चाळीसगाव : प्रतिनिधी चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वालझिरी येथे मुख्य महादेवाच्या मंदिरातून एका 55 वर्ष वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एका महिलेने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवार निमित्त चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वालझीरी येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील दिघी येथील निर्मलाबाई बारकू परदेशी या दर्शनासाठी गेले असता. त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीचा असल्याचा फायदा घेत एका महिलेने त्यांचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाचे लंपास केल्याचे घटना समजतात त्यांनी लागले चाळीसगाव ग्रामीण…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील शाहू नगरात दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सासरी पत्नी व मुलांना घेण्यासाठी आलेल्यांसोबतच पैशावरून हा वाद झाला व त्यांच्यावर दगडफेक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यासीन नगरातील रहिवासी परवेझ शेख सईद हे बांधकाम ठेकेदार इद्रीस शेख इकबाल यांच्याकडे मिस्तरी काम करीत होते. ठेकेदाराकडून कामासाठी आगाऊ उचल म्हणून परवेझ यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २५ हजार रुपये त्यांना परत दिले होते. रविवारी रात्री दहा…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील सत्तेतवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पारदर्शी कारभार करू असे म्हणत सत्ता स्थापन केली होती, त्यांच्या मंत्रिमंडळातील एका दिग्गज मंत्र्यावर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात दहा टक्के कमीशन तसेच पाणी योजनेतील राज्यातील सर्व निविदेत कमीशन, दारू तसेच वाळू व्यवसायातूनही कमीशन घेणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री आहेत. असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या जळगाव दौऱ्यानिमित्त एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव…
नागपूर : वृत्तसंस्था नागपूरला राज्याची उपराजधानी म्हटले जाते. नागपूरची आता क्राईम सिटी अशी ओळख बनत चालली आहे. जेष्ठ नागरिक, घरात एकट्या महिलांना गाठून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी एक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला लुटल्याची घटना घडली आहे. पालखीसाठी पैसे मागत त्यांना धागा दिला आणि महिलांना बेशुद्ध करून त्यांचं मंगळसूत्र घेऊन पळ काढला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही चोरट्यांचा पोलिसांनी काही तासातच शोध घेतला. मात्र यांनी त्या धाग्याला कुठला द्रव लावला होता, त्यामुळे या महिला बेहोश झाल्या याचा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापुरा भागात पटेल गल्ली येथे राहणारी वयोवृध्द महीला तसलीमबी मोहम्मद सैय्यद, वय 60 वर्षे, या बकरी ईद सणानिमीत्त धुळे येथे त्यांच्या मुलीकडे दिनांक २६ जून पासून ते दिनांक ८ जुलै दरम्यान गेलेल्या असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन २३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व २५ हजारांची रोकड असा एकुण ४८ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर बाबतीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक ८ जुलै रोजी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व गुन्हयातील गेल्या मालाचा शोध घेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वारंवार गुन्हे घडवून आणत असल्याप्रकरणी आज १ महिलेसह पाच गुन्हेगारांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कडून चौकशी करुन हि टोळी अनेक भागात घरफोडी करीत असल्याच्या संशयावरून व वारंवार गुन्हे करण्याचे सवयी आहे असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दपार प्रस्ताव क्र. ०१ / २०२३ प्रमाणे टोळी प्रमुख १) भावना जवाहरलाल लोढा वय ३८ रा. अयोध्यानगर, जळगाव, २) अनिल रमेश चौधरी (वय ४०), रा. अयोध्यानगर, जळगाव, ३) सैय्यद सजील सैय्यद हारुन…
मुंबई : वृत्तसंस्था चित्रपट क्षेत्रात गेल्या काही दिवसापूर्वी मोठी खळबळ उडवून देणारी बातमी प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे उडाली होती. सध्या नितीन देसाई मृत्यू प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून आर्थिक विवंचनेमुळे नितीन देसाई यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात आलं. यादरम्यान आता नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी भाजपचे नेते नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ठाकरे कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. चंद्रकांत देसाई यांनी त्यांचा स्टुडिओ विकत द्यावा म्हणून त्यांना धमक्या देण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. इतकेच नाही तर यामागे मातोश्रीच्या निगडीत व्यक्ती असल्याचे देखील राणे म्हणाले आहेत. नितीन देसाई हा एक चांगला…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गंगापूर येथे . विद्युत वजन काट्याचा शॉक लागून विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. भारती घनश्याम पाटील (रा. गंगापुरी ता. धरणगाव), असे मयत विवाहितेचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खानदेशचे ग्रामदैवत असलेल्या कानुमातेच्या उत्सवासाठी आपल्या गावी गंगापूर येथे आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घनश्याम रायभान पाटील हे आपली पत्नी ४ वर्षाची मुलगी आणि १० वर्षाच्या मुलासह सुरत येथे वास्तव्यास आहेत. कानबाईच्या उत्सवासाठी ते आपल्या परिवारासह गावी आले होते. रविवारी सकाळी ते आई-वडिलांसोबत शेतात भेंडी तोडायला गेले होते. सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घरात भारतीबाई यांच्या लहान मुलांनी रडत-रडत आरडा ओरडा करायला सुरुवात केली. मावशी,…
धरणगाव : प्रतिनिधी राज्यातील शिवसेनेचा वाढता प्रभाव बघता अनेक पक्षातील नेत्यासह कार्यकर्ते मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहे. नुकतेच जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. धरणगाव शहरातील काँग्रेससह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अनेक कार्यकर्त्यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निलेश इंगळे, भगवान महाजन, चंद्रकांत जाधव, राजेंद्र बोरसे, सुभाष चौधरी, मुकेश चौधरी, शांताराम चौधरी, घनश्याम सातव, शब्बीर सय्यद, अखिल कुरेशी, सचिन कासार यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सत्कार केला. याप्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते माजी…
पुणे : वृत्तसंस्था पार्टीत जबरदस्तीने आग्रह करुन तरुणीला दारु पाजली. दारुमुळे त्रास होऊ लागल्याने तिला हॉटेलमध्ये नेऊन तेथे तिच्यावर अत्याचार केला. तिचे न्युड फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी सौदागर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ५८५/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिषेक सत्तुजी टिक्कल (रा. चंदननगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक टिक्कल याने जुलै २०२२ मध्ये फिर्यादीस पार्टीसाठी विमाननगर येथील ईफिनगट क्लबमध्ये बोलावून घेतले. पार्टीत ड्रिक घेण्याचा आग्रह केला. तिने नकार दिल्यानंतरही जबरदस्तीने आग्रह करुन दारु…

