धुळे : प्रतिनिधी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीला मारहाण करणाऱ्या वडिलांसह काकाविरोधात साक्री पोलिस ठाण्यात मुलीने शनिवारी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. हि घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाडसे या गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता नीलेश भामरे (वय २१, रा. नाडसे ता. साक्री) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्मिता आणि नीलेश या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या लग्नाला मुलीच्या पालकांची परवानगी नव्हती. तरीदेखील मुलीने प्रेमविवाह केला. तो राग मनात धरून वडील मधुकर यशवंत नेरकर (वय ४८) आणि काका अशा दोघांनी मुलीला मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता…
Author: editor desk
जामनेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीचा नात्यानेच आत्याचा मुलगा असलेल्या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला व लग्नानंतरच्या संबंधातून पीडीत तरुणी गर्भवती राहिली. तरुणी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पतीसह तिचे आई-वडील, आत्या आणि मामा यांच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई वडीलांनी तिच्या आत्याच्या मुलासोबत लावला. विवाहानंतर तरुणी कात्रज पुणे येथे सासरी पतीसोबत गेली. जून 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पतीने शरीरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर तरुणी गर्भवती झाली. या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे येथील हवालदार रवींद्र ओझय्या चिप्पा यांनी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर मनपात सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकापर्ण करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी शहरात आले असता त्यांचे राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांनी भेट घेतल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात राजकीय चर्चेला उधान आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी आज सकाळी १० वाजता जळगावात आले असता त्यांचे माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांचे यांचे चिरंजीव विशाल देवकर यांच्यासह हेमंत पाटील, धवल पाटील, सुरज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशाल देवकर यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकी बाबत शुभेच्या देखील दिल्याचे…
पुणे : वृत्तसंस्था राज्यात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जितेंद्र शिंदे असे मयत आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाराष्ट्राला हादरावून सोडणार्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रविवारी पहाटे त्याने येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळातील तरुणास सायबर भामट्यांनी टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल पावणेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळातील चेतन कन्हैय्या फिरके (गिरीजा कॉलनी, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान राज चंद्रिका सांगणार्या युजर आयडीवरील भामट्याने टेलिग्रामवरून संपर्क साधला व टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा (बोनस) मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला व तरुणाच्या एसबीआय खात्यातून वेळोवेळी आठ लाख 82 हजारांची रक्कम हडपली तसेच केवळ सहा हजार 825 रुपये ऑनलाईन ट्रान्सपर केले मात्र अन्य रक्कम ट्रान्सपर न…
जळगाव : प्रतिनिधी देशातील हुकूमशाही मोडायची वेळ आलेली आहे. २०२४ ला सरकार बदलणारच आणि हा हुकूमशाहीचा फुगा तुम्हीच पडणार. आणि ही ताकद शिवसेना व तुमच्यामध्ये आहे. आतापासून सरकार हादरायला लागला आहे. गद्दार म्हणता आम्ही शिवसेची काँग्रेस होऊ देणार नाही. पण पंचवीस वर्षे भाजपसोबत सत्तेत असताना आम्ही कधीही शिवसेना भाजपचे होऊ द्यायचे नाही. आणि आता त्यांनी गुलामगिरी पत्करून दिल्लीला फेऱ्या मारत आहे. त्यामुळे कमळाबाईची पालखी हलवायला ही काही शिवसेना नाही, अशी ठाकरे शैलित उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य शासनावर जळगाव येथील सभेत केली. जळगाव येथे आज महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तेरा वर्षीय मुलगी हिला सार्वोटे तालुका अमळनेर येथील साहिल आणि भुऱ्या दोघांची पूर्ण नाव माहित नाही यांनी मोटरसायकलवर फिरविण्याचा उद्देशाने बसवून त्या अल्पवयीन मुलीला धार तालुका अमळनेर गावाजवळील पीर बाबाच्या टेकडी जवळ नेऊन दमदाटी करून जबरदस्तीने तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याप्रकरणी पिढीतेने दोघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून साहिल आणि भुऱ्या यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी मेहरुण परिसरातील बगीच्याजवळ ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे, दीक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सीताराम चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) हे दबा धरून बसले होते. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस तेथे पोहोचले. आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्ट्यासह सापडला होता, तर त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यापैकी पाच महिन्यांपासून फरार असलेल्या विशाल राजू अहिरे याला रेल्वे स्थानकातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल राजू अहिरे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेल्वेने जळगावात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी लाठ्याकाठ्यांच्या मारहाणीत सागर रमेश पालवे (२४, रा. मालदाभाडी, ता. जामनेर) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर), नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील नवीन गुरांचा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्टमध्ये सागर रमेश पालवे हा दोन वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान ट्रान्सपोर्टवर असताना त्याच ठिकाणी चालक म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू बिजलाल बोदडे व नीलेश रोहिदास गुळवे यांनी खोलीमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण…
भुसावळ : प्रातिनिधी भुसावळ तालुक्यातील फुलगावसह वरणगावातील रेणुकानगर परिसरात दि. ८ रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत आठ ते दहा घरांची कुलपे तोडून दोन तोळे सोने व सहा हजार रोख रक्कम लांबवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील रेणुकानगरमध्ये चोरट्यांनी चार ते पाच घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच फुलगावमध्ये एका घरातून दोन तोळे सोने व सहा हजार रु रोख रक्कम चोरून नेल्याचा अंदाज आहे. रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान काळे रेनकोट अंगात घातलेले तीन चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलगाव येथील घराचे मालक बाहेर गावी गेले आहेत.…

