Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव वनविभाग सक्रीय : १ लाखांचा मुद्देमाल जप्त !
    क्राईम

    जळगाव वनविभाग सक्रीय : १ लाखांचा मुद्देमाल जप्त !

    editor deskBy editor deskAugust 2, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    यावल अवैध फर्निचर दुकानांवर आज यावल वन विभागाने कारवाई केली. यात सुमारे १ लाख रूपये किंमतीची वन लाकुड व मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यावल गावातील शेख असलम शेख असगर (मुन्शी फर्निचर) येथे वन कर्मचार्‍यांना सह सापळा रचून धाड सत्र राबवले. त्यात विना परवाना अवैध साग नग – 5 (घन मीटर 0.062) तसेच रंधा मशीन – 1 असा एकूण 21984 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. किनगाव येथील रामचंद्र पाटील यांचे अवैध फर्निचर दुकानवर सापळा रचून धाड टाकली असता त्यात दरवाजा फालके 08, पलंग 02, सोफा सेट 01, साग नग 72, चौरंग 04, तसेच लाकूड कट्टर मशीन 01, असा एकूण 75,000 रूपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला.

    मुख्य वनसरंक्षक ऋषिकेश रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली यावल उपवनसंरक्षक जमीर शेख, यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे,यावल पूर्व वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या नेतृत्वाखाली वनपाल रविंद्र तायडे, वनपाल राजेंद्र ख़र्चे, वनरक्षक भैय्यासाहेब गायकवाड, अनिल पाटील, वाहन चालक सुनील पाटील यांनी संयुक्तरित्या कार्यवाही केली. पुढील तपास वनपाल डोंगर कठोरा, वनपाल वाघझिरा हे करीत आहेत.

    furniture store vamvibhag Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावात चोरट्यांच्या टोळीची दहशत; चार चोरटे सीसीटीव्हीत कैद

    May 30, 2026

    भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात एसीबीची धडक!

    May 29, 2026

    जळगावात राजकीय धक्का! माजी खासदारांच्या निकटवर्तीयावर पोलिसांची कारवाई?

    May 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.