Author: editor desk

मलकापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एसटी बस धाड रोडवरील मर्दडी घाटातील वळणावर उलटली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातात काही प्रवाशांना जबर मार लागला. त्यांना तातडीने उपचारासाठी धाड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताची ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी मलकापूर आगाराची बस पहाटेच्या सुमारास आगारातून निघाली. या बसमधून १३ प्रवासी प्रवास करीत होते. दरम्यान, बस धाड रोडवरील…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी कासोदा तालुक्यातील उत्राण शिवारात शेतातून सायंकाळी घरी परतणाऱ्या गृहिणीची चौघांनी अश्लील वर्तन करून तिला शिवीगाळ करीत अश्लील हाव करून विनयभंग केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी गृहिणीने कासोदा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा येथील उतरण शिवारात ३ ऑक्टोबर रोजी एक ४० वर्षीय गृहिणी महिला परतत असताना गावातील मारुती मंदिराजवळ संशयित आरोपी भागवत भिकन पाटील नाना भिकन पाटील भाऊसाहेब भिकन पाटील आणि दिलीप काशिनाथ पाटील हे उभे असताना त्यांनी महिलेस शिवीगाळ करून असली संभाषण द्वारे तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेच्या…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमणात घडत असतांना नाशिक शहरात देखील अशीच एक घटना समोर आली आहे. इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगून एका युवतीला सात लाखांचा गंडा घालण्यात आला. युवतीच्या तक्रारीनुसार इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयीता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ५ महिन्यानंतर ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या इंदिरानगर परिसरात वास्तव्यास असलेल्या युवतीला एका इसमाने नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखविले होते. यातून सदर इसमाने वेळोवेळी पैसे घेत तब्बल सात लाख रुपये घेत फसवणूक केली. या प्रकरणी ५ महिन्यापूर्वी इंदिरानगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तब्बल पाच…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना आंध्रप्रदेशच्या कडप्पामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक पोलीस कर्मचाऱ्याने पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश पोलीस दलातील 1993 च्या बॅचच्या 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलने पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. कडप्पा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी (५ ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे. ही घटना वैयक्तिक कारणातून घडली असून गुरुवारी सकाळी ही बाब…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणीकडून 16 हजारांची खंडणी स्वीकारून तरुणीचे अश्लील अवस्थेतील फोटो तिच्या भावी पतीला पाठवून बदनामी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित प्रफुल्ल सुधाकर सोनवणे उर्फ सूर्यवंशी याच्याविरोधात जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील 24 वर्षीय तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेते. तरुणीच्या परीचीत असलेल्या संशयित प्रफुल्ल सोनवणे याने तरुणीचे अश्लील अवस्थेत फोटो काढले व पीडीतेेचे लग्न ठरल्यानंतर तिच्या भावी पतीला फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवून हे फोटो पाठवत तरुणीच्या चारीत्र्याची बदनामी केली तसेच पीडीतेकडून वेळोवेळी 16 हजारांची खंडणीही उकळली. याप्रकरणी तरुणीने…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात आगीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत आहे. पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनला जून महिन्यात मोठी आग लागली होती. आगीत ४ सिलेंडर फुटले होते. या भीषण आगीत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काहीच दिवसांना पुणे शहरातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जुलै महिन्यात कोंढवा बुद्रुकमधील येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली होती. आता मंगळवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या एका दुचाकीच्या शोरुमला आग लागली. या आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असतांना राज्यातील एका व्हिडीओने सोशल मिडीयावर मोठी खळबळ उडविली आहे. मुंबईतल्या दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील जलतरण तलावात मंगळवारी ३ ऑक्टोबर मगरीचे पिल्लू आढळून आले. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीच्या पिल्लाला रेस्कू करत ताब्यात घेतलं. दरम्यान, हे पिल्लू नेमके कुठून आले, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचं पिल्लू जलतरण तलावात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. या प्राणीसंग्रालयात प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट सुरू आहे. हे रॅकेट उध्वस्त केलं पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य प्रकरणाशी साधर्म्य असलेली घटना झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात घडली. पिझ्झा डिलिव्हरी बॉय टिंकू यादव याने पत्नी प्रियाला नर्सिंगचा कोर्स करता यावा, यासाठी अडीच लाखांचे कर्ज काढले. परंतु नर्स होताच पत्नी प्रियकरासह पळून गेली आणि दिल्लीत जाऊन लग्नही केले. लग्नाचे फोटो पत्नीने सोशल मीडियावर टाकल्यानंतर टिंकूला याबाबत कळाले. टिंकूने आता पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २०२० मध्ये टिंकू आणि प्रिया कुमारीचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पुढे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आणि नर्सिंग कोर्स करायचा असल्याचे सांगितले. ती अभ्यासूही होती, त्यामुळे टिंकूने आर्थिक परिस्थिती नसतानाही २.५ लाखांचे कर्ज काढून पत्नीला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  धरणगाव येथून गोंदिया येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जात असलेला ८ लाख ३० हजार रुपये किंमतीचा २९ हजार किलो रेशनचा तांदूळाचा ट्रक मंगळवारी नशिराबाद पोलिसांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातून गोंदीयाकडे रेशनचा तांदूळ ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे पोहेकॉ. सूरज पाटील यांनी नशिराबादपासून (एमएच १८, बीझेड १०३९) क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत पाठलाग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे अशी सुसाईड नोट लिहून तन्मय गजेंद्र पाटील (वय- १४, रा. गणेश कॉलनी) या दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील ए. टी. झांबरे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असेला तन्मय हा गणेश कॉलनीत वडील अॅड. गजेंद्र पाटील, आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्व जण झोपले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कुटुंबिय गाढ…

Read More