Author: editor desk

अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील नर्मदा फाऊंडेशन याठिकाणी उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुधवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता घडली. या प्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका महिलेस १०-१२ दिवसांपासून पोट पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिने धुळे येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी केली. तेथील डॉक्टरांनी तीला अपेंडिक्सचा त्रास असल्याबाबत सांगितले. यानंतर ती अमळनेर येथे आली. बुधवारी रोजी दुपारी डॉक्टरने आपला विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच डॉ. शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव जमला. संबंधित डॉक्टरला आमच्या ताब्यात…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक वर्षापासून प्रेमानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची अनेकांमध्ये मोठी क्रेज आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक युवक आणि युवती एकत्र राहत होते. एकेदिवशी सकाळी अचानक त्यांच्या घरातून गोळीचा आवाज आला. ही गोळी त्या मुलीला लागली होती तर तिच्यासोबत राहणारा युवक बेपत्ता होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु तपासात अशा गोष्टी बाहेर आल्या ज्यामुळे पोलीस हैराण झाले. लखनौच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. १७ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना एक कॉल आला. कॉल करणारी महिला होती. जी रडत होती. रडता रडता तिने पोलिसांना सांगितले की, माझ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील बालसुधार गृहातील शौचालयात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्या मुलीवर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात अमळनेरातील पूनम भिल(वय १४) ही मुलगी होती. पूनम हिला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑगस्ट रोजी तिने शौचालयात गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत. बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मोठी बंडखोरी राज्यात झाली होती त्यानंतर पुन्हा भाजप व शिंदे सत्तेत आले त्यानंतर ठाकरे गटात मोठी निराशा असतांना आज एका माजी खासदाराने प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे…

Read More

देशासह राज्यात नेहमीच महिला सुरक्षेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आला असून राज्यातील महिला आणि मुली संरक्षित आहेत का? असा प्रश्न नेहमी उपस्थित होतो. त्यामागील कारणंही अगदी तसंच आहे. राज्यात महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण प्रचंड वाढत आहे. दर महिन्याला हजारो मुली प्रत्येक जिल्ह्यातून बेपत्ता होत आहेत. असं असताना देखील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. कल्याणमध्ये नुकतंच एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी आहे. याशिवाय अनेक जिल्ह्यांमध्ये अशाप्रकारच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे मुलींच्या सुरक्षेवर वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता पोलीसही सतर्क झाले आहेत. महिला अत्याचाराच्या घटना टाळायच्या असतील तर…

Read More

नवी मुंबई : वृत्तसंस्था भरधाव रेल्वेतून फेरीवाला बनून प्रवाशांचे महागडे मोबाईल पर्स आणि दागिने चोरणाऱ्या टोळीला मुंबई रेल्वे एसटीएफ पथकाने अटक केली आहे. रामेश्वर साहनी, खूबलाल महतो, विनोद महतो अशी या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून 7 गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 17 मोबाईल, महागडी घड्याळं यासह जवळपास 9 लाखाचा चोरीचा माल हस्तगत केला आहे. पोलीस पुढील कारवाई करत आहेत. एका महिला प्रवाशाची लूट केल्यानंतर आरोपींचा पर्दाफाश झाला. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वेगाने तपास करत टोळीचा शोध सुरु केला. अखेर या टोळक्याला पोलिसांनी अटक केली आहे. मेल एक्सप्रेसमध्ये एसीच्या डब्यात प्रवाशांचे किंमती वस्तू चोरीला जाण्याच्या घटनेत वाढ होत आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  फुफनगरी फाट्याजवळून विनापरवाना वाळू वाहतूक करणारे मालवाहू वाहन सोमवार, २१ ऑगस्ट रोजी तालुका पोलिसांनी पकडले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. वाळू उपशाला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन, महसूल व आरटीओ विभागाने बांभोरी गावातून सर्व ट्रॅक्टर, ट्रक, डंपर जप्त करण्यात आले. त्यानंतर आता वाळू वाहतूकदारांनी शक्कल लढवत मालवाहू वाहनातून वाळू वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. अशाच प्रकारे २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी मालवाह वाहनातून (क्र एमएच १९, सीवाय ८२५७) वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार यांना मिळाली. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकाने तालुक्यातील फुफनगरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्हा पोलिस दलातील १५ सहायक पोलिस निरीक्षक आणि १५ पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश . पोलिस उपनिरीक्षक असे एकूण ३० पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी २१ ऑगस्ट रोजी रात्री काढले. बदली झालेल्या पोलिस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तत्काळ घेण्याचे निर्देशदेखील पोलिस अधीक्षकांनी दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा उपनिबंधक कार्यालयात बैठकीसाठी येत असलेल्या दुचाकीस्वाराचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौकात घडला. भरधाव गॅस सिलेंडर घेवून जाणार्‍या ट्रकने धडक दिल्याने पंजाबराव नामदेव बोरसे (52, कोल्हाडी) यांचा मृत्यू झाला आहे. कोेल्हाडीतील विविध कार्यकारी सोसायटीचे सचिव असल्याचे सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सहकार विभागाची मंगळवारी बैठक असल्याने याा बैठकीसाठी कोल्हाडी विकासोचे सचिव पंजाबराव बोरसे हे सकाळी बोदवड येथून दुचाकीने (एम.एच.19 ए.सी.224) ने जळगावला यायला निघाले. ते शहरातील आकाशवाणी चौकात आल्यानंतर मागून गॅस सिलिंडर घेऊन जाणार्‍या ट्रकने (एम.एच.04 जे.यु.9596) त्यांना धडक दिली. यात बोरसे चाकाखाली…

Read More