तासगाव : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकी सुरु आहे. एक मिरवणुकीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या तरुणाचे नाव शेखर सुखदेव पावशे असे असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात नोंद झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, समाज माध्यमांवर कर्ककर्कश आवाजाच्या ध्वनिवर्धक यंत्रणांविरोधात टीकेची झोड उठली आहे. पोलिस काय कारवाई करणार, याकडे लक्ष आहे. येथे काल रात्री अनेक मंडळांच्या विसर्जन मिरवणुका झाल्या. मिरवणुकीनिमित्त उच्च क्षमतेच्या ध्वनिवर्धक यंत्रणा लावल्या होत्या. तरुणाई नाचत होती. काल सायंकाळी सातपासून चौकाचौकांत दणदणाट सुरू होता. विसर्जन मिरवणुकीत पावसेही गेला होता. रात्री बसथांबा चौकात मिरवणुका आल्यानंतर ईर्षा सुरू झाली. धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे अनेकांना त्रास…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी गेल्या काही वर्षापासून राज्यातील शेतकरी नेहमीच पावसाच्या कारणाने नेहमीच संकटात असतो. पण खान्देशातील एका शेतकऱ्याच्या पुत्राने जुगाड केले आहे. जळगावमधल्या एका शेतकऱ्याच्या मुलाने अशा पावडरचं संशोधन केलंय ज्यामुळे तब्बल दोन महिने शेतीला पाण्याची गरज भासणार नाही. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी या शेतकरीपुत्राची दखल घेतली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पुत्र व मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सुनील पवार या तरुणाने शेती क्षेत्रात अत्यंत प्रभावी असे संशोधन करून एक विशिष्ट जैविक पावडर उत्पादित केली आहे. ही पावडर पेरणीच्या वेळी बियाण्यासोबत मिश्रण करुन दिल्यानंतर पिकाला दीड ते दोन महिने पाण्याची गरज लागत नाही, असा दावा सुनील पवार यांनी केला आहे.…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिकमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिकच्या उत्तमनगर मध्ये मोबाईलचा भीषण स्फोट होवून ३ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याची घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. शहरातील उत्तमनगर परिसरात सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या स्फोटामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले असून जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुषार जगताप, बाळकृष्ण सुतार आणि शोभा जगताप अशी जखमींची नावे आहेत. हा मोबाईल स्फोट इतका भीषण होता की घराचे मोठे नुकसान झाले असून स्फोट झालेल्या…
भंडारा : वृत्तसंस्था भंडारा जिल्ह्यातील गोबरवाहीवरून तुमसरकडे कारमधून परत येताना गोबरवाही येथील रेल्वे फाटकाजवळ चारचाकीतून आलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी मॅगनीज व्यावसायिक नईम सिराज शेख (५०) यांच्यावर देशी कट्ट्यातून चार राउंड फायर केले. त्यात शेख यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी भर रस्त्यावर हा थरार घडला. हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून मारेकरी पसार झाले. जुन्या वैमनस्यातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. हल्लेखोरांचा शोध अद्याप लागलेला नाही. नईम सिराज शेख (५० माकडेनगर, तुमसर ) हे मॅगनीज व्यावसायिक असून रेतीचे कंत्राटदारही आहेत. व्यवसायानिमित्त ते कारने गोबरवाहीला गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचा वाहनचालक होता. रेल्वे फाटकाजवळ मोठा स्पीड ब्रेकर आहे. यामुळे शेख यांच्या वाहनाची गती कमी झाली.…
पुणे : वृत्तसंस्था सोशल मीडियावर झालेल्या ओळखीतून तरुणीला क्लिनिकमध्ये बोलवून तिला मद्य पाजून बलात्कार केला. याप्रकरणी २० वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २४ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास नारायणपेठेतील डॉ. महापुरे याच्या क्लिनिकमध्ये घडला. शुभंकर महापुरे (२६, रा. विजया अलंकार सोसायटी, तळजाई पठार, धनकवडी) असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी महापुरेची ओळख सोशल मीडियावर झाली होती. कालांतराने त्यांची ओळख वाढत गेली. महापुरेने तिला स्वतः:च्या क्लिनिकमध्ये जेवणासाठी बोलावले. तरुणी क्लिनिकला गेली असता, तिला मद्य देण्यात आले. यामुळे तिला गुंगी आली. त्याचा गैरफायदा घेत…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना फलटण शहरातून समोर आली आहे. फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना घडली असून हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला. यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; परंतु खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी झाला. रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. अरिंजय दोशी (वय ७२) असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेजारील काही दुकानांतही कोयता आणि तलवारीचा…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या सहा महिन्याआधी पोलिसांनी ३ कोटीहून अधिक रोकड जप्त केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थान पोलिसांनी गुजरातला निघालेल्या एका कारमधून कोट्यवधीची रोकड जप्त केली आहे. या कारमध्ये २ युवक होते त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये सिरोहीतून अहमदाबादला घेऊन जात होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. राजस्थानच्या सिरोही येथील ही घटना आहे. राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेजारील राज्यातून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी २४ सप्टेंबरला मावळ येथे वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या प्रकाश कुमार आणि विजय सिंह यांची नजर सफेद रंगाच्या लग्झरी कारवर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश करून पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. चोरट्याचं हे कृत्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठच्या विहार कॉलनीतील आहे, जिथे खाटू श्याम मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेली. चोर सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात आला हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने आपल्या गुन्ह्यांबद्दल देवाकडे क्षमा मागितली. यानंतर मंदिरातून देवाची मूर्ती चोरीला गेली. राधा अष्टमीच्या आदल्या दिवशी मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेल्याने लोकांमध्ये प्रचंड…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक नववधू आणि नवरदेवाला वाटत असतं की त्यांची लग्नातील एन्ट्री अशी व्हावी की सगळे पहाताच रहावे. हल्ली लग्नात ग्रँड एन्ट्रीचा क्रेज वाढतच चालला आहे. तसेच ती सर्वांच्या लक्षात रहावी. यासाठी लोक खूप विचार करुन गाण्याची निवड करतात. काही लोक डान्स करत एन्ट्री करतात. तर काही लोक एन्ट्रीवर खूप पैसे खर्च करतात. कधी ही एन्ट्री जेसीबीवर होते. तर कधी बाईकवर, तर कधी आकाशातून पाळण्यावर. तुम्ही यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असणार. ही अशी एन्ट्री पाहायला खूप भारी वाटते. पण कधीकधी ते जीवघेणं देखील ठरते. लग्नातील एन्ट्री फेल झाल्याचे तुम्ही अनेक व्हिडीओ ही पाहिले असणार. सध्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होत असतांना एक भीषण अपघात केरळ राज्यातून समोर आला आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवार २५, सप्टेंबर रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अपघाताबाबत पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा…

