Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नऊ महिन्याच्या मुलासह त्याने गाठले पोलीस स्टेशन अन दिली पत्नीच्या हत्येची कबुली !
    क्राईम

    नऊ महिन्याच्या मुलासह त्याने गाठले पोलीस स्टेशन अन दिली पत्नीच्या हत्येची कबुली !

    editor deskBy editor deskJuly 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    देशातील अनेक गुन्हेगारी तोंडवर काढत असतांना गेल्या काही महिन्यापासून प्रेमात जुडलेले विवाह पुढे जावून शेवटच्या टोकावर पोहचत असल्याच्या अनेक घटना समोर येवू लागल्या आहे. आसाम राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका तरुणानं पत्नी आणि सासू-सासऱ्यांची हत्या आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात घडली. तिघांच्या हत्या करुन त्यानं ९ महिन्यांच्या मुलासह पोलीस ठाणं गाठलं. आपण तिघांची हत्या केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिली आणि आत्मसमर्पण केलं. त्यानं दिलेली माहिती ऐकून पोलिसांनी त्यानं सांगितलेलं ठिकाण गाठलं. तिथे तिघांचे मृतदेह होते. नाजीबूर रहमान बोरा असं आरोपीचं नाव आहे. त्यानं चाकूनं भोसकून तिघांना संपवलं. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली आहे.

    नाजीबुर रहमान बोरा आणि संघमित्रा घोष यांचा विवाह लॉकडाऊनमध्ये झाला होता. नाजीबुर मॅकेनिकल इंजिनीअर आहे. जून २०२० मध्ये तो फेसबुकच्या माध्यमातून संघमित्राच्या संपर्कात आला. काही महिन्यांनंतर दोघे पळून कोलकात्याला गेले. ऑक्टोबरमध्ये त्यांनी लग्न केलं. संघमित्राचे आई-वडील तिला पुन्हा घरी घेऊन आले. २०२१ मध्ये त्यांनी संघमित्रावर घरात चोरी केल्याचा आरोप केला. पोलिसात एफआयआरदेखील दाखल करण्यात आला. त्यामुळे संघमित्राला एक महिना न्यायालयीन कोठडीत राहावं लागलं. जामिनावर बाहेर आल्यानंतर ती आई, वडिलांकडे राहू लागली. जानेवारी २०२२ मध्ये संघमित्रा आणि नाजीबुर पुन्हा एकदा पळाले. यावेळी दोघे चेन्नईला गेले. तिथे ५ महिने राहिले. दोघे आसामला परतले, त्यावेळी संघमित्रा गर्भवती होती. ती नाजीबुरसह त्याच्या घरी राहत होती. गेल्या नोव्हेंबरमध्ये तिला मुलगा झाला. यानंतर चार महिन्यांनी संघमित्रानं नाजीबुरला सोडलं आणि ती आई, वडिलांच्या घरी गेली. तिनं नाजीबुरविरोधात पोलीस तक्रार दाखल केली. नाजीबुर मारहाण करत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं. त्यानं हत्येचा प्रयत्न केल्याचाही दावा केला. यानंतर नाजीबुरला अटक झाली. नाजीबुरला २८ दिवसांनी जामीन मिळाला.

    मुलाला भेटण्यासाठी तो संघमित्राच्या घरी पोहोचला. मात्र संघमित्राच्या आई वडिलांनी त्याची भेट होऊ दिली नाही. २९ एप्रिलला नाजीबुरच्या भावानं संघमित्रा आणि तिच्या कुटुंबियांविरोधात पोलीस तक्रार नोंदवली. २४ जुलैला दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला. मुलाला भेटू देत नसल्यानं नाजीबूर संतापला. त्यानं पती आणि तिच्या आई, वडिलांची हत्या केली. त्यानंतर त्यानं ९ महिन्यांच्या मुलाला घेऊन पोलीस ठाणं गाठलं आणि गुन्ह्याची माहिती दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.