Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आधार ‘केवायसी’ अपडेटच्या नावाखाली तरुणाची साडेपाच लाखांत फसवणूक !
    क्राईम

    आधार ‘केवायसी’ अपडेटच्या नावाखाली तरुणाची साडेपाच लाखांत फसवणूक !

    editor deskBy editor deskJanuary 23, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    शहरातील ओम नगर परिसरातील एका तरुणाला बनावट ‘एसबीआय योनो’ लोगो असलेल्या फाईलद्वारे ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांना गंडविण्यात आले. याप्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, विजय धर्मराज चव्हाण (३५, रा. ओम नगर, जुना खेडी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दि.१७ जानेवारी २०२६ रोजी एका अनोळखी व्यक्तीने ‘आधार केवायसी अपडेट’ नावाने एक संशयास्पद फाईल पाठवली होती. ही फाईल इन्स्टॉल करताच सायबर चोरट्याने विजय यांच्या बँक खात्याची सर्व गोपनीय माहिती प्राप्त करून खात्यातील शिल्लक रक्कमच चोरली नाही, तर त्या खात्याशी संबंधित असलेली एफडीदेखील परस्पर मोडून सर्व रक्कम दुसऱ्या खात्यात वळवली. एकूण ५ लाख ४० हजार ४३९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विजय चव्हाण यांनी सायबर पोलिस ठाणे गाठले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पैशांच्या कारणावरून भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला

    February 11, 2026

    पैशांच्या वादातून भावावर लोखंडी पाईपने हल्ला

    February 11, 2026

    ४५ वर्षीय प्रौढाने घरी कुणीही नसताना घेतला टोकाचा निर्णय !

    February 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.