपीमध्ये 458 कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पदासाठी भरती निघाली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. या पदावर भरती होणाऱ्या उमेदवाराला 21,700 ते 69,100 रुपये पगार मिळू शकतो.

    यासाठी उमेदवाराचं वय कमीत कमी 21 वर्षं आणि जास्तीत जास्त 27 वर्षं असणं गरजेचं आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून या व्यक्तीने एसएससी, म्हणजेच दहावीची परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. यासोबतच, ही भरती ड्रायव्हर पदासाठी असल्यामुळे उमेदवाराकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणंही गरजेचं आहे.

    यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया जून महिन्यातच सुरू झाली आहे. आता अर्जाचे शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. 26 जुलै 2023 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज करण्यासाठी तुम्ही आयटीबीपीच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. याठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरुन तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकाल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    नाशिक धर्मांतर-छळ प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट; ‘निदा खान’च मुख्य सूत्रधार !

    April 16, 2026

    एटीएम चोरी करणारी आंतरराज्यीय टोळी जळगावात जेरबंद !

    April 16, 2026

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.