Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका इंजीनियरिंग विद्यार्थाने आपल्याच कोचिंगच्या टीचरचा अश्लील व्हिडिओ फेक अकाउंटवर इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. अपलोड करताच हा व्हिडिओ काही क्षणात व्हायरल झाला, व्हिडिओबाबत कळताच टीचरने परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली. हि घटना उत्तर प्रदेशातील कानपुर परिसरात घडली आहे. पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी तपास सुरु केला आणि प्रकरणात एका इंजीनियरिंग विद्यार्थाला अटक केली आहे. हे प्रकरण कानपुर येथील काकदेव येथील आहे. मिळाल्या माहितीनुसार परिसरात एक कोचिंग इंस्टिट्यूट आहे. कोचिंग इंस्टिट्यूटमधील टीचर इंस्टाग्रामचा वापर करत नाही. मात्र सोशल मीडियावर अप्सवर त्यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे त्यांना कळाले संबंधित संपूर्ण माहिती त्यांनी पोलिसांना सांगितली. पोलिसांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील चार गुन्हेगारांना जळगाव जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी काढल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद आणि धरणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोळी प्रमुख शेख मुश्ताक शेख मुसा कुरेशी (42), टोळी सदस्य आरीरफ शेख तस्लीम खान (24), असलम खान अयाज खान (30, सर्व रा.कुरेशी मोहल्ला) या टोळीवर नशिराबाद, एमआयडीसी, जामनेर, भुसावळ बाजारपेठ, धरणगाव, पहूर, चाळीसगाव शहर, नशिराबाद व चाळीसगाव रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात ठाण्यात आठ गंभीर गुन्हे दाखल असल्याने हद्दपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी या गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून दोघांनी एका वृद्धाच्या अंगावर रात्री झोपेतच अॅसिड टाकले. त्यात गंभीर जखमी झालेल्या वृद्धाचा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना जाफराबाद तालुक्यातील म्हसरुळ येथे उघडकीस आली. श्रीरंग हरीबा शेजूळ (८५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध सोमवारी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. श्रीरंग शेजूळ हे १ सप्टेंबर रोजी रात्री घरासमोरील अंगणात बाजेवर झोपले होते. तेव्हा संशयितांनी त्यांच्या अंगावर अॅसिड फेकले. त्यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले. सोमवारी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. गावातील…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था पत्नी झोपेत असताना पतीने तिची हत्या केल्याची बातमी उघड झाली आहे. हत्या केल्यानंतर पतीने घरातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने नांदेड जिल्हा हादरला आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुका आज सकाळी घडलेल्या या हत्येच्या घटनेने हादरला आहे. किनवट तालुक्यातील भिसी गावात ही घटना घडली आहे. पतीने आपल्या पत्नीची झोपेत हत्या केली आणि त्यानंतर त्याने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रुपाली भालेराव (वय २९), मारुती भालेराव (वय ३५) अस पती पत्नीचे नाव आहे. बुधवारी सकाळी रुपाली यांचा मृतदेह घरातील पलंगावर आढळून आला, तर मारुती यांचा मृतदेह देखील घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची…

Read More

अकोला : वृत्तसंस्था देशसेवेचे स्वप्न रंगविणाऱ्या तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. बुलडाणा येथील संग्रामपूर तालुक्यात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरातील लोकांना धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सैन्यात भरती होण्यासाठी गणेश विष्णू लोणकर हा तरुण प्रयत्न करत होता. त्यासाठी तो रोज धावण्याचा व व्यायामाच सराव करायचा. सराव करुन घरी आल्यावर गणेशचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हृदयविकाच्या झटक्याने हा मृत्यू झाला आहे. या घटनेने गणेश कुटुंबियांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. सैन्यात भरती होण्यासाठी गणेश रोज सराव करायचा. सकाळी व्यायाम करुन गणेश घरी आल्यानंतर त्याने चहापाणी केले. चहापाणी केल्यानंतर गणेश अचानक जमीनीवर कोसळला. त्यानंतर…

Read More

अहमदनगर : प्रतिनिधी राज्यातील गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणत असतांना एक धक्कादायक बातमी शिर्डीमधून समोर आली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. या घटनेत वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील गुन्हेगारीची सुरुवात अनेकदा प्रेम प्रकरणातून होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले. या हल्ल्यात प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर ती स्वत:च पोलिसांकडे गेली आणि आपण प्रियकरावर हल्ला केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. तिची ही कबुली ऐकून पोलिसही हादरले. मात्र त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने कृत्याची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक स्वयंपाक करणारा इसम, कूक नाराज होता, कारण त्याची मालकीण त्याला छोट्याशा गोष्टीवरून ओरडली होती. मात्र या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने तिला अतिशय क्रूर शिक्षा दिली. त्या कूकने त्याच्या मालकिणीला थेट वीजेच्याच तारेने करंट दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पीडित महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तो कूक वीजेची तार घेऊन तिथेच उभा होता. तिला जाग येताच त्याने तिला वीजेच्या तारेने झटके दिले. पीडित महिला शिक्षिका असल्याचे समजते. दरम्यान या अमानुष कृत्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील एका इमारतीत रविवारी दुपारी ही संपूर्ण धक्कादायक घटना…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नकली वस्तूंची विक्री करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिवाय खरे सोन्याचे दागिने असल्याचे भासवत नकली दागिने विक्री करत आहेत. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला असून यातून नकली सोने विक्री करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यात नकली साहित्य विक्री करणारे गावोगावी फिरत आहेत. यातच तिन लोक सोन्याचे नकली झुंबर घेउन गावात फिरत होते. याची माहिती गावकऱ्याना मिळाली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी तिघांना अडवत आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता; असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असल्याने अनेक लोक पर्यटन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतांना अशाच एका पर्यटणठिकाणाहून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवण तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेला युवक समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. सुफयान दिलदार शेख (वय 23) असे युवकाचे नाव असल्याची माहिती पाेलीसांकडून प्राप्त झाली. सुफयान दिलदार शेख हा मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर त्याच्या समवेत असलेल्या मित्राला मालवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुफयान हा कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील रहिवासी आहे. ताे समुद्रात बुडाल्याची माहिती त्याच्या…

Read More