Author: editor desk

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था वॉचमन कुलूप लावून निघून गेला आणि शाळेच्या वर्गखोलीत चिमुकली अडकली. अखेर नागरिकांनी कुलूप तोडून मुलीची सुटका करत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी मनपाच्या रोजाबाग शाळेत घडली. छत्रपती संभाजीनगरातील रोजाबाग येथील शाळा सकाळच्या सत्रात भरते. सकाळी आठ वाजता मुले शाळेत येतात. साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर घरी जातात. सोमवारी शाळा सुटल्यानंतर वॉचमन विठ्ठल बमने याने शाळेच्या खोल्यांना कुलूप लावले आणि तो निघून गेला. परंतु एका वर्गात चिमुकली अडकली. पहिल्या वर्गात शिकणारी ही चिमुकली दार ठोठावून रडकुंडीला आली. दार उघडले जात नाही असे लक्षात आल्यावर ती रडू लागली. शाळा सुटली तरी मुलगी घरी आली नाही,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  बांधकामाच्या ठिकाणी खेळत असलेल्या सात वर्षाची राधिका दीपक पावरा या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास गांधी नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी नगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी राहणारे दीपक पावरा हे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांना चार मुली असून रविवारी त्यांनी मुलींसोबत जेवण केले. त्यानंतर मुली बाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. बांधकामाच्या ठिकाणी खेळत असतांना राधिका ही सापडत नसल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. बराच वेळ होऊनही ती कोठेच न सापडल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत पाहिले असता, राधिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुतेक लोकांना साप या शब्दाचा उल्लेख जरी कानावर पडला तर भीती वाटते. मग एखादा साप आपल्या अंगावर कळत- नकळतपणे चढला आणि तोही किंग कोब्रा असेल तर काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच! कारण कोब्रा हा सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याचा एक दंश मानवासह अनेक प्राणिमात्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. असाच एक भला मोठा किंग कोब्रा झाडाखाली बसलेल्या एका तरुणाच्या शर्टात शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची तर भीतीने गाळण उडालीच, पण ज्या युवकाला या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना करूनच आपल्यालाही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानादेखील संदीप भास्कर ढोके (२४, रा. गेंदालाल मिल) हा सुरा घेऊन फिरताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात त्याला हद्दपार केले होते, मात्र साडेसहा महिने होत नाही तोच हा तरुण शहरात फिरताना आढळून आला. वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संदीप ढोके याला पोलिस अधीक्षकांनी दि. ३ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा तरुण गेंदालाल मिल भागात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले असता तो सरा घेऊन फिरताना आढळला याप्रकरणी पो. कॉ. रतनहरी गिते यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  घरात कोणीच नसताना वैशाली विजय सोनार (वय २८) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे त्यांच्या चहा विक्रीच्या दुकानावर असताना घरी एकट्याच असलेल्या त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे पती सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी आले व घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील तरुणीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चक्क १५ वर्षीय मुलीला पेयातून गुंगीचे औषध देत दोघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना मुलुंडमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी लैंगिक अत्याचार, पोक्सो अंतर्गत रविवारी रात्री उशिराने गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड परिसरात १५ वर्षीय मुलगी कुटुंबीयांसोबत राहते. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी निलेश पुवज हरीजन (२१) याला अटक केली आहे. तर अन्य साथीदार नटराजन हरीजन (३७) याचा शोध सुरू आहे. तो सध्या तमिळनाडू येथे असल्याची माहिती समोर येत आहे. मुलीने निलेशकडे पैशांची मागणी केली. त्याने मुलीला घरात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील प्रत्येक नागरिक सध्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन खरेदीचा मोठा वापर करीत आहे. पण अनेकदा या वापरामुळे अनेकांना फटका देखील बसला आहे. गुगलवरून विटामिन सी च्या गोळ्या ऑनलाइन खरेदी करणे एका महिलेला महागात पडले. याप्रकरणी तिने वांद्रे पोलिसात तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार शीला कपूर (६४) यांचा गारमेंट व्यवसाय होता. मात्र सध्या त्या घरीच आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, २२ सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास त्या गुगलवर विटामिन सी च्या गोळ्यांचा शोध घेत होत्या. त्यादरम्यान त्यांना एक वेबसाईट सापडली ज्यात विटामिन सी च्या गोळ्यांचा डब्बा ३ हजार ९५…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रेमात वेड्या झालेल्या मामी व भाच्याने आपल्या मामाची हत्या केल्याची धक्कादायक घटना यूपीच्या बरेलीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भाचा, त्याचे साथीदार आणि मामीला अटक केली. पोलिसांनी सांगितलं की, ज्या व्यक्तीची हत्या झाली, त्याच्या पत्नीचं मानलेल्या भाच्यासोबत अफेअर सुरू होतं. मामी, भाचा आणि त्याच्या साथीदारांनी मिळून मामाची हत्या केली. त्यांनी 20 सप्टेंबरला रेल्वे रूळावर मामाला झोपवलं आणि त्याची हत्या केली. बरेलीच्या फतेगंज पूर्वमधील ही घटना आहे. इथे आरती नावाच्या महिलेचं आपला मानलेला भाचा मानवेंद्रसोबत अफेअर सुरू होतं. यामुळे आरती आणि तिच्या पतीमध्ये नेहमीच वाद होत होता. मग भांडण इतकं वाढलं की, आरतीने मानवेंद्र आणि…

Read More

डोंबिवली : वृत्तसंस्था डोंबिवली पूर्वेतील माणगाव स्मशानभूमीच्या मागे हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकारामुळे माणगाव चाळीतील लोकही हादरून गेले आहेत. मनोज कुमार रामप्रसाद आग्रहारी (वय 38) याने त्याच्या गतिमंद मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मनोजने पोटच्या मुलीचीच हत्या केल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मनोज हा माणगाव चाळीच्या मागील एकाच चाळीत पत्नी लीलावती आणि 10 वर्षाची मुलगी लवली यांच्यासोबत राहतो. मनोज हा किराणा दुकानात काम करून कुटुंबाचं गुजराण करतो. त्याची मुलगी लवली ही जन्मापासून गतिमंद आहे. तिला बोलता आणि ऐकता येत नव्हते. लवलीवर…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील भंडारा जिल्हाच्या तुमसर तालुक्यातील सालई शिवारात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शुभम भोयर याच्या अंत्ययात्रेत सामील झालेल्या नागरिकांवर बाम्हणी स्मशानघाटात मधमाशांनी अचानक हल्ला केला. या घटेन सुमारे २०० नागरिक जखमी झाले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे अंत्ययात्रेत सामील नागरिकांनी सैरावैरा धूम ठोकली. तिरडी घेऊन जाणाऱ्या नागरिकांनी शेवटी प्रेत खाली ठेवून नदीत उडी मारून मधमाशांपासून आपली सुटका करून घेतली. शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास शुभम भोयर व मयूर भोयर या चुलत भावंडांची दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला खांबावर जाऊन आदळली. त्यात शुभम भोयर याचा रुग्णालयात नेताना वाटेत मृत्यू झाला होता. त्याची अंत्ययात्रा स्वगावी बाम्हणी येथे रविवारी दुपारच्या सुमारास वैनगंगा नदी काठावरील…

Read More