Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी जळगाव व जामनेर तालुक्यातील सहा जणांवर प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी वर्षभराच्या कालावधीसाठी हद्दपारीची कारवाई केली आहे. तसेच आदेश जळगाव व पाचोरा पोलिस उपविभागीय अधिकाऱ्यांना बजावण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,  मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ५६ व ५७ नुसार फत्तेपूर (जामनेर), रामानंदनगर, जिल्हापेठ, नशिराबाद (जळगाव) पोलिस निरीक्षकांनी आरोपींचा तपशील सादर केला होता. त्यानुसार जळगाव उपविभागाचे पोलिस उपअधीक्षकांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावाला प्रांताधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार सुनील पांडुरंग पारधी, विजय पांडुरंग पारधी (फत्तेपूर), अमोल उर्फ चिक्या शंकर कोकाटे (तडवी गल्ली, हरीविठ्ठलनगर, जळगाव), उमेश उर्फ उमाकांत दत्तात्रय धोबी (संत मीराबाई नगर, पिंप्राळा), महेंद्र उर्फ दादू समाधान…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी तेलंगणाचे राज्यपाल असलेल्या जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर तेलंगणाच्या राज्यपालपदी सध्या हिमाचल प्रदेशचे राज्यपाल असलेले शिव प्रताप शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनातून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या राज्यात जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती ही राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जाणारे जिष्णू देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित आहेत आणि भाजप मधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 2018 ते 2023 या कालावधीत त्यांनी त्रिपुरा राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम करत वित्त, ऊर्जा, नियोजन, पंचायत…

Read More

आजचे राशिभविष्य दि. ६ मार्च २०२६ मेष राशी आज कंत्राटदारांसाठी खूप शुभ दिवस आहे. तुम्हाला नवीन निविदा मिळू शकतात किंवा रखडलेले जुने निविदा परत मिळू शकतात. तुमच्या वरिष्ठांचा सल्ला आज तुमच्या बाजूने असेल. कोणाशीही खूप समजूतदारपणे बोला. अनावश्यक वाद टाळा. आज, तुमच्या मुलांच्या वागण्याने तुम्हाला थोडे निराश वाटू शकतं. तुमच्या कुटुंबासह परदेश दौरा शक्य आहे. वृषभ राशी आज तुम्ही सुरू केलेले कोणतेही काम सहज पूर्ण होईल. या राशीखाली जन्मलेल्यांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. त्यांना पदोन्नती देखील मिळू शकते. या राशीखाली जन्मलेल्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्याची धक्कादायक हत्या घडली. खापरखेडा येथील कोराडी रोडवर नवरा-पत्नीने मिळून सागर वानखेडे (वय २५) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केली. या घटनेने परिसरात तात्काळ खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली गजभिये आणि सागर यांचे लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते. मात्र सोनालीने राजू गजभिये यांच्याशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. या विवाहानंतरही सोनाली आणि सागर यांचा संपर्क सुरू होता. राजू गजभिये यांनी आधीच खापरखेडा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली होती. घटनेच्या दिवशी सागर होळी सणानिमित्त पुण्याहून गावी आला होता. सकाळी सागर आणि सोनाली एकाच बाईकवरून जात असताना सोनालीने तिची पर्स…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणातील सहकार्याची आणि सौहार्दाची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आज संध्याकाळी साडेसहा वाजता ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल ठाकरे कुटुंबाचे आभार मानण्यासाठी ही भेट होत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवार हा अखेरचा दिवस होता. सात जागांसाठी एकूण सातच उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमोर मोठे राजकीय आव्हान उभे केले आहे. त्यामुळे यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून सामना चुरशीचा होण्याची चिन्हे आहेत. माहितीनुसार, बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील रणनीतीवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. यंदा महाराष्ट्रातील सात जागांसह देशातील दहा राज्यांतील एकूण ३० राज्यसभा जागांसाठी मतदान होणार आहे. येत्या १६ मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातून महायुतीचे सहा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दस्तकेवाडी येथील सरपंच भगवान उत्तम देवरे आणि उपसरपंच ईश्वर उर्फ भैय्या लक्ष्मण अहिरे यांच्या अंगावर राजकीय वर्चस्वासाठी घातलेला धोकादायक कट पोलिसांनी उघडकीस आणला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  २६ जानेवारी २०२६, प्रजासत्ताक दिनाच्या रात्री या दोघांना त्यांच्या बुलेट मोटारसायकलवर चाळीसगावहून गावाकडे जात असताना शिरवाडे शिवारात समोरून येणाऱ्या पिकअप गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत सरपंच देवरे गंभीर जखमी झाले. सुरुवातीला हा सामान्य रस्ता अपघात असल्याचे भासवले गेले. उपसरपंच ईश्वर अहिरे यांना संशय आला आणि त्यांनी त्वरित पोलिस प्रशासनाकडे तक्रार नोंदवली. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर आणि डीवायएसपी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास…

Read More

अहिल्यानगर :  वृत्तसंस्था  अहिल्यानगर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये एका पोलिस कॉन्स्टेबलने गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने बसमध्ये धिंगाणा घालून चालक आणि वाहकाला मारहाण केली. यावेळी आरोपीने “मी पोलिस आहे, तुमच्यावर ॲट्रॉसिटी दाखल करेल” अशी धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना बसस्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 1 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5.25 वाजता उदगीर आगाराची (जि. लातूर) एमएच 24 ए.क्यु 7970 क्रमांकाची बस राहता बसस्थानकात आली. बसवाहक बालाजी पंडितराव बोरगावकर यांनी तक्रार नोंदवली की, येवला शहरात नेमणूक असलेले पोलिस कॉन्स्टेबल फकिरा तोताराम थोरात यांनी दारूच्या नशेत बसमध्ये धिंगाणा घालून चालक…

Read More

नागपूर : प्रतिनिधी  होळीच्या उत्साहाला नागपूरमध्ये एका धक्कादायक घटनेमुळे गालबोट लागले आहे. खेळता खेळता अंगावर रंग उडवला या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या आजीने आपल्या चार वर्षीय नातवावर उकळते पाणी ओतल्याची खळबळजनक घटना नागपूरमधील कोराडी परिसरात घडली. या घटनेत चिमुकला सुमारे ४५ टक्के भाजला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोराडी येथील रहिवासी ओम हरीश वांगे (वय ४) हा घराबाहेर पिचकारीने होळी खेळत होता. त्याचवेळी त्याची आजी सिंधू ठाकरे या होळीच्या लाकडावर तापवलेले गरम पाणी बादलीत भरून घराकडे नेत होत्या. दरम्यान, खेळत असताना ओमने सहजपणे पिचकारीतील रंग आजीच्या अंगावर…

Read More

सासू, साली व साडूविरुद्ध गुन्हा दाखल; पैशांच्या तगाद्यामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा उल्लेख एरंडोल : प्रतिनिधी  एरंडोल तालुक्यातील भातखेडा येथील एका तरुणाने सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गौरव ज्ञानेश्वर बडगुजर असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सासरच्या लोकांकडून होत असलेल्या त्रासाचा उल्लेख केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गौरव बडगुजर हे काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होते. सासरच्या मंडळींकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती तसेच धमक्याही दिल्या जात असल्याचे त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये नमूद केले आहे. या मानसिक छळामुळेच टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले असल्याची…

Read More