Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी  भडगाव तालुक्यातील एका 36 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटेआमिष दाखवून तिला जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मे २००८ ते १५ मे २०२३ पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा – ड्रायव्हर, रा. वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव ता. चाळीसगाव . पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल ३९ जण गंभीर जखमी झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाने मालवाहू ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले. चालकासह पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील राहणारे आहेत. आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे दि.१५ रोजी शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला आहे. अपघातात अकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हनुमंत अजूर (वय ३२), महानंदा अजूर (३२), शोभा अजूर (३२), अंबिका अजूर (१४, चौघेही रा. बडची, ता. अथणी, जि. बेळगाव), हनुमंत जाधव (४२) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील…

Read More

सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील प्रियंका पडोळे यांनी फिर्याद दिली आहे यानुसार, प्रदीप पडोळे, अर्चना पडोळे, बाळासाहेब पडोळे, प्रतीक्षा पडोळे (चौघे रा. साळमाळगेवाडी, ता. मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, प्रियंका आणि प्रदीप यांचे लग्न १७ डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. लग्नानंतर सासरकडील लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून मारहाण केली.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू सदृश्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगावपासुन जवळच असलेल्या शिरसोली गावात देखील डेंग्युने थैमान घातले असून, एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. याशिवाय गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आणखी रुग्ण आहेत. जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था शहरातील एका नाल्यातून पोलिसांना डोके व हात नसलेला मृतदेह सापडला होता. शेजारील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बेपत्ता तरुण म्हणून त्याची ओळख पटली परंतु अंत्यसंस्काराच्या काही तासांपूर्वी चंदीगडमध्ये हा युवक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जिवंत सापडला. त्यानंतर नाल्यात सापडलेला मृतदेह आता मेरठ पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. ९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता. मेरठ पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्यानंतर मुझफ्फरनगर पोलीस सतर्क झाले. काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागात एका कुटुंबाचा २० वर्षांचा मुलगा मॉन्टी कुमार बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय मेरठमधील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये…

Read More

मुझफरनगर : वृत्तसंस्था सासऱ्यानेच सूनेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उत्तरप्रदेशमधील मुझफरनगरमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पिडीतेने पतीला याबाबत सांगताच पतीने तिला मारहाण करत तिलाच घराबाहेर हाकलून दिले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात सुन एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्यानेच आपल्या गर्भवती सुनेला वासनेचे शिकार बनवले. उत्तर प्रदेशच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील हे संपूर्ण प्रकरण आहे. पिडीतेचे 19 ऑगस्ट 2022 रोजी गावातील तरुणासोबत लग्न झाले होते. तरुणीच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी पिडीता घरात एकटी असताना सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत फरार झाला. पिडीतेने संध्याकाळी घरी आल्यानंतर पतीला आपबीती…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात घरगुती वाद होत असतात पण अनेक वाद हे काही वेळाने सुटत असतात पण काही वाद मात्र शेवटच्या टोकाला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने तिच्या नवऱ्याला पेटवून दिले. कोटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनमारी गावात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. अनुपूर जिल्ह्यातील मनमारी गावात नवरा-बायकोमध्ये वाद झाला. वादाची ठिणगी इतकी पेटली की, बायकोने रागाच्या भरात त्याला पेटवून दिलं. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने दुचाकीतील पेट्रोल काढून ते अंगावर ओतले. त्यानंतर पेटवून दिले, असा आरोप पीडित पतीने केला आहे. या घटनेत अंगद प्रसाद…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच राष्ट्रीय महामार्गावरून भंडाराकडे जात असलेला मालवाहू ट्रक जात होता. याचवेळी समोरून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याच्या दिशेने येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील चालकासह आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी शिवारात घडली असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान भंडारा येथून लाखनीकडे प्रवाशी वाहनात आठ प्रवाशी बसून जात होते. दरम्यान पलाड़ी शिवारात कारमधील चालक समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. ओव्हरटेक करत असताना अंदाज चुकला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या…

Read More

रावेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका गावात एका महिलेने तीन लाखांची खंडणी न दिल्यास पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करेल, अशी धमकी प्रियकराच्या पत्नीला दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. निंभोरा पोलीस स्टेशनला 30 वर्षीय महिलेविरोधात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील एका महिलेचे एका पुरूषासोबत संबंध असल्याने प्रेयसी असलेल्या या महिलेने चक्क प्रियकराच्या पत्नीला धमकी देत तुझ्या व माझ्या पतीचे संबंध असून ते कायम सुरू ठेवायचे असतील तर मला तीन लाख रुपयांची खंडणी देत अन्यथा मी तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. तक्रारदार विवाहितेच्या नातेवाईक महिलेलादेखील…

Read More