Author: editor desk

जालना : वृत्तसंस्था जालना शहरातील साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या पित्याला कदीम जालना पोलिसांनी अकोला शहरातून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली असीम, ती सध्या साडेपाच वर्षांची आहे. या पती-पत्नीत वाद होत असल्याने त्यांनी न्यायालयामार्फत घटस्फोट घेतला. घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. वडिलांना दरमहिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली आहे. सदर मुलगी सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी व्हॅनमधून नेहमीप्रमाणे येत होती.…

Read More

अमरावती : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील समृद्धी महामार्ग अनेक अपघातामुळे नेहमीच चर्चेत येत असतांना नुकताच जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ हा अपघात झाला. या घटनेत कार मधील एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ अपघात झाला. कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या. या घटनेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासह वेगवेगळे सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश उर्फ नाना गंगाराम कोळी (३७, रा. पिंप्राळा, जळगाव) याच्यावर रामानंद नगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलिस हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा गणेश कोळी त्यांच्यावर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील त्याच्यात कोणतीही सुधारणा न झाल्याने रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याला स्थानबध्द केले.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना भिवंडी शहरातून समोर आली आहे. कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव गावातील शामबाग येथे असलेल्या येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री समोर आली आहे. रात्री खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलोसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल होत खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय महिलेची धारधार हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. या खोलीत…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने गुरू-शिष्य परंपरेचा अवमान करत असे कृत्य केले ज्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. शिक्षकावर एका विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा आरोप आहे. तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासलं आणि नंतर बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील आहे. तेथील सरकारी शाळेचे शिक्षक राजेश कुमार यांना सोमवारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीचे संकट मोठे होत आहे. त्यातच बिहार राज्यात दारुबंदी आहे. पाजणे, तयार करणे आणि विकण्याला सुध्दा बंदी आहे, असं सगळं असताना सुध्दा बिहार राज्यात दारुची तस्करी सुरु असल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारुचा साठा सापडला आहे. सध्या बिहारमध्ये एका पोलिसावरती दारु विक्रीचा आरोप लावण्यात आला आहे. राज्यात ची जबाबदारी पोलिसांवरती आहे. त्या पोलिस अधिकाऱ्यासोबत चार पोलिस कर्मचारी लोकांना विक्रीसाठी दारु पुरवत असल्याचा आरोप आहे. बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील हा प्रकार आहे. शनिवारी रात्री ज्यावेळी दारुबंदी पथकाने धाड टाकली, त्यावेळी हे प्रकरण उजेडात आला. दारुबंदी पथकाने…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथे २६ वर्षीय तरुणाजवळ ५ जिवंत काडतुसासह एक पिस्टल आढळुन आल्याने मोठी खळबळ उडाली होती. ऐन गणपती उत्सवाच्या पुर्व संध्येला पाचोरा पोलिसांनी सापळा रचून तरुणास जाळ्यात घेतल्याने पुढील होणारा अनर्थ टळला असुन पाचोरा पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोराडखेडा गावातील गैइबन शहा अली बाबा दर्ग्याजवळ एक तरुण कमरेला पिस्टल लावुन फिरत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या कडुन पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस काॅन्स्टेबल योगेश पाटील यांना मिळाली. १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सदरची माहिती पो. काॅ. योगेश पाटील यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांना दिल्याने त्यांनी लगेचच पोलिस…

Read More

पुणे : वृत्तसंस्था मागील महिन्यात पुण्यातील कोंढवा परिसरात तीन नराधमांकडून सामूहिक अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना अताजी असतांना आता एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना कोथरुड परिसरात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खाऊ देण्याच्या बहाण्यानं ३० वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. राजेश चोरगे असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडितेच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत. फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. शनिवारी फिर्यादी यांची ४ वर्षीय नात घराबाहेर खेळत होती. तेव्हा तेथे आरोपी चोरगे…

Read More

वरणगाव पोलिसात पतीविरोधात गुन्हा नोंद भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील हतनूर येथे वाढीव नऊ दरवाजांच्या कामासाठी आलेल्या मजुराने स्वतःसाठी पिण्यास आणलेली दारू पत्नीने पिल्याचा राग आल्याने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना शवविच्छेदनानंतर उघडकीस आली. शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी वरणगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या ठिकाणी परराज्यातील मजूर कामासाठी रहिवास करीत आहे. यापैकी जितेंद्र हेमब्रम व शांतीदेवी जितेंद्र हेमब्रम हे दोघे देखील या ठिकाणी मजुरीचे काम करतात. रविवारी दुपारी जितेंद्र याने स्वतः पिण्यासाठी आणलेली दारू पत्नी व शेजारी असलेल्या करणी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र समोर येवू लागले आहे. त्यामुळे हताश झालेले शेतकरी आता राज्य सरकारकडे मदतीची मागणी करीत आहे. धरणगाव तालुक्यातील नारणे आणि बाबुळगाव या गावातील शेतकऱ्यांच्या पिके पाण्याखाली गेले आहेत काल तापी नदीला महापूर आल्यामुळे वीस बिघे शेती पूर्ण पाब्याखाली गेल्याने शेतकरांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीमध्ये सुकदेव गोविंदा मराठे, जितेंद्र सुकदेव मराठे, गणेश सुकदेव मराठे, शांतीलाल सुकदेव मराठे या शेतकरीचे शेत बाभुळगाव शिवारात असून यांनी यंदा कापसाची लागवड केली होती. पण दोन दिवस झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read More