मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षापूर्वी टिकटॉक सोशल मिडिया मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाले होते. त्यावरचे अनेक लोक टिकटॉक स्टार म्हणूनही प्रसिद्ध होतात. असाच एक तरूण देखील टिकटॉक स्टार म्हणून लोकप्रिय झाला खरा पण नको त्या उद्योगात अडकल्यानंतर त्याला तुरूंगाची हवा खावी लागली. मुंबईतून हा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या आरोपी तरूणाला पोलिसांनी अटक केली. पण त्याने नेमकं असं काय केलं ? अभिमन्यू असे आरोपीचे नाव असून तो एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होता. अभ्यास करून, प्रामाणिकपणे मेहनत करणारा अभिमन्यू हा त्याच्या आवडीमुळे टिकटॉक स्टारही बनला. त्याचे अनेक व्हिडीओ तो ॲपवर पोस्ट करत असे. मात्र अचानक काय…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक नागरिकाचे रक्षण करता याव, व कायदा कोणी मोडू नये, याकडे लक्ष देणं हे खरंतर पोलिसाचं काम असतं. कायदा मोडणाऱ्यांना वठणीवर आणणं हे देखील त्यांचं कर्तव्य असतं. पण हा रक्षकच भक्षक बनला तर ? कायद्याचं पालन करण्यास शिकवणाऱ्याने तो तोडून लोकांना त्रास दिल्याची एक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. एका मुलीची विनयभंग करणाऱ्या पोलिसाची नागरिकांनीच चांगलीच धुलाई केली असून त्याचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी त्या पोलिसाचे कपडे काढून त्याला खांबाला बांधत त्याला बेदम चोप दिला. एवढेच नव्हे तर त्यानंतर नागरिकांनी तेथील स्थानिक पोलिसांना या घटनेची सूचना दिली आणि घडलेला प्रकार कथन केला. घटनास्थळी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका तरुणाला दोन तरुणांनी जबर मारहाण करीत त्याचबरोबर त्याच्या प्राव्हेट पार्टमध्ये बिअरची बॉटल घुसवली असल्याची तक्रार त्याने पोलिस स्टेशन दिली आहे. ज्यावेळी त्या तरुणाने दोन तरुणांच्या विरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असल्याचं समजलं. त्यावेळी आरोपी तरुणांनी त्या तरुणाला अपहरण केलं. दीड महिना त्या तरुणाला बांधून ठेवलं होतं. त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा सुरुवातील तक्रार समजून घेतली नाही असं तो तरुण सांगत आहे. हे प्रकरण हरियाणा राज्यातील पलवल शहर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येतं, पीडित तरुणाने दोन आरोपींवरती गंभीर आरोप केले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सुध्दा कारवाई करण्यास मनाई केली होती असा आरोप तरुण करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था सात वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करून, तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी व्यक्तीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कैथलचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ.गगनदीप कौर यांनी निकाल देताना सांगितले की, आरोपीचा गुन्हा अक्षम्य आहे. हि घटना हरयाणामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीशांनी ३४ साक्षीदार तपासल्यानंतर, १०० पानांच्या निकालात दोषीला फाशीची शिक्षा सुनावली. यावेळी दोषी पवनकुमारने दयेची याचना केली, परंतु न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली. इयत्ता दुसरीतील मुलीला आमिष दाखवून आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली, असे फिर्यादीत म्हटले. दुसऱ्या दिवशी मुलीचा अर्धवट जळलेला मृतदेह जंगलातून सापडला होता.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या बरेली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) उदित पवार यांच्या कार्यालयातील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एसडीएमच्या कार्यालयात एक तक्रारदार कोंबडा झाल्याचे दिसते. घटनेचा व्हिडीओ व्हायरल होताच अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. कोंबडा झालेल्या तक्रारदार व्यक्तीचे नाव पप्पू लोधी असे आहे. त्यांनी सांगितले की, मी एसडीएम पवार यांच्या कार्यालयात मंदिराशेजारील जमिनीसंदर्भात अतिक्रमणाची तक्रार करण्यासाठी गेलो होतो. यावेळी त्यांनी मला कोंबडा बनायला सांगितले. हे प्रकरण जिल्हा दंडाधिकारी शिवकांत द्विवेदी यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर एसडीएम पवार यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. तक्रारदार स्वेच्छेने कोंबडा…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदारसंघात होत असलेल्या विकास कामे पाहून व पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील, युवानेते प्रतापराव पाटील यांच्या कामाचा धडाका पाहून धरणगाव तालुक्यातील शामखेडा येथील तरुणांनी पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. यामध्ये गणेश दिगाणे.जितेंद्र भिल.प्रवीण ठाकरे.विनोद शिंदे.किरण भिल. राकेश भिल.अजय भिल.प्रकाश सातपुते.दीपक भिल.संजय भिल.रतीलाल भिल.लालसिंग भिल यांनी प्रवेश केला या प्रवेशावेळी उपस्थित मध्ये युवासेना तालुका प्रमुख दीपक भदाणे.उपतालुका प्रमुख अमोल पाटील.मागासवर्गीय सेनेचे तालुका प्रमुख नवल पारधी.युवासेना चे समाधान पाटील भोने.महेंद्र पाटील.दीपक श्रीखंडे. युवासेना विधानसभा क्षेत्र प्रमुख आबा माळी शेतकरी सेनेचे रावसाहेब पुडाआबा पाटील उपस्थित होते
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव येथील विवाहित बहिणीचे गावातील एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून दोन भावांनी बहिणीचा कु-हाडीचे घाव घालून निर्घृणपणे खून केल्याची घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारात शनिवारी सकाळी घडली. याप्रकरणी फर्दापूर पोलिसांनी दोन भावांसह आई. वडिलांवर गुन्हा दाखल केला. चारही आरोपींना पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने २० सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. चंद्रकलाबाई धोंडिबा बावस्कर (३५) असे मयत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील चंद्रकलाबाई धोंडिबा बावस्कर ही पतीसोबत वाद झाल्याने काही दिवसांपासून माहेरी आई, वडिलांकडे एकटीच राहत होती. त्यांना एक मुलगा, एक मुलगी आहे. त्यांचे तोंडापूर येथील एका तरुणासोबत प्रेमसंबंध…
अमरावती : वृत्तसंस्था अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दाट धुक्यामुळे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन ५०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चार तरुण ठार झाले. तर, चार गंभीर जखमी झाले आहेत. मडकी (ता. चिखलदरा) येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत व जखमी तेलंगणातील आदिलाबाद येथील आहेत. आठ युवक रविवारी सकाळी चारचाकीने चिखलदरा येथे फिरण्यासाठी येत होते. अपघातात चालक शेख सलमान शेख चांद (२८), शिवा कृष्णा अदांकी (३०), वैभव लक्ष्मना गुल्ली (२९) व वानापारथी कोटेश्वर राव (२७) यांचा मृत्यू झाला. जखमींना त्वरित अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. सर्व तरुण तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत. अपघाताची माहिती मिळताच…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील निशाने ग्रामपंचायत शिवसेनेचा भगवा फडकला असून सरपंचपदी सौ मंगला रवींद्र पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्यासोबत गावाचा विकास करण्यासाठी आम्ही गेलो त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी आज मंगलाताई पाटील त्यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी त्यांचा सत्कार केला. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्ह्याचे प्रवक्ते माजी नगराध्यक्ष पी एम पाटील सर,भाजप जिल्हा सोशल मीडिया प्रमुख टोनी महाजन,ग्रामपंचायत सदस्य उपजिल्हा प्रमुख शेतकरी सेना शरद भाऊ पाटील,शिवसेनेच्या महिला तालुका प्रमुख पुष्पाताई पाटील,तालुका संघटक हेमंत भाऊ चौधरी,रवींद्र चव्हाण,आर एस पाटील,केतन पाटील,रवींद्र कंखरे, दोणगावचे उपसरपंच पाटील,एकनाथ महाजन, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावातील एका १९ वर्षीय तरुणाने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या तरुणांचे नाव तेजस धोंडू पाटील (वय-१९) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तेजस पाटील हा आईवडील आणि लहान बहिण राहायला असून त्याच्या वडिलांचे गॅरेजचा व्यवसाय आहे. तेजसचे आयटीआय झाल्याने तो वडीलांना गॅरेजच्या व्यवसायात मदत करत होता. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता तेजस हा आईवडील आणि बहिण…

