मुंबई : वृत्तसंस्था संपूर्ण भारतात चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरल्याने सर्वच आनंद साजरा करीत असतांना अनेक नेत्यांनी चांद्रयान-3 लँडिंग कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले. अनेकांनी या यशाचं श्रेय शास्त्रज्ञांना दिलं. तर नेत्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ दिसून आली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडे यांच्यावर टीका केली. चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारताचा तिरंगा झेडा आणि चांद्रयानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या तिरंगा झेंड्यांच्या फोटोवरून मिटकरी यांनी भिडेंना टोला लगावला. मिटकरी यांनी ट्विट करून म्हटलं की, “मनु” आजोबा चंद्रावर तिरंगा फडकला…लई वाईट वाटलं असल बघा तुम्हास्नी, पण हे खरं हाय अन यात नेहरूजीचं योगदान…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असून यावर कुठलाही आळा बसत नाही आहे. नुकतेच उत्तर दिल्लीतील तिमारपूर परिसरात एका महिलेचे लैंगिक शोषण करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. आरोपी हा दिल्ली परिवहन महामंडळामध्ये बस कंडक्टर म्हणून कार्यरत असल्याचे समजते. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेला अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ दाखवत ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. पीडित महिला ही 2010 ते 2017 या काळात दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन मध्ये टायपिस्ट म्हणून कार्यरत होती. मात्र बाळ झाल्यानंतर तिने काम थांबवले होते. तिमारपूर…
जालना: वृत्तसंस्था राज्यातील जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आल्याने अवघ्या राज्यात मोठी खळबळ माजली आहे. एका तरुणाने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोहेला याने तरुणीला वारंवार फोन करून प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर कॅफे शॉपमध्ये नेऊन लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या तरुणाने कंपार्टमेंट खोली घेऊन बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. यामुळे तरुणीला गर्भधारणा झाली. यामुळे तरुणी खूपच घाबरली. यानंतर तिने सोहेलला सांगितल्यावर सोहेलने तिला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. गोळ्या खाऊन देखील गर्भपात झाला नाही. नंतर त्याने पुन्हा गोळ्या आणून दिल्या. मात्र पुन्हा पण गर्भपात झाला नाही. नंतर मुलीला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तिची प्रकृती…
जालना : वृत्तसंस्था राज्यातील शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अनेक अधिकारी लाच घेताना लाच लुचपत विभाग कारवाई करीत आहे. पुन्हा एकदा पोलिसांच्या खाकीला डाग राज्यात लागला आहे. तक्रार अर्जाच्या चौकशीमध्ये मदत करण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना जिल्हयातील अंबड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. योगेश हरी चव्हाण (वय-39) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर एसीबी कार्यालयात तक्रार दिली आहे. तक्रारदार यांनी संतोष हरणे यांच्याशी गट क्रमांक 718 क्षेत्रातील 5 एकर 29 गुंठ्याचा व्यवहार केला आहे. मात्र, यामध्ये…
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहराला सांस्कृतिक व विद्येचे माहेर घर असे म्हटले जाते पण पुण्यात हत्येचे सत्र थांबता थांबत नाही. काही ना काही कारणातून हत्येच्या घटना सातत्याने वाढत आहेत. क्षुल्लक कारणातून पुन्हा हत्याकांड झाल्याचे उघडकीस आले आहे. नोकरीच्या वादातून मित्रांनीच मित्राला संपवल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. शैलेश रमेश मांडगीकर असे हत्या झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे अशी फरार आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. शैलेश मांडगीकर, राम श्रीराम आणि गोपाळ कोटलपुरे…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर शहरातील नर्मदा फाऊंडेशन याठिकाणी उपचारासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना बुधवारी रोजी दुपारी साडे तीन वाजता घडली. या प्रकरणी डॉ. अनिल शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका महिलेस १०-१२ दिवसांपासून पोट पोटदुखीचा त्रास होत होता. त्यामुळे तिने धुळे येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी केली. तेथील डॉक्टरांनी तीला अपेंडिक्सचा त्रास असल्याबाबत सांगितले. यानंतर ती अमळनेर येथे आली. बुधवारी रोजी दुपारी डॉक्टरने आपला विनयभंग केल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकाराची माहिती मिळताच डॉ. शिंदे यांच्या नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर संतप्त जमाव जमला. संबंधित डॉक्टरला आमच्या ताब्यात…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक वर्षापासून प्रेमानंतर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची अनेकांमध्ये मोठी क्रेज आहे. अशीच एक घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे एक युवक आणि युवती एकत्र राहत होते. एकेदिवशी सकाळी अचानक त्यांच्या घरातून गोळीचा आवाज आला. ही गोळी त्या मुलीला लागली होती तर तिच्यासोबत राहणारा युवक बेपत्ता होता. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. परंतु तपासात अशा गोष्टी बाहेर आल्या ज्यामुळे पोलीस हैराण झाले. लखनौच्या उच्चवस्तीत परिसरातील सुशांत गोल्फ सिटीमधील पॅराडाइज क्रिस्टल अपार्टमेंटमधील ही घटना आहे. १७ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना एक कॉल आला. कॉल करणारी महिला होती. जी रडत होती. रडता रडता तिने पोलिसांना सांगितले की, माझ्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील बालसुधार गृहातील शौचालयात एका अल्पवयीन मुलीने गळफास घेतल्याची घटना घडली होती. त्या मुलीवर जिल्हा रूग्णालयात उपचारास सुरू असतांना मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव येथील बालसुधार गृह जिल्हा परिविक्षा निरीक्षण गृहात अमळनेरातील पूनम भिल(वय १४) ही मुलगी होती. पूनम हिला घरी जायचे होते. परंतू तिचे वडील बाहेरगावी असल्याने तिला नेणे शक्य झाले नाही. घरी जाण्याच्या मागणीच्या दुसऱ्याच दिवशी १२ ऑगस्ट रोजी तिने शौचालयात गळफास घेतला. तिच्यावर ११ दिवस अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अखेर मंगळवारी २२ ऑगस्ट रोजी तिची प्राणज्योत…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळजवळ महिला भाविकांच्या चार चाकी मोटारकारची मालमोटारीला धडक बसून घडलेल्या अपघातात कारचालकासह तीन महिलांचा मृत्यू झाला. तर अन्य सहाजण जखमी झाले. सर्व मृत व जखमी अहमदनगर जिल्ह्यातील रांजणगाव (ता. पारनेर) येथील राहणारे आहेत. बुधवारी पहाटे सुमारास घडलेल्या या अपघातातील मृतांची नावे अशी-कारचालक आदमअली मुनवरआली शेख (वय ३७), हिराबाई रामदास पवार (वय ७५), कमलबाई मारूती वेताळ (वय ६०) आणि द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय ४०). जखमींमध्ये बाळी बाबू पवार (वय २७), छकुली भुमा पवार (वय २७), साई योगीराज पवार (वय ७), सुरेखा भारत…
मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर मोठी बंडखोरी राज्यात झाली होती त्यानंतर पुन्हा भाजप व शिंदे सत्तेत आले त्यानंतर ठाकरे गटात मोठी निराशा असतांना आज एका माजी खासदाराने प्रवेश केल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला बळ मिळाले आहे. शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आज (२३ ऑगस्ट) ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे. वाकचौरे यांच्यासह त्यांचे असंख्य कार्यकर्तेही ठाकरे गटात सामील झाले आहेत. भाऊसाहेब वाकचौरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यावेळी खासदार विनायक राऊत आणि ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. उद्धव ठाकरे…

