जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून जात असताना अचानक वळण घेतलेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी रात्री गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय समोर झाला. याप्रकरणी दोन्ही वाहन चालकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या ट्रकचे (क्र. एमएच ४०- बीएल ६५८७) चालक सुनीलकुमार रमेशचंद्र चव्हाण (रा. नागपूर) यांनी अचानक वळण घेतले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची (क्र. एमएच १९ एएक्स ०३५१) या ट्रकच्या मागील बाजूला धडक लागली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पोकॉ किरण पाटील यांच्या…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अपघाताची मालिका नियमित सुरु असून पुन्हा एकदा जळगाव शहरात अपघात झाला आहे. शहरात दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर दूधवाटप करण्यासाठी निघालेल्या वाहनाचे अॅक्सिलेटर अडकल्याने अनियंत्रित झालेल्या या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला पूजा वासुदेव तलरेजा (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी मासूमवाडीतील डायमंड हॉलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील पूजा तलरेजा या दुचाकीवरून मासूमवाडीकडे जात होत्या, तर महामार्गावरून दुधाचे वाहन (एमएच ०५ आर ७५८०) दूधवाटप करून तुकारामवाडीकडे जात होते. एका दुकानावर दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर चालक वाहन घेऊन पुढे जात…
जळगाव : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज दि 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मावळत्या महीला प्रदेशाध्यक्ष विद्या ताई चव्हाण, माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आ.नवाब मलिक, आ.बाळासाहेब पाटिल आ शशिकांत शिंदे. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात आज सकाळी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या घरातून तीन जण सुदैवाने बाहेर पाडण्यात यशस्वी झाले होते. पण या घटनेत एक वृद्ध महिला इमारतीत अडकल्याने मनपा प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. पण दुर्देवाने या पथकाला अपयश आले असून यात ७५ वर्षीय वृद्ध राजश्री सुरेश पाठक यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील इमारतीचे मालक पाठक हे सकाळच्या सुमारास पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. आज देखील मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक व्यक्ती संतापात काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे यात संतापाच्या भरात नको ते कृत्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथे घडली आहे. तेथे एका इसमाने रागाच्या भरात त्याच्या शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. खरंतर दोघांमध्येही बकरीवरून भांडण सुरू होते. बघता-बघता ते एवढे वाढले की त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि संतापाच्या भरात त्या इसमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या इसमाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. शेजाऱ्याची बकरी आरोपीच्या शेतात घुसली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. यामुळे आरोपी अतिशय नाराज झाला असल्याने पीडित इसम हा 31 वर्षांचा असून आरोपी हा 28 वर्षांचा आहे.…
हिंगोली : वृत्तसंस्था दोन सख्या चुलत भाऊ – बहिणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात घडली आहे. राज्यात मोठी धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या बाळापुर हद्दीत असलेल्या डोंगरकडा या गावातील आनंदा पंडित (वय २८) व ऐश्वर्या पंडित (वय १८) या दोघी चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याले आहे. डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह आखाडा…
मुंबई : वृत्तसंस्था जिलेबीचे पैसे मागितल्याने ग्राहकाने जिलेबी मालकाच्या डोक्यात लोखंडी माप मारल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली असून यावेळी जिलेबी मालकाचा तोल जाऊन तो उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात विक्रेता गंभीर भाजला असून, त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. राजेश यादव असे पीडित जिलेबी विक्रेत्याचं नाव आहे. वागळे इस्टेट परिसरात पीडित राजेश यादव यांचा जिलेबीचा गाडा आहे. या गाड्यावर आरोपी जिलेबी खाण्यासाठी आला होता. जिलेबी…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने राज्यातील पोलीस सर्तक असतांना तीन चोरटे धोकादायक शस्त्रांचा वापर करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मालाड पोलिसांनी त्यांना अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्या वेळी हे तिघे मालडमधील रामचंद्र गल्लीत संशयास्पद रितीने फिरताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे आणखी दोन साथीदार राहूल आणि सलमान या दोघांनी तिथून पोबारा केला. तर नाझीर चौधरी, गोविंद उर्फ छोटू आणि लक्ष्मण निर्मल मात्र या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. आणि त्यांनी मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला. नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी…
मुंबई : वृत्तसंस्था पती व पत्नीचे प्रेम हे सुंदर असते. पण कधी कधी या प्रेमात मिठाचा खडा पडला तर अशी जोडी कुठल्याही टोकाला जावून निर्णय घेत असते. अशीच एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीलाही गेल्या 40 वर्षांपासून डायबिटिजचा त्रास आहे. समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शकुंतला बालुर असे मयत पत्नीचे नाव आहे. दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो. पोलिसांनी मुलाला…
जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात एक जुनी इमारत मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोसळली असून या इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावल्या आहेत. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली राजश्री सुयोग पाठक वय – ५२ ही महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब…

