Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यातील गुन्हेगारीच्या घटना घडत असताना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. हत्येचं कारण तर तितकच संतापजनक आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. आरोपीने चिमुकलीला पान मसाला आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं. मात्र मुलीने पान मसाला आणण्याऐवजी चिप्स विकत घेतले. याचा आरोपीला राग आल्याने त्याने मुलीची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या दोन भावांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

उज्जैन : वृत्तसंस्था एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे. हि घटना उज्जैनमध्ये घडली आहे. आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली, याबाबत तिला काही सांगता येत नाही. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे. तिच्या बोलण्यावरून मुलगी प्रयागराजची रहिवासी असावी, असा…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावरून अपघाताची मालिका सुरु असतांना चंद्रपूर जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातामध्ये रिक्षाचालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रक ऑटोरिक्षावर उलटली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंधरा वर्षीय मुलीचा खून करून मृतदेह नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटात फेकून दिल्याचे रविवारी समोर आले होते. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. १९ सप्टेंबरला त्याने दारूच्या नशेत मुलीचा खून केला होता, तसेच त्याने त्याच्या आईचाही खून केल्याचे सांगितले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. पोलिसांनी खून प्रकरणात तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत तुषार विठ्ठल वाळुंज याचे नाव समोर आले. त्याला घरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याची कबुली दिली. तो मुलीला घेऊन फिरण्यासाठी डोंगर परिसरात गेला होता. तेथेच त्याने जुन्या चंदनापुरी घाटात दारूच्या नशेत तिचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  विजेची वायर कट केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह दीराला मारहाण करुन धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील समता नगरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राणी सलीम शेख (वय ३०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घराची वीजेची वायर कट केल्याचे विद्यूत प्रवाह खंडीत झाला होत. त्यावेळी राणी शेख यांचा दीर तन्वीर शेख हा घराबाहेर आला. त्यावेळी संशयित अनवर शेखइब्राहिम शेख याच्यासह इतर दोन ते तीन जण बसलेले…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था एक नकार देणं एक तरूणाला भलंतच महागात पडलं. कारण त्याच्या नकारानंतर त्याच्या गर्लफ्रेंडने त्याच्यावर हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. वाचून धक्का बसला ना ? पण तिने असं का केलं, हे वाचलंत तर आणखीनच मोठा धक्का बसेल. त्या मुलीने तिच्या बॉयफ्रेंडवर हल्ला एवढ्यासाठीच केला कारण त्याने शारिरीक संबंध ठेवण्यास नकार दिला होता. ते देखील तिच्याशी नव्हे तर तिच्या मैत्रिणीशी…. सगळं वाचूनच गरगरायला लागलं असेल ना ? कानपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. तेथील चौबेपुर गावाता राहणाऱ्या एका तरूणाचे त्याच गावातील एका विवाहीत महिलेशी प्रेमसंबंध होते. आपल्या मैत्रिणीची ओळख करून देण्याच्या निमित्ताने त्या (विवाहीत)…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील झाशी येथून समोर आली आहे. या ठिकाणी एका तरुणाला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. याबाबत तक्रार करण्यासाठी तो त्याच्या सासरी गेला. पण हे काम करणं त्याला चांगलंच महागात पडलं आहे. पालकांनी महिलेची बाजू घेत तरुणाला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांनी मारल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आता या तरुणाने एसपी कार्यालय गाठून न्यायाची मागणी केली आहे. झाशी जिल्ह्यातील कोतवाली भागातील लक्ष्मी गेट येथे ही घटना घडली आहे. येथील रहिवासी महेंद्र कुशवाह याने आपल्या कुटुंबासह जखमी अवस्थेत पोलिसात धाव घेतली. महेंद्रने सांगितलं की,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शिरसोली विका सोसायटी ची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात चेअरमन ऍड.विजय बारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभेस केशव आंबटकर,सुरेश माळी, रामदास पाटील,कौतिक ठाकूर,एकनाथ ताडे,रघुनाथ ताडे,मोहन अस्वार,नाना माळी,सचिव भालचंद्र वाणी,संचालक-विजय काटोले,राजू ताडे,समाधान बोबडे,शेनफडू पाटील आदी सभासद उपस्थित होते. संस्थेने मागील आर्थिक वर्षात रु.2 कोटी मात्र ची कर्ज वाटप केलेली होती. संस्था स्तरावर 100 टक्के वसुली व काही प्रमाणात मागील थकबाकी वसूल झाल्याने संस्थेस रु. 8,28,000/- मात्र नफा झालेला आहे. मयत सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून सभेस सुरुवात झाली , सुरवातीस सचिव यांनी प्रस्तात्विक केले,त्यानंतर एक लाखवरील नियमित कर्जफेड करणारे सभासदांचा शाल,श्रीफळ व फुल देऊन चेअरमन…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशयाच्या कारणाने खून केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे दिगर येथे घडली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पतीला मेहुणबारे पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील तळोंदा दिगर शिवारात रहिवासास असलेल्या राजेश जगन पावरा (बारेला, वय-२८) हा आपल्या पत्नीसोबत शेत गट क्रमांक ४५८ मध्ये वास्तव्याला होते. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते २६ सप्टेंबर सकाळी ६ वाजेच्या दरम्यान आरोपी राजेश जगन पावरा याने पत्नी शिवानी हिच्या चरित्रावर संशयावरून हातात मिरचीची पावडर घेऊन गुप्तांगात टाकून तिचा निर्घृन खून केला. हा प्रकार सकाळी उघडकीला आल्याने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसांपासून महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना, दुसरीकडे अंधेरी परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक ओळखीचा फायदा घेत एका ५३ वर्षीय नराधमाने ८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना अंधेरीच्या जोगेश्वरी परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीवर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला जोगेश्वरी परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहतात. तक्रारदार महिला तिसऱ्या मजल्यवर तर…

Read More