Author: editor desk

सोयगाव : प्रतिनिधी  दोन भावांनी प्रेमसंबंधाच्या संशयातून आपल्या सख्ख्या बहिणीची कुर्‍हाडीचे घाव घालून हत्या केली. ही घटना सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शेतात घडली. या घटनेत चंद्रकला धोंडू बावस्कर (35, तोंडापूर) या महिलेचा मृत्यू झाला. खून प्रकरणी आई-वडिलांसह दोघा भावांविरोधात फर्दापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील राक्षा शिवारातील शमीम शाह कासम शाह याचे शेत आहे. शमीम शनिवारी शेतात काम करत असताना तिथे चंद्रकलाबाई धावत आली. माझे भाऊ आई-वडील मला प्रेमसंबंधांच्या कारणावरून मारून टाकणार असल्याने मला वाचवा, कोठे तरी लपवा, अशी तिने शमीमला विनवणी केली. त्याने तिला बकर्‍याच्या शेडमध्ये लपण्यास सांगितले. त्याच वेळी तिचे भाऊ कृष्णा व…

Read More

पुणे : वृत्तसंस्था प्रियकराने कर्ज न फेडल्याने तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली. शहरातील हडपसर भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून आदर्श अजयकुमार मेनन याला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श अजयकुमार मेनन आणि राणी ऊर्फ रसिका रवींद्र दिवटे यांचे प्रेमसंबंध होते. रसिकाने आदर्शच्या सांगण्यावरून अनेकवेळा क्रेडिट कार्ड, लोन ॲपवरुन कर्ज काढून त्याला ३.७५ लाख रुपये दिले होते. कर्जाचे हप्ते आपण फेडू, असे आश्वासन आदर्शने तिला दिले होते. मात्र, त्याने कर्ज फेडले नाही. गुरुवार रात्री रसिका आणि आदर्श मध्ये या कर्जवरून भांडणे…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  नाशिक एसीबीने एका बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने ३५  लाखांचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती चार लाखांची लाच घेताना चाळीसगाव बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता ज्ञानेश्वर पंढरीनाथ विसपुते (अशोक नगर, धुळे) यांना नाशिकमधील गडकरी चौकात लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी उशिरा करण्यात आल्यानंतर बांधकाम विभागातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या तक्रारदाराने डॉ.शामा प्रसाद मुखर्जी रुरबन या शासकीय योजनेचा माध्यमातून, बांधकाम उप विभाग, ता.चाळीसगाव जिल्हा परिषद, जळगाव अंतर्गत पातोंडा, ता.चाळीसगाव येथे समूह परिसरात क्लस्टर विकसीत करण्याचे काम घेतले होते. या कामाची चार कोटी 82 लाख रुपये रक्कम काढून दिल्याचा मोबदल्यात तसेच कामाच्या अतिरीक्त सुरक्षा अनामत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा कारागृह नेहमीच चर्चेत येत असते. दीड वर्षापासून खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) हा कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या काही अंतरावर पकडण्यात यश आले. त्या बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर परिसरात निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहे. कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय चैत्राम सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत आहे. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ते संदीप अर्जुन थोरात,…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी  ‘तू माझ्याशी लग्न कर, नाही तर तुला मी जिवंत सोडणार नाही. असे म्हणत एका तरुणीनेच तरुणावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. ही घटना पाचोरा येथील तलाठी कॉलनीत शुक्रवारी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या तरुणीस अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील एक नीलेश बोरसे (वय ३५) हे आपल्या परीवारासोबत रहायला आहे. यापूर्वी ही तरुणी व तरुण यांच्यात प्रेमसंबंध होते. दोन वर्षांपूर्वीही लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याबद्दल या तरुणीने नीलेशविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यावरून पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल आहे. शुक्रवारी रात्री ही तरुणी नीलेश याच्या घरी गेली आणि माझ्याशी लग्न कर नाही तर तुला जिवंत…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या बस अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी तर दोन जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ श्री चौधरी ट्रॅव्हल्स (बस क्रमांक :एआर ०१ वाय ०००९) ही खासगी बस मुंबई-नागपूर महामार्गावर दुभाजकाला आदळून पलटी झाली आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर यात असून चालक ठार झाला आहे. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार (वय ३०), रतनलाल कुमावत (वय ४०), जयराम…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  धरणगाव शहरात एका छायाचित्रकार तरुणाने फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळून उत्तम शेती करीत असून नवीन तरुण पिढीला शेती आणि पूरक व्यवसाय करण्यात पण अधिक प्रमाणात रस असल्याचे जाणवत आहे. धरणगावातील छायाचित्रकार सागर पाटील या तरुणाने आपला फोटोग्राफी चा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळून शेती आणि जोड व्यवसाय पण करत एक नवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्याचा ध्यास सुरू आहे. आताच झालेल्या बैलपोळा मध्ये त्यांनी छान पद्धतीने बैल सजवून, त्यांची मिरवणूक काढली.. यात परिसरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग उपस्थित होता..अगदी आनंदाने आणि उत्साहाने सर्वानी बैलपोळा साजरा केला.सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ग्रामीण भाग, शेती,…

Read More

रावेर : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून रावेर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे बॅकवॉटर रस्त्यावर आल्याने सकाळपासून ऐनपूर-निंबोल रास्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. तर जुन्या अजनाड गावात तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढली असून तहसिलदार बंडू कापसे यांनी येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढत असल्याने तालुक्यातील तापी नदी काठावरील नागरीकांना तहसिलदार कापसे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली असून १५…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने धरणगाव येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता ‘पी.एम. रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होत असलेल्या औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार आहेत. १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारलेले नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी स. ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तेथून परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत असणार…

Read More

रावेर : प्रतिनिधी  दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीकडून रावेरात गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२३ रोजी फैजपूर येथील उप विभागीय दंडाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. मात्र सदर संशयित रावेर शहरात असल्याची व त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यानुसार एक पथक पाठवून खात्री केली असता रावेर शहरातील रामदेवबाबा नगर आकाश लक्ष्मण रील याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा देशी…

Read More