Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकी कोसळली ५०० फुट खोल दरीत !
    क्राईम

    चारचाकी कोसळली ५०० फुट खोल दरीत !

    editor deskBy editor deskSeptember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती : वृत्तसंस्था

     

    अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे दाट धुक्यामुळे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन ५०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघातात चार तरुण ठार झाले. तर, चार गंभीर जखमी झाले आहेत. मडकी (ता. चिखलदरा) येथे रविवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला. मृत व जखमी तेलंगणातील आदिलाबाद येथील आहेत.

    आठ युवक रविवारी सकाळी चारचाकीने चिखलदरा येथे फिरण्यासाठी येत होते. अपघातात चालक शेख सलमान शेख चांद (२८), शिवा कृष्णा अदांकी (३०), वैभव लक्ष्मना गुल्ली (२९) व वानापारथी कोटेश्वर राव (२७) यांचा मृत्यू झाला. जखमींना त्वरित अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. सर्व तरुण तेलंगणा ग्रामीण बँकेचे कर्मचारी आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. चिखलदरा परिसरात सध्या पावसाळी मोसम असून परिसरावर धुक्याची चादर पसरली आहे. चालकास घाटातील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे हा अपघात झाला.

    Accident Amravati
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारावी निकालात घसरण; राज्याचा टक्का खाली, कोकण पुन्हा अव्वल!

    May 2, 2026

    मुंबईत चार जणांच्या मृत्यूचे गूढ अधिक गडद; टरबूज ‘क्लीन’, तरी मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

    May 2, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.