चाळीसगाव : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील सांगवी गावानजीक गतिरोधकावर आदळल्याने पत्नीला घेऊन मोटरसायकलवर चाळीसगावच्या दिशेने निघालेल्या खडकी ता. चाळीसगाव येथील तरुणाची मोटरसायकल घसरली, त्याचवेळी कुऱ्हाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली आल्याने, तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल त्यांनी घटनेबाबत पंचनामा करत डंपर चालका विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे संदिप राजेंद्र सुर्यवंशी (मराठे) वय – ३३ हा तरुण आई व पत्नीसह वास्तव्यास असून संदिप हा ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास त्याची पत्नी गायत्री हिच्या सोबत, खडकी ता. चाळीसगाव येथून मोटरसायकल क्रं. एम. एच.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात राहणाऱ्या युवकाने त्याच परिसरात राहणाऱ्या तरुणीच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला. हा प्रकार गुरुवार, ५ ऑक्टोबर रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका भागात २२ वर्षीय तरुणी मावशी व आजीसोबत राहते. ती मावशी व आजी यांच्यासोबत घरात झोपलेली असताना गुरुवारी मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास त्यांच्याच घराच्या परिसरात राहणारा तरुण घरात घुसला. त्याने तरुणीचा विनयभंग केला. त्यावेळी तिची मावशी व आजी झोपेतून जाग्या झाल्याने त्यांना पाहून तरुण पसार झाला. याप्रकरणी…
जळगाव : प्रतिनिधी मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दहावीत शिकत असलेल्या एका १५ वर्षीय मुलाला सोबत शिकत असलेल्या सहा अल्पवयीन मुलांनी बळजबरी रिक्षात बसवून के.सी. पार्क परिसरातील एका भागात नेवून बेदम मारहाण करत कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारा १५ वर्षीय मुलगा हा दहावीत शिकतो. त्याने अतिरीक्त खासगी क्लासेस लावलेले आहे. त्याच्या सोबत देखील ६ त्याच्या ओळखीचे मुले देखील सोबत शिकवणीसाठी जातात क्लासमध्ये शिकत असतांना मुली सोबत प्रेमसंबंध असल्याचा संशयावरून १५ वर्षीय मुलाला…
जळगाव : प्रतिनिधी २३ वर्षीय तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शहरातील विठ्ठल पेठ भागातील गायवाडा परिसरात आज शुक्रवार दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. त्याचा दहा वर्षीय चुलत भाऊ घरात पाणी पिण्यासाठी आला असता ही घटना समोर आली. दरम्यान, या घटनेप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोकेश विलास अत्तरदे (२३, रा. विठ्ठलपेठ) असे मयत तरुणाचे नाव आहे. वडील विलास अत्तरदे हे स्वयंपाकी आहे. ते उत्तरप्रदेशात लखनौ येथे स्वयंपाकी कामासाठी गेलेले आहे. शुक्रवारी सकाळी लोकेशची आई शेतात गेली होती. त्या मुळे तो घरात एकटाच होता. त्या वेळी त्याने घरात साडीच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात चोरीच्या घटनेत वाढ होत असतांना आता चोरटे काय चोरतील याचा काहीही भरवसा नाही. कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका रात्रीत संपूर्ण बस स्टॉप चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसमधून प्रवास करणारे रोजचे प्रवासी रात्री बस स्टॉपवर उतरले होते, मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर बस स्टॉपच गायब झाला होता. संपूर्णपणे स्टीलने बनवलेले हे बस शेल्टर आठवड्याभरापूर्वीच कनिंगघम रोडवर बसवण्यात आले होते, ज्याची किंमत जवळपास 10 लाख रुपये आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. बंगळुरू पोलिसांनी या चोरीची नोंद करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. यासोबतच अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. मात्र, आजपर्यंत…
कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक खून हे प्रेमप्रकरणातून पुढे येत असतांना अशीच एक धक्कादायक घटना कल्याण शहरात घडली आहे. लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये राहणाऱ्या महिलेची तिच्या पार्टनरने चाकूने वार करत हत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास कल्याणच्या पूर्व परिसरातील विजयनगर आमराई परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विजय जाधव याला अटक केली. हत्या करणयात आलेल्या महिलेचे नाव रसिका कोळंबेकर आहे. विजय रसिकाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांच्यात वाद होत होते. याच वादातून आज सकाळच्या सुमारास विजयने तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. विजय नगर आमराई परिसरात विजय जाधव व रसिका कोळंबेकर हे दोघे गेल्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरातून किराणा दुकानाचे शटर उचकावून २२ हजार ४९० रूपयांचा मुद्देमालाची चोरी केल्याची घटना गुरूवारी ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली आहे. याबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी वासुदेव टिकूमल हनंदी (वय-५९) यांच्या मालीकीचे दुध फेडरेशन रोडवरील गेंदालाल मिल परिसरातील वासुदेव किराणा दुकान असून ते नेहमीप्रमाणे बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता किराणा दुकान बंद करून ते घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी शटर कशानेतरी उचकावून आत प्रवेश करत २२ हजार ४९० रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…
पालघर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढत असतांना एक धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेत इयत्ता 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यींनीची भर दिवसा गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संशयिताने पळ काढला आहे. या घटनेची माहिती कळताच पाेलीसांनी संशयिताचा शाेध घेण्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली आहेत. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार अर्चना वधर (राहाणार पिंपळे हिरवे) असे या घटनेत मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ती रयत शिक्षण संस्थेच्या गबळपाडा येथील आश्रमशाळेतील होती. आज (शुक्रवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास ती काॅलेजला जाण्यासाठी निघाली होती. प्रभाकर वाघेरे याने तिला रस्त्यातच अडवून तिच्यावर…
अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर एमआयडीसी परिसरातील नवनागापूर येथील चेतना कॉलनीत एका घरात सुरू असलेल्या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून भांडाफोड केला आहे. या कारवाईत मुंबईहून आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका करण्यात आली असून, सेक्स रॅकेट चालविणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले यांना बुधवारी (दि. ४) गोपनीय माहिती मिळाली की, चेतना कॉलनी, नवनागापूर येथे राहत्या घरात एक महिला हायप्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून तरुणींकडून देहव्यापार करून घेतला जात आहे. ही माहिती मिळताच त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या.…
जळगाव : प्रतिनिधी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे १० चिमुरड्यांची प्रकृती बिघडली आहे. अमळनेर तालुक्यातील गांधली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला. विषबाधा झालेल्या सर्व चिमुरड्यांवर अमळनेर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सर्व मुलांची प्रकृती स्थिर आहे. तालुक्यातील गांधली येथील १० मुलांनी चंद्रज्योतीच्या बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा झाली. त्यात ६ मुली व ४ मुलं आहेत. सर्व मुलांना पुढील उपचारासाठी मुलांना ग्रामीण रुग्णालय अमळनेर येथे दाखल करण्यात आले आहे. सर्व मुलांचे वय हे १० वर्षाखालील आहे. याबाबतची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने आपल्या फेसबुक पेजवरूनही दिली आहे. दरम्यान, एका मुलाला धुळे येथे रवाना करण्यात आले असल्याचेही कळते. अमळनेर तालुक्यात मुलांनी चंद्रजोत झाडाच्या बिया खाल्याने विषबाधा झाल्याच्या…

