भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ शहरातील जामनेर रोड लगत असलेल्या वाल्मीकनगरामध्ये दि. २३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास हवेमध्ये दोनवेळा गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, तर याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि गावठी कट्टा जप्त केला आहे. याप्रकरणी विकेश श्याम सारवान ऊर्फ विकी किशोर टाक (वय ४२) याला अटक केली आहे. त्याने दहशत निर्माण करण्यासाठी गावठी पिस्तुलाने हवेत गोळीबार केली. त्याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक भवन आव्हाड यांच्या आदेशाने हे कॉ. विजय नेरकर, महेश चौधरी, रमण सुरळकर, सचिन चौधरी, सुनील जोशी, नीलेश चौधरी, प्रशांत परदेशी, योगेश माळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींना ताब्यात घेतले. त्या…
Author: editor desk
मुक्ताईनगर : प्रतिनिधी दिनांक 23 ऑगस्ट रोजी रात्री आठ वा. चे सुमारास एका पांढऱ्या रंगाची इस्टींगा गाडीने सात आठ पुरुष हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने मुक्ताईनगर शहराकडेस येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन पोलीस निरीक्षक मोहीते यांनी नाकाबंदीस असलेले पो. उपनिरीक्षक राहुल बोरकर, पोहेकॉ / 1303 विनोद सोनवणे, पोहेकॉ/2881 संदिप खंडारे, पोना/3100 धर्मेंद्र ठाकुर, पोना / 2991 संदीप वानखेडे, पोका 49 राहुल बेहनवाल, पोकों/ 62 संदिप धनगर, पोकों / 189 रविंद्र धनगर, पोकां/ 3225 मंगल सोळंके, पोकों/1543 अमोल जाधव यांना बोदवड चौफुल्ली येथे बोदवड कडुन येणाऱ्या वाहनाची तपासणी करण्याची सुचना दिली. त्या प्रमाणे वरील नाकाबंदी टिमने एक पांढ-या रंगाची इस्टीगा…
चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव शहरातील एका परिसरातील कृषी केंद्र फोडून सुमारे ३५ हजारांची रोकड चोरीला गेली होती. शहर पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. आनंदा राजु सरोदे (पारोळा रोड, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगांव शहरातील घाटरोड वरील फकीराव रामराव कंपनी खते व बियाण्याच्या चोरी १९ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास झाली होती. चोरट्याने दुकानाच्या ड्रावरमधून 35 हजारांची रोकड लांबवली होती.सतीष बाबुराव भालारे (चाळीसगाव) यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे संशयित निष्पन्न केला. चाळीसगावचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड, योगेश बेलदार, दीपक पाटील, निलेश पाटील,…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील प्रेम प्रकरण नेहमीच चर्चेत येत असते, यामधून अनेक तरुण तरुणीचा जीव देखील गेला आहे. असेच एक प्रकरण समोर आला आहे. तो अन ती दोघे प्रेमात आकंठ बुडालेले… दोघांनी सोबत लग्न करण्याचे ठरवले… दोघे एकमेकांसाठी भेटण्यासाठी भंडार्यातील एका लॉजमध्ये आले व रात्री मुक्कामाला राहिले. प्रेयसीला भेटण्याच्या अतिउत्साहात त्याने वियाग्रा (शक्तीवर्धक गोळ्या) अति सेवन केल्याने प्रियकराचा बीपी वाढला अन त्याचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना भंडारा बसस्थानकातील मध्यवर्ती लॉजमध्ये घडली. कृष्णा रायभान धनजोडे (27, केशोरी, ता.कामठी) असे मयत युवकाचे नाव आहे. कृष्णा धनजोडे हा तरुण गोंदिया जिल्ह्यातील आपल्या प्रेयसी असलेल्या मैत्रीणीला भेटण्यासाठी भंडारा शहरात आला होता.…
चाळीसगाव : प्रतिनिधी नांदगावकडून धुळेकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने वयोवृद्धाला जोरदार धडक दिल्याने वृद्ध जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील देवळी येथील अशोक शांताराम मराठे (वय-६५) हे चाळीसगावला एका हॉटेलात कामाला आहे. मात्र काल सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मराठे हे रस्ता ओलांडताना अचानक टाटा कंपनीच्या भरधाव ट्रकने (क्र. एम.एच. आर.जे ११ जीसी ०५१३) त्यांना जोरदार धडक दिली. यावेळी त्यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. परंतु अपघात घडताच चालक वाहनांसह पसार झाला. सदर अपघात हे खडकी बायपासला घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली…
मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण भारतात चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्याने सर्वच आनंद साजरा करीत असतांना अनेक नेत्यांनी चांद्रयान-3 लँडिंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. अनेकांनी या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना दिलं. तर नेत्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताचा तिरंगा झेडा आणि चांद्रयानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या तिरंगा झेंड्यांच्या फोटोवरून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला. मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं की, “मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून यावर कुठलाही आळा बसत नाही आहे. नुकतेच उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपी हा दिल्ली परिवहन महामंडळामध्ये बस कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. पीडित महिला ही 2010 ते 2017 या काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये टायपिस्ट म्हणून कार्यरत होती. मात्र बाळ झाल्यानंतर तिने काम थांबवले होते. तिमारपूर…
जालना: वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आल्याने अवघ्या राज्यात मोठी खळबळ माजली आहे. एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोहेला याने तरुणीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर कॅफे शॉपमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या तरुणाने कंपार्टमेंट खोली घेऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे तरुणीला गर्भधारणा झाली. यामुळे तरुणी खूपच घाबरली. यानंतर तिने सोहेलला सांगितल्यावर सोहेलने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. गोळ्या खाऊन देखील गर्भपात झाला नाही. नंतर त्याने पुन्हा गोळ्या आणून दिल्या. मात्र पुन्हा पण गर्भपात झाला नाही. नंतर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिची प्रकृती…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकारी लाच घेताना लाच लुचपत विभाग कारवाई करीत आहे. पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकीला डाग राज्यात लागला आहे. तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश हरी चव्हाण (वय-39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी संतोष हरणे यांच्याशी गट क्रमांक 718 क्षेत्रातील 5 एकर 29 गुंठ्याचा व्यवहार केला आहे. मात्र, यामध्ये…
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहराला सांस्कृतिक व विद्येचे माहेर घर असे म्हटले जाते पण पुण्यात हत्येचे सत्र थांबता थांबत नाही. काही ना काही कारणातून हत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. क्षुल्लक कारणातून पुन्हा हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे. नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. शैलेश रमेश मांडगीकर असे हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे अशी फरार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. शैलेश मांडगीकर, राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे…

