Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेत्रीने सोडले मौन ; साखरपुड्या बाबत केला खुलासा !
    राज्य

    अभिनेत्रीने सोडले मौन ; साखरपुड्या बाबत केला खुलासा !

    editor deskBy editor deskJuly 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    मराठीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नाव कायम ठेवणारी व आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे नाव आता कलाविश्वासाठी नवीन राहिलेलं नाही. त्यामुळे बऱ्याचवेळा ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. ती नेहमीच सोशल मिडीयावर देखील सक्रीय असते.

    जंगली चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या पूजाविषयी सध्या चाहत्यांमध्ये मागील काही दिवसांपासून नवीन चर्चा जोर धरु लागली आहे. पूजाने गुपचूप साखरपुडा उरकल्याचे म्हंटले जात होते. अखेर यावर पूजाने मौन सोडले आहे. काही दिवसांपुर्वी पूजाने इंस्टाग्रामवर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले होते. या फोटोत ती खुपच सुंदर दिसत होती. मात्र या फोटोमध्ये पूजाच्या नेटकऱ्यांना एक अंगठी दिसली. यावरून तिचा साखरपुडा झाला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र यावर स्वत: पूजाने प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले की, ” असं काहीही नाही.मी अंगठी उजव्या हातात घातली आहे. माझा साखरपुडा झालेला नाही. ही बातमी मलाही खूप उशिरा कळली.” याचबरोबर “साखरपुडा करण्यासाठी आयुष्यात कोणीतरी हवं”, असंही ती म्हणाली. त्यामुळे अद्याप पूजाचा साखरपुडा झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही पूजाच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, पूजाने आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी आहे. लवकरच ती ‘मुसाफिरा’ या चित्रपटात दिसणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कष्टकरी कुटुंबातून मुंबई कोर्टापर्यंत; भगवान नन्नवरे यांची प्रेरणादायी वाटचाल

    August 11, 2026

    शालार्थ घोटाळ्याचा जळगाव कनेक्शन धक्कादायक! ६६ संस्था, ८४९ जण संशयाच्या भोवऱ्यात

    August 11, 2026

    राष्ट्रीय महामार्गांच्या हद्दीत नवीन ढाबे, हॉटेलला ब्रेक; अनधिकृत बांधकामे ६० दिवसांत हटवण्याचे आदेश

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.