अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेसह तिघांनी एकाच्या डोक्यावर लोखंडी रॉड तसेच कंबरेवर आणि छातीवर चाकूचा वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास चोपडा रस्त्यावर घडली. महिलेस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामकृष्ण रमेश पाटील (मंगळग्रह मंदिर रस्ता) हा रविवारी रात्री आपला मित्र रतीलाल उर्फ पिंटू सुभाष पाटील याला सोबत घेऊन फिरायला गेला होता. त्यानंतर घराकडे परत येत होता. रामकृष्णशी एक महिन्यापूर्वी भांडण झालेले सनी सुरेंद्र अभंगे (३२), सचिन सुरेंद्र अभंगे (३५), ज्योती जितेंद्र अभंगे (४०, सर्व कंजरवाडा, चोपडा रोड) यांनी कुरापत काढून वाद सुरू केले. तिघांनी शिवीगाळ…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था एका ३७ वर्षीय महिलेला तिचे एडिट केलेले अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अनोळखी पाच पाकिस्तानी मोबाइल क्रमांकधारकांवर नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला ३७ वर्षांची असून भाईंदर पूर्व परिसरात कुटुंबासह राहते. तिला पाकिस्तानी असलेल्या कोड मोबाइल क्रमांकावरून अनोळखी व्यक्तीचे वारंवार कॉल येत होते. नंतर तिला तिचे एडिट केलेले अश्लील फोटो पाठवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची तसेच तिच्यासह परिवाराला जिवे मारण्याची धमकी देण्यात येत होती. रविवारी महिलेच्या फिर्यादीवरून त्या पाच पाकिस्तानी कोड क्रमांक असलेल्या मोबाइलधारकांवर आयटी अॅक्टनुसार गन्हा दाखल केला आहे.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉलनीमधून १८ वर्षीय तरुणी कुणालाही न सांगता निघून गेल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉलनीत खाजगी नोकरी करणारे व्यक्तीची १८ वर्षाची मुलगी 9 सप्टेंबर रोजी रात्री 11 ते सकाळी १० रोजी ७ वाजे दरम्यान घरातील सर्व कुटुंब झोपलेले असताना ती कुणासही काही एक न सांगता निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला असता मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून हरवल्याची नोंद करण्यात आली आहे तपास सहाय्यक…
धरणगाव : प्रतिनिधी दरोडा घालण्याच्या तयारीत असणाऱ्या ५ दरोडेखोरांना धरणगाव तालुक्यातील पाळधी ते सावदा प्रचा शिवारात ९ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास धरणगाव पोलिसांनी शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून बोलेरोवाहन , कुऱ्हाड, लोखंडी सळई, मिरची,सूर,असे साहित्य आढळून आले असून त्यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मिळालेल्या माहितीनुसार, दि. १० ऑगस्ट रोजी मध्यरात्री ११ वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या धरणगाव पोलिसांच्या पाळधी ते सावदा प्रचा शिवारात गावाचे अलीकडे संप्तशिंगी मातेच्या मंदीराजवळ महेंद्र बुलेरो गाडी क्र. (MP- ४६-G-११४७) हिच्यात दरोडा घालण्याचा साहित्यासह दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना त्यांना तात्काळ अटक करण्यात आली. गाडीमध्ये एक लोखंडी कु-हाड लोखंडी सळई सुताचा…
दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक तरुणीसह महिलासोबत धक्कादायक घटना घडत असतांना पुन्हा एकदा अशा घटनेने दिल्ली हादरली आहे. एका पतीने आपल्या दोन मुलींसमोर पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत हे धक्कादायक पाऊल उचलले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. दिल्लीतील जाफराबाद भागात ही घटना घडली आहे. ज्यावेळी पती आपल्या पत्नीची चाकू भोसकून हत्या करत होता त्यावेळी त्याच्या दोन मुली देखील घटनास्थळी उपस्थित होत्या. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराचा मोठा धक्का या दोन्ही मुलींना बसला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नी निशा आणि तिचा पती साजिद आपल्या दोन मुलींसह…
वाशीम : वृत्तसंस्था वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावचे सुपुत्र आकाश आढागळे हा जवान भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असतांना लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलंय. गेल्या ११ वर्षापासून भारतीय सैन्यदलात आकाश आढागळे (वय ३१) कर्तव्य बजावत होता. त्यांच्या मृत्युमुळे आढागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना ८ सप्टेंबर २०२३ रोजी एका दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुर्घटनेमध्ये आकाश यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान रविवारी (१० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आकाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, ४ वर्षाची तनवी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे…
बुलढाणा : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातून राज्यातील अनेक शहरात नको ती घटना घडत असते. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी आरोपी त्रिशरण रामदास इंगळे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील आकाश सुरेश परघरमोर या २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपीच्या पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचा संशयातून दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले आहे. आरोपी त्रिशरण इंगळे याची पहिली पत्नी मुले येथे सोडून काही वर्षापूर्वी पळून गेली. दुसऱ्या…
सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या वर्षापासून सोशल मीडियातील वादातून अनेक ठिकाणी राडा झाल्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. दरम्यान एका विशिष्ठ समुदायास या मुळे लक्ष्य करण्यात आले आहे. परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले…
मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सर्वच गणेशोत्सव मंडळांनी तयारी आपली तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळाच्या तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका जंक्शन, शालीमार हॉटेलजवळची ही घटना आहे. एका मंडळातील काही कार्यकर्त्यंनी प्लास्टिक स्क्रॅपवाल्याकडून ५ हजार रुपयांच्या वर्गणीची जबरदस्ती केली. मात्र अशाप्रकारे जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्या सूचनांमध्ये कार्यकर्त्यांनी वर्गणी वर्गणीच्या स्वरूपातच मागावी, खंडणी मागू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे म्हटले होते.…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नागीकाना एअरलाइन्समध्ये नोकरी, खोटे क्रेडिट कार्डसह खोटे लोन देण्याचे आमिष दाखवून कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना घालण्याचा गोरखधंदा वर्धा पोलिसांनी उधळून लावला असून, बदरपूर साऊथ दिल्ली येथील उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या दोन कॉल सेंटरवर कारवाई करून दोघांना अटक केली. फसवणुकीतील ८९ हजार रुपये रोख तसेच मोबाइल, सिम कार्ड असा एकूण २ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सुभाष सहानी (३०), राकेश रामप्रकाश राजपूत (३०) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील रहिवासी प्रांजली दिनेश चुलपार हिने मोबाइलवर जॉब सर्च अपडेट नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यामधील फॉर्म भरला होता. ८ जून २०२३…

