
चोपडा : प्रतिनिधी
चोपडा शहरातील समाज मंदिराच्या बाजूच्या जागेवर पत्रे लावल्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाला. याचे पर्यावसान हाणामारीत होऊन एकमेकांवर दगडफेक झाली. याप्रकरणी २० ते २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे, तर सात जणांना अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री ११:३० वाजता चोपडा शहरातील पंचशील नगरात घडली.
पंचशील नगर येथील समाज मंदिराच्या बाजूला असलेल्या जागेला समोरून पत्रे का लावले, अशी विचारणा केल्याने दोन गटात वाद झाला. यात दोन्ही गटांकडून दगडफेक झाली. यात समाज मंदिराचे मोठे नुकसान झाले.



