Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील आव्हाणे येथील संजय मणिलाल पाटील (वय ४५) या युवकाचा गिरणा नदीपात्रात बुडून अंत झाल्याची घटना 3 मार्च रोजी दुपारी १:३० वाजता घडली. संजय पाटील हे एका मिस्तरीकडे कामाला होते. ३ मार्च रोजी धरणगाव तालुक्यातील एका गावात काम आटोपून ते पायी आपल्या आव्हाणे गावाकडे परतत होते. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास गिरणा नदीपात्रातून येताना अचानक त्यांचा पाय घसरला आणि ते खोल पाण्यात बुडाले. नदीकाठी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी धाव घेत संजय यांना बाहेर काढले. संजय पाटील यांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयताच्या पश्चात…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जाम मोहल्ला परिसरातील एका दुकानात सिलिंडरला गळती लागल्यामुळे याचा मोठा भडका उडाला. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पळापळ झाली. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र लाखोंचे नुकसान झाले. ही घटना सोमवार, २ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार,  जाम मोहल्ला परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजेनंतर रोजा इफ्तारी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते, त्याचवेळी एका हॉटेलात गॅसला गळती सुरू झाली. त्यामुळे मोठा भडका उडाला व आगीने रौद्ररूप धारण केले. बाजूला असलेल्या हॉटेलला आगीच्या झळा बसल्या. यात मोठे नुकसानही झाले. पालिकेच्या अग्निशमन बंबालाही पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे विवेक माकोडे यांच्या सहकर्मचाऱ्यांनी त्वरित आगीवर नियंत्रण मिळवले. नगराध्यक्ष गायत्री…

Read More

आजचे राशिभविष्य दि.५ मार्च २०२६ मेष राशी आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या मुलांसोबत घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत मॉलमध्ये खरेदीलाही जाऊ शकता, आनंदात दिवस जाईल. जवळचे नातेवाईक आज तुमच्या घरी अचानक येतील, ज्यामुळे घरात आनंददायी वातावरण निर्माण होईल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही मित्रांकडून सल्ला घ्याल, भविष्यात तुम्हाला याचा फायदा होईल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना आज चांगल्या कंपनीकडून ऑफर मिळू शकते. खाजगी कार्यालयात काम करणाऱ्यांना आज पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वृषभ राशी तुम्ही मित्रांसोबत एखाद्या ऐतिहासिक स्थळाला भेट देण्याची योजना आखाल. आज तुमचा व्यवसाय दुप्पट होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. तुमची मुले आज तुम्हाला अभिमान वाटतील, ज्यामुळे तुमच्या शेजाऱ्यांमध्ये तुमचा आदर वाढेल.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील निवृत्ती नगर परिसरात घरफोडीची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नातेवाईक असलेल्या अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करत सव्वा लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निवृत्ती नगरात राहणाऱ्या लताबाई पंडित सपकाळे (वय ५३) या आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ३ ते ७ फेब्रुवारीदरम्यान नातेवाईक असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे उघड झाले. घरातील दागिने गायब झाल्याचे लक्षात येताच सपकाळे यांनी तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. संबंधित व्यक्तीला घरातील परिस्थितीची माहिती असल्याचा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमान दुर्घटनेबाबत डीजीसीएचा अहवाल समोर आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. अहवालातील निष्कर्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत गंभीर शंका व्यक्त केल्या. अपघातातील काही बाबींकडे ‘क्रिमिनल अँगल’ने पाहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. रोहित पवार यांनी नागरी उड्डाण मंत्रालय, डीजीसीए आणि संबंधित व्हीएसआर कंपनीच्या मालकांमधील कथित जवळीक अधोरेखित करत निष्पक्ष तपासाची मागणी केली. “अपघातापूर्वी बारामती विमानतळाची रेकी झाल्याची चर्चा काही लोकांमध्ये आहे. आमच्याकडे याबाबत ठोस माहिती नाही; मात्र या शक्यतेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले. संपूर्ण घटनेचा सखोल आणि स्वतंत्र तपास व्हावा, अशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान मंगळवारी विधिमंडळ परिसरात दोन आमदारांमध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार भास्कर जाधव यांच्यात विधानसभा इमारतीच्या पोर्चमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना घडली. सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विविध राजकीय मुद्द्यांमुळे आधीच गाजत असताना हा नवा वाद समोर आल्याने चर्चांना वेगळे वळण मिळाले आहे. सभागृहातील आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने वातावरण अधिकच तापले. माहितीनुसार, विधानसभा सदस्य राहुल आवाडे यांची कन्या सानिका आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे सुपुत्र अजय यांच्या विवाहसोहळ्याच्या पत्रिका आमदारांच्या खासगी सहाय्यकांकडून विधिमंडळ परिसरात वितरित केल्या जात होत्या. एकाच ठिकाणी सर्व सदस्य उपस्थित असल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पहूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ६३ किलो ७१० ग्रॅम गांजासह दोन अलिशान कार आणि ६ आरोपींना अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत २२ लाख ७४ हजार २०० रुपये इतकी आहे. याप्रकरणी ६ जणांविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, जळगावकडून पहूरच्या दिशेने एका इन्होव्हा कार क्रमांक (एमएच ०४ डीजे २०४२) मधून अंमली पदार्थांची तस्करी केली जाणार होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने आणि पहूर पोलिसांनी वाकोड गावाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मास्टर कॉलनी परिसरात बुधवारी (४ मार्च) पहाटे ४ वाजता गोवंश वाहतूक करणाऱ्या संशयित वाहनावरून दगडफेक आणि तोडफोडीची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनास्थळी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर दोन तरुण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  अमळनेर पोलिसांना संशयित वाहनाबद्दल माहिती मिळाल्यानंतर त्यांनी अमळनेरपासून जळगावपर्यंत थरारक पाठलाग सुरू केला. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात पोहचल्यावर काही स्थानिक तरुणांनीही पोलिसांना मदतीसाठी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पहाटे चार वाजेच्या सुमारास वाहन मास्टर कॉलनीत प्रवेश केल्यावर परिस्थिती चिघळली. संशयित वाहन अडवल्यानंतर परिसरात संतप्त जमावाने दगडफेक सुरू केली. एका कारसह दोन दुचाकींचा मोठ्या प्रमाणावर तोडफोड…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने आपली उमेदवार यादी जाहीर करत राजकीय वातावरण तापवले आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंग यांनी ही घोषणा केली. महाराष्ट्रातून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते आणि माया इवनाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यातील सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर 9 मार्चपर्यंत माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. माजी मंत्री आणि सध्या भाजपच्या महाराष्ट्र युनिटचे सरचिटणीस असलेले विनोद तावडे यांना उमेदवारी देत पक्षाने संघटनात्मक अनुभवाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट केले आहे. तावडे यांनी शालेय शिक्षण, उच्च व तांत्रिक…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही अनेक पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली नाही. विशेषतः Sharad Pawar यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे विरोधी आघाडीत संभ्रमाचे वातावरण असून सत्ताधारी महायुतीनेही परिस्थितीवर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार सहा जागा महायुतीकडे, तर एक जागा महाविकास आघाडीकडे जाण्याचे चित्र आहे. महायुतीत भाजपला चार जागा, शिवसेना  शिंदे गटला एक आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीला एक जागा अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले…

Read More