पुणे : वृत्तसंस्था जावयाने त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने चक्क जावयाचे अपहरण केले. पुण्यातून त्याला बळजबरीने चारचाकीत बसवत थेट बीडला नेले. तेथील एका गोठ्यात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड)…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना चुकून झाडल्या गेल्या आणि यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. यात अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जखमी झालेल्या तरुणावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी अभय छबन वाईकर (वय 22), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभय छबन वाईकर आणि अविष्कार तुकाराम धनवडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या नियमित वाढ होत असून आज नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळीजवळ शुक्रवारी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला असून करंजाळी बस अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहचली आहे… मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील चार तरुण देवदर्शनासाठी आले होते. यावेळी ते देवदर्शन करून नाशिकहून परतीचा प्रवास करत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील करंजाळी गावानजीक नाशिकहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक जीजे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका तरुण आणि तरुणीला गावकऱ्यांनी शिक्षा दिली. त्याची सगळीकडं चर्चा सुरु झाली आहे. ज्यावेळी नको त्या अवस्थेत तरुण आणि तरुणी सापडली. त्यावेळी त्या दोघांच्या डोक्यावरील केस गावकऱ्यांनी कापले. त्याचबरोबर त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. हा सगळा प्रकार गावातील एका व्यक्तीनं पोलिसांच्या कानावर घातला. त्याचबरोबर त्या दोघांना रात्रभर बांधून ठेवलं होतं अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दोघांची सुटका केली. ज्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. तिच्या सांगण्यावरुन तिथल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर गावातील ज्या लोकांनी त्या घृणास्पद वागणूक दिली अशा लोकांना सुध्दा ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण झारखंड राज्यातील आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात महिलासोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता बिहार राज्यातील एका आदिवाशी महिलेवरती सहा जणांनी अत्याचार केल्याचं एक प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालं आहे. ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या सहापैकी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण बिहार राज्यातील आहे, बिहार राज्यातील मुंगेर येथील आदिवासी महिला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी सुध्दा त्या महिलेवरती आरोप केले आहेत. हा गुंता सोडवताना पोलिसांनी दमछाक झाली एवढं मात्र नक्की आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सागर हंसदा, हट्टू हंसदा, शिवा टुड्डू, मुकेश हंसदा आणि बट्टू उर्फ सूरज…
यवतमाळ : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरभक्कम असा परतावा मिळतो, असे आमिष दाखवून यवतमाळातील तब्बल नऊ जणांना गंडविण्यात आले. या ठगबाजाला आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले. पोलिस कोठडीत असलेल्या ठगबाजाचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. त्याने मैत्रिणीवर चक्क ५२ लाख रुपये उडविले. ताज हॉटेल लखनऊ, रेडिसन ब्ल्यू हॉटेल नागपूर येथेही लाखोंच्या पाठ्य त्याने केल्याची कबुली दिली. अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने यवतमाळातील नऊ जणांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले. यात त्याला यवतमाळातील महादेवनगर येथे राहणाऱ्या मीरा फडणीस यांनी सहकार्य…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील वेगवेगळ्या परिसरातून तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर सम्राट कॉलनी येथील एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राकेश जगताप याला अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव, अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी, जळगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी. संदिप गावीत, जळगाव जिल्हा यांनी जिल्ह्यात मोबाईल चोरी संदर्भात गुन्ह्यांची वाढ झाली असल्याने सदरचे गुन्हे उघडकिस आणणे चाबत एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे किसन नजनपाटील, यांनी सफी विजयसिंग पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभारे,…
पारोळा : प्रतिनिधी मद्य प्राशन करुन भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकने रस्त्यांच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय लहान चिमुरडीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.8 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अंतरावरील वस्तीत दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवगाव येथील पूजा अनिल भील (वय ६ ) ही गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात असलेल्या रस्त्याच्या कडेला चालत होती. या वेळी देवगाव फाट्याकडून देवगावकडे तामसवाडी येथील नीलेश संजय बेलदार (वय २४) या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर गाडी (एमएच- ०४, एचएस- ४७३१ ) ने पूजाला मागून जबर धडक दिली.…
धरणगाव : प्रतिनिधी गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी हैराण झाले असतांना आता शेतातील पिके कोमजू लागले आहे. यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भिषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तलाठी, ग्रामसेवक, यांच्यासह रोमकचच्या उपस्थितीन सुकलेल्या पिकाची काही शेतात नजर पाहणी करण्यात आली. यावेळी मृग, उदिड आधी पिकांचा उत्पन्नाम ६००% ७००% घट झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रत्येक . पिकाचे – शेतकऱ्यांचे पंचनामे 90-92 कबी विभाग, महसुल, विमा कंपनी यांच्या मार्फत उख्यात आले यावेळी कृषी अधिकारी – पदमाकर वसेक पाया जो क्रिया…
पाचोरा : प्रतिनिधी येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम 9 सप्टेंबर ऐवजी आता 12 सप्टेंबर ला होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे. 9 तारखेला मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी होणारा दि.२६ ऑगस्ट रोजीचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता त्यानंतर हा दौरा ९ सप्टेंबर रोजी होईल असे सांगत आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र त्यात पुन्हा एकदा बदल झाला असून आता हा दौरा १२…

