Author: editor desk

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील अनेक प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून होत असलेल्या गुन्हेगारीला आता अमरावती शहर देखील मोठ्या चर्चेत आले आहे. एका तरुणाने आपल्याच प्रेयसीच्या आईला आणि भावाला जिवंत जाळलं आहे. त्यानंतर तरुणाने स्वत:ला देखील पेटवून घेत आत्महत्या केलीये. या धक्कादायक घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडालीये. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. गेल्या काही महिन्यांपासून तरुण आणि त्याची प्रेयसी एकत्र राहत होते. त्यांच्यातील प्रेमसंबंध मुलीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हते. त्यामुळे दोघेही दुसरीकडे एकत्र राहू लागले. काही काळाने या दोघांमध्ये भांडणे होऊ लागली. वाद वाढत गेला आणि प्रेमाचं नातं तुटलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियकराशी भांडण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून प्रेयसी आपल्या घरी राहत होती.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  चित्रकूटच्या जंगलात प्रयागराज येथून अपहरण केलेल्या व्यापाऱ्याच्या मुलाच्या हत्येनंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत दोन अपहरणकर्ते गोळ्या लागून जखमी झाले. दोघांनाही पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. अपहरणकर्त्यांनी प्रयागराजमधील शंकरगड येथून सदर मुलाचे अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न मिळाल्याने त्याची हत्या करून फेकून देण्यात आले. शंकरगड नगरपंचायतीच्या सदर बाजार येथील रहिवासी पुष्पराज केसरवाणी उर्फ विक्की यांचा १४ वर्षीय मुलगा शुभ केसरवाणी याचे अपहरण आणि हत्येप्रकरणातील सुखदेव (रा. छर्हारा बारगढ, चित्रकूट) आणि संजय वर्मा (रा. शिवपूर पानवारी रेवा) हे पोलिसांच्या गोळ्या लागून जखमी झाले. या चकमकीत शंकरगड पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सागर देवरिया हेदेखील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथील शिक्षकाचा बैलगाडीवरुन पडल्याने मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी घडली. तालुक्यातील सुनसगाव येथील दादासाहेब दामू पांडू पाटील माध्यमिक विद्यालयातील कला शिक्षक संदीप नरोत्तम महाजन (४५, रा. साथी बाजार, नशिराबाद, ता. जळगाव) हे रविवार, २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान शेतातील कामासाठी बैलगाडी घेऊन जात होते. त्यावेळी अचानक बैल उधळल्याने संदीप महाजन हे बैलगाडीवरून पडले असता, त्यांच्या डोक्याला मार लागला आणि नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना जळगाव येथे सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मयत घोषित केले. सुनसगाव येथे बीएलओ म्हणून संदीप महाजन हे काम पाहत होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार होते. ते…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था बाळाचे आई-वडील गाढ झोपले असताना सहा महिन्यांच्या बाळाला उंदरांनी कुरतडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा आढळल्या. अमेरिकेतील इंडियानामधील ही भयंकर घटना असल्याचं समोर आलं आहे. मुलाच्या वडिलांनी पोलिसांना फोन करून या प्रकरणाची माहिती दिली. त्यांना सांगण्यात आले की, 6 महिन्यांच्या मुलाच्या शरीरावर उंदराने चावा घेतल्याच्या गंभीर जखमा आहेत. यूएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या आठवड्यात घडली. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी मुलाचे वडील डेविड आणि आई एंजल स्कोनाबॉम यांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत राहणाऱ्या मावशीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध निष्काळजीपणासह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कपलला तीन…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था जगभरातील अनेक पर्यटक नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. जीवनात काही तरी थ्रील हवं, यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. काही लोक अॅडव्हेंचर करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतात, तर काही लोक थ्रील करण्याच्या नादात खरंच आपला जीव गमावून बसतात. आता अशीच काहीशी धक्कादायक घटना ऑस्ट्रियातून समोर आली आहे, जिथे एक ब्रिटीश व्यक्ती नाही ते साहस करायला गेला आणि त्या दरम्यान त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हा व्यक्ती डोंगर पार करण्यासाठी दोन डोगरांदरम्यान बांधण्यात आलेली शिडी चढत होता, ज्याला ‘स्वर्गाची शिडी’ असंही म्हणतात. मात्र एका चुकीमुळे या माणसाचा तोल गेला आणि तो 300 फुटांवरुन थेट खाली कोसळला. इतक्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे तर अनेकानी घरगुती बाप्पाचे देखील आकर्षक सजावट करून स्थापना करण्यात आली आहे. परंतु गणपतीसाठी केलेल्या आरासच्या लाईटिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरगुती गणपतीला आकर्षक सजावट केली जात आहे. या सजावटीमध्ये विद्युत लाईट, प्लास्टिक फुले, कपड्यांचा वापर अधिक वाढलाय. यावेळी विद्युत लाईनची कुठलीही सुरक्षा लक्षात घेतली जात नाही. यातुनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. वैभव गरुड असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव गरुड यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपारीचे आदेश काढल्याचा राग आल्याने त्या गुन्हेगाराने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना फोनवरुन जाब विचारला. त्यानंतर सायंकाळी थेट प्रांतधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची उर्मट भाषेत बोलत माझ्यावर काय कारवाई केली. तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रांतधिकाऱ्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस अधिक्षकांकडे सादर केला होता.…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था प्रत्येक महिला असो वा पुरुष प्रत्येकाला रस्तावर लावलेली पाणीपुरीची दुकान दिसली कि लागलीच पाय दुकानाकडे वळत असतात. पण हीच पाणीपुरी धोकादायक ठरली आहे. नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणारा माणूस अट्टल गुन्हेगार निघाला. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली तो चक्क गावठी कट्टा म्हणजे पिस्तुल विकत होता की ओ ! हो, हे अगदी खरं आहे आणि त्या भामट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. संजय परिहार अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे…

Read More

लातूर : वृत्तसंस्था लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कोठडीसमोर पहारा देत असताना शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून घेतली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून गंभीर जखमी पोलिसास खासगी रुग्णालयात दाखल आहे. पोलिस कर्मचारी पांडुरंग शंकरराव पिटले (वय ५०, रा. मंठाळेनगर, लातूर) हे लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पांडुरंग पिटले हे शुक्रवारी रात्री कर्तव्यावर होते. दरम्यान, अचानकपणे १०:१५ वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी सुटण्याचा आवाज आल्याने ठाण्यात असलेल्या इतर पोलिसांनी कोठडीकडे धाव घेतली. त्यावेळी पिटले हे गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जून्या भांडणाच्या कारणावरुन कुरापत काढून तरुणाला शिवीगाळ करीत त्याला लोखंडी कडे मारुन जखमी केले. तसेच त्याच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची आळी परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३३) हा तरुण वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन हा गावातील बसस्टँड जवळील दुकानासमोरील पायरीवर बसलेला होता. त्यावेळी गावात राहणारा जयेश रमेश महाजन हा तिथे आला. जुन्या वादातून जयेश महाजन याने कमलाकर महाजन याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने…

Read More