भुसावळ : प्रतिनिधी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीकाजवळ अज्ञात तिघांनी एका कापड व्यापार्याला कट मारल्याचा बहाणा करून मारहाण करून व्यापार्याकडील ३४ हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटून पोबारा केल्याची घटना मंगळवार, १५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शोध पथकाने तीन जणांना अटक केली आहे. संशयिताना न्यायालयात हजर केले असता २२ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. हर्षल संजयकुमार सावकारे (वय-२७, रा.पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ), आनंद प्रकाश पवार (वय-२० रा.नागसेन कॉलनी, कंडारी, ता.भुसावळ) आणि अनिकेत सदानंद सोनवणे (वय-२३ रा. सराफ बाजार, भुसावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची आणावे आहे. किशोर रामेश्वर सदावर्ते (वय-३१ रा.…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सहसा पती-पत्नीचे नाते हे खूप प्रेमळ आणि सुंदर मानले जाते. ते सतत एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. त्यांचा विश्वास हा या नात्याचा पाया आहे आणि ज्या दिवशी ते तुटते त्याच दिवशी एकापेक्षा एक भयावह कथा समोर येतात. असाच एक किस्सा अमेरिकेतून समोर आला आहे. येथे पत्नीने प्रियकराला भेटायला जाण्यासाठी प्रायव्हेट जेट न दिल्याने पतीच्या नावावर सुपारी दिली. लिंडसे शिवर असे या महिलेचे नाव असून ती पती रॉबर्ट शिव्हरसोबत राहत होती. दोघांमधील खराब नात्यामुळे ते घटस्फोट घेणार होते, पण त्याच दरम्यान काहीतरी वेगळे घडले. पतीला या महिलेच्या अफेअरची आधीच माहिती होती, परंतु घटस्फोटाच्या लगेच आधी, तिला प्रियकरसोबत…
मुंबई : वृत्तसंस्था कोणतेही वय अवलंबून नसते, ज्याचे हृदय तरुण असते तो कधीही म्हातारा होत नाही. आजकाल अशा तगड्या आणि वयाने योग्य व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा 80 वर्षांचा ‘काका’ असा ब्रेक डान्स करताना दिसतोय, जे पाहून मोठमोठे डान्सर्सही प्रभावित होतील आणि ह्रदय पिळवटून टाकतील. उदयपुरविसिट नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 75-80 वयोगटातील एक व्यक्ती मोकळ्या रस्त्यावर जोरदार नाचताना दिसत आहे. इतर काही कलाकारही तिथे परफॉर्म करताना दिसतात. ‘सजना है मुझे सजना के लिए’ गाण्यावर अंकल ब्रेक डान्स करतात, त्यांची स्टेप्स आणि एनर्जी दोन्ही अप्रतिम आहेत. कानात इअरफोन घालून हा काका कोणाचीही पर्वा न…
अमळनेर शहरात चोरीच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना दिसत आहे. शहरातील एका परिसरात बंद घराचे कुलूप तोडून अनोळखी चोरट्यानी घरात प्रवेश करून रोकड व दागिने चोरून घराच्या शेजारी अंगणात लावलेली १५ हजार किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील शास्त्रीनगर रहिवासी नितीन भालचंद्र पवार यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने ७ हजार रोख आणि ३ हजार रुपयांचे दागिने चोरून नेत त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या माधवराव बडगुजर यांची १५ हजार किमतीची दुचाकी क्रमानं एम एच १९- ७९१८ चोरून नेली . याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात प्रेमातून लग्न होत असतेत पण काही प्रेम विवाह आहे जे अखेरच्या श्वासापर्यत टिकत असते तर काही विवाह अगदी शुल्लक कारणाने भांडण होत कुठल्याही टोकाला पोहचत असते. अशीच एक घटना पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यात बागदा येथे एका डॉक्टरने पत्नीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर ही घटना त्याने आपल्या भावाला सांगितली. नंतर डॉक्टर थेट पोलीस ठाण्यात पोहचला. स्वतःला त्याने पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी आरोपीला अटक केली. डॉक्टरने पत्नीच्या गळ्यातील नळीवर चाकू फिरवला. शनिवारी रात्री ही घटना उत्तर २४ परगना जिल्ह्याच्या बागदा येथे घडली. आरोपी अरिंदम बाला हा मांडवाघाटा गावातील राहणारा आहे. अरिंदम…
मुंबई : वृत्तसंस्था सध्या देशभरात सोशल मिडीयाच्या माध्यमातून होणारी ओळख व त्यातून निर्माण होणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहे. सोशल मीडियावर प्रेम करत अपहरण, हल्ले, हत्या अशा घटना उजेडात येत आहेत. अशीच धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमातील प्रियकराने अल्पवयीन मुलीला फूस लावून तिचे अपहरण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. मात्र मुंबई गुन्हे शाखा आणि लोहमार्ग पथकाने 48 तासांच्या आत मुलीची सुटका करत प्रियकरला ताब्यात घेतले आहे. कुणाल रविंद्र रातांबे असे अटक करण्यात आले आहे. सोलापूर ते मुंबई गदक एक्सप्रेसने प्रवास करत असताना ही घटना घडली. पीडित मुलगी आणि आरोपीची इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळखीचे प्रेमात रुपांतर…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मोठ्या शहरातील गुन्हेगारी वाढत चाललेली असतांना सध्या गोकुळाष्टमी सण जवळ आला आहे. त्यामुळे गोविंदा पथक दहीहंडीची जोरदार तयारी करत आहेत. मात्र दहीहंडीचा सराव करत असताना गोविंदा पथकावर काही तरुणांकडून हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. या हल्ल्यात एक गोविंदा गंभीर जखमी झाला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी जखमी गोविंदाच्या फिर्यादीवरुन रामनगर पोलिसांकडून तिघांवरिोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवलीतील आयरे भागात असलेल्या बालाडी गार्डन गृहसंकुलासमोर गोविंदा पथकाचा सराव सुरु होता. यावेळी चार तरुण तेथे आले आणि त्यांनी गोविंदा पथकाशी वाद घातला. बघता बघता हा वाद विकोपाला गेला. मग या वादातून गोविंदा…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील सरकारने तरुणांसह तरुणीसाठी तलाठी भरतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यापूर्वी मात्र नाशिक जिल्ह्यात पेपर फुटी प्रकरण चर्चेत असतांना आता पुन्हा एकदा प्रशासकीय व्यवस्था विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत गंभीर नाही का? असा सवाल आता उपस्थित होतोय. कारण तलाठीपदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. परिक्षेच्या आधी सर्व्हर डाऊन झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. नागपुरात तलाठी भरती परिक्षेत सर्व्हर डाऊन झालं आहे. फक्त नागपुरातच नाही तर अकोला, अमरावती, लातूरमध्येही हीच परिस्थिती आहे. अमरावतीतही तलाठी पदाच्या परीक्षेत सावळा गोंधळ पाहायला मिळतोय. नऊ वाजता सुरू होणारी परीक्षा अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये…
फैजपूर : प्रतिनिधी यावल तालुक्यातील फैजपूर नजीक न्हावी शिवारात पाच वर्षाच्या बालिकेच्या हत्येप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठुशा बारेला असे हत्या झालेल्या बालिकेचे नाव आहे. ठुशा भावला बारेला असे बालिकेची हत्या करणा-या बापाचे नाव आहे. 17 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी 20 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कु. अनिता बारेला या बालिकेस दवाखान्यात घेवून जातो असे सांगून तिचा बाप ठुशा बारेला तिला घेवून गेला. बालिकेला दवाखान्यात न नेता त्याने न्हावी शिवारातील धिरज चौधरी यांच्या शेतातील विहीरीत फेकून जिवे ठार केले. बालिकेचे आजोबा छंडा वेरला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फैजपूर पोलिस…
बुलढाणा जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुण गेल्या काही दिवसापासून नोकरीच्या शोधात बहिणीकडे आलेला होता. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अंकुश शिवाजी सुरळकर (वय-२२)असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील अंकुश सुरळकर हा राहत असलेल्या बहिण व मेव्हणे अनिल दामू इंगळे यांच्याकडे गेल्या आठ दिवसांपासून नोकरीच्या शोधासाठी आलेला होता. गेल्या आठ दिवसांपासून तो नोकरीच्या शोधात होता. गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी नेहमीप्रमाणे नोकरी शोधायला जात असल्याचे सांगून बहिणीच्या घरातून निघून गेला. त्यानंतर तो घरी परतलाच नाही. त्याच्या नातेवाईकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला…

