अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी सर्पदंश झालेल्या एका दहा वर्षीय बालकाला दोन ठिकाणी वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याला सुरुवातीला जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले होते. परंतु, तेथेही त्याच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. नंतर त्याला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश राजेंद्र भिल असे या मृत बालकाचे नाव आहे. आकाश याला जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सर्पदंश होताच आकाशच्या मित्रांनी आरडाओरड केली. बालकाच्या काकांनी गावातील काही लोकांकडून दुचाकीची व्यवस्था करुन आकाश याला जानवे येथे प्राथमिक…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून असलेला अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने मंगळवारी बॅरेकमध्ये रुमालाच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. इतर बंदिवानांनी त्याला वाचवत खाली उतरविले. सोनवणे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खुनाच्या गुन्ह्यात अमोल सोनवणे हा २६ ऑगस्ट २०२१पासून जिल्हा कारागृहातील कोविड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. दि. २९ रोजी रात्री अचानक कोविड बॅरेकमधील बंदिवानांचा आरडाओरड चालू झाला. त्यामुळे या सर्व जणांनी धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल हा रुमालाने कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.
जळगाव : प्रतिनिधी जळगावसह कुसूंबा येथील कार चोरट्यांना रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. विशाल संजय सपकाळे (21, रा.कुसुंबा, जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) अशा अटकेतील संशयितांची नावे आहे असून त्यांच्याकडून चोरी केलेली कार जप्त करण्यात आली. जळगाव शहरातील शिव कॉलनी परीसरात राहणारे रवींद्र हरी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीची इंडिका कार क्रमांक (एमएच 19 एपी 3860) ही 6 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाला…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात प्रेमाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना वाढल्याचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणत बाहेर येवू लागल्या असतांना एक धक्कादायक घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. कोंढवा येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक तरूण एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक दिवसांपासून एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. याप्रकरणी त्या मुलीने तिच्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर तिच्या आईने त्याला समजावयचा प्रयत्न केला असता, त्या मुलाने तिच्या आईला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश (वय २४) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो हा. मात्र या सणापूर्वी उत्तर प्रदेशातील एका गावात दुर्दैवी घटना घडली. तेथे एका मुलीला तिची आई ओरडली. यामुळे नाराज झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत थेट कालव्यातच उडी मारली. ते पाहून तिला वाचवण्यासाठी तिच्या दिव्यांग भावानेही पाठोपाठ उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच गोंधळ माजला. तातडीने पोलिसांना फोन करण्यात आला. सध्या पोलिसांचे पथक गोताखोरांच्या मदतीने भाऊ आणि बहिणीचा शोध घेत आहे. मात्र काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने लोक घाबरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरजवळील दुबेपूर गावात…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी तबब्ल ६९३९ जागांची भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची नावे, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पदांची नावे – ग्रहवस्त्रपाल, वस्त्रपाल, भंडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील एका छोट्या गावात नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या करुन नंतर स्वत: देखील आत्महत्या केलीची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्य हादरले आहे. हि घटना भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सेलोटी गाव साखर झोपेमध्ये असताना पहाटेच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की संतप्त नवऱ्याने पत्नीच्या डोक्यामध्ये लाकडी पाट घातला. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नवऱ्याने देखील टोकाचे पाऊल उचलले. बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याने देखील कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. भारती भारत चाचेरे (४० वर्षे)…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यात आज पहाटेपासून रक्षाबंधन सण साजरा होत असतांना या सणावर वर्धा या शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाला असून हि घटना वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज ३० ऑगस्ट सकाळी आठ वाजता घडल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेत अशोक सावरकर(वय 55), बाळू शेर (वय 60) आणि सुरेश झिले (वय 33) या तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावायला तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांच्या नाका बंदी दरम्यान गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले असून त्याला गावठी पिस्तूल देणाऱ्या अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना पोलिसांना रवींद्र उर्फ माया तायडे हा तरूण गावठी कट्टयासह आढळून आला. त्याची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तायडे याची चौकशी केली असता त्याने नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून १९ हजार रूपयात हा कट्टा खरेदी केल्याची माहिती दिली. यासाठी मुक्ताईनगर येथील मयूर विजयसिंग राजपूत याचा फोन पे क्रमांक वापरल्याचेही त्याने सांगितले. या…
पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली अन परिवारातील चार सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांची नावे समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यात चिमणाराम बेणाराम चौधरी(वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15) आणि सचिन चिमणाराम चौधरी(वय 13) अशी मृतांची नावे असून सदर कुटुंब हे राजस्थानमधील…

