सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात वाढती गुन्हेगारी आज देखील तशीच सुरु आहे. एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथून समोर आली आहे. घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार अशोकराव शंकरराव निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात केली. निकम यांनी अज्ञातांविरोधात ही तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यशाहिर (कै.) शंकरराव निकम यांचे मोठे सुपूत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत. मध्यरात्री बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटूंबीय झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी तक्रारीत…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीला माझ्या सोबत पळून जावून लग्न कर जर तु आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी व ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर तरुणीची जबरदस्ती सही घेत अत्याचार केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून तरुणीला एकाने दि.१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर तसेच दि. ६ सप्टेंबरपासून १५ दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्या सोबत पळून जावुन लग्न…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याचं दिसत होतं. आज शिंदे-फडणवीस सरकारनं त्यांची ही नाराजी दूर केलीय.परंतु त्याचवेळी अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारवर नाराज होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर न जाणं या गोष्टींतून अजित पवारांची नाराजी सहज दिसून येत होती. अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज…
सिक्किम : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे सिक्किमध्ये मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला असून या महापुरात भारतीय लष्कराचे 23 जवान वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या जवानांचा शोध घेतला जात आहे. या महापुराचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सिक्किममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (३ ऑक्टोबर) रात्री या पावसाने अचानक जोर पकडला. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात फटका लष्कराच्या आस्थापनांना बसला. लष्कराची अनेक वाहने…
जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरु असतांना आरक्षण मिळावे यासाठी आज एका व्यक्तीने थेट मोबाईट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. गेल्या तासाभरापासून ही व्यक्ती या टॉवरवर आंदोलन करत आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडालीये. मराठा आरक्षणाच्या मागणीचे लोन आता गावागावात पसरायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावातील 50 वर्षीय तुळशीराम श्रीपत शेळके यांनी आंदोलनाला सुरूवात केलीये. सकाळी नऊ वाजल्यापासून गावातील मोबाईल टावरवर चढून बसले आहेत.…
नाशिक : वृत्तसंस्था जमीन खरेदी-विक्रीत गुंतवणूक करणे एका चांगलेच महागात पडले आहे. दाम्पत्याने एकास तब्बल ९० लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला असून, खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पद्माकर घुमरे व सुनीता घुमरे – भंडारे असे या व्यवहारात गंडा घालणाऱ्या संशयित दाम्पत्याचे नाव आहे. जेम्स प्रसाद वरसाला ( वय३६, रा. आनंदनगर, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार वरसाला व घुमरे दाम्पत्य एकमेकांचे परिचीत असून, त्यांच्यात सन २०१४ मध्ये हा व्यवहार झाला होता. घुमरे दाम्पत्याने वरसाला यांचा विश्वास संपादन…
जळगाव : प्रतिनिधी उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रुकेश सुनील इंगळे (वय ३०, रा. तरसोद ) या तरुणाला दोन जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील तरसोद येथे रुकेश इंगळे हे वास्तव्यास असू त्यांनी गावातीलच दोन जणांना पैसे उधार दिलेले होते. १२ सप्टेंबर रोजी ते दोघे रुकेश इंगळे यांना दिसले. त्यावेळी इंगळे यांनी त्यांना उधार दिलेले पैसे परत मागितले. त्याचा त्यांना राग आल्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. शिवीगाळ का करतात, असे त्यांना विचारले असता एका…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील आझाद नगरातील नाजीश शेख नासीर (वय ३१) या जीम ट्रेनरची उधारीचे पैसे मागितल्याच्या वादातून दोघांनी हत्या केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास केशव नगरात घडली होती. याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील आझाद नगरात नाजीश शेख नासीर या तरुणाने नात्याने मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ) यांना मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये दिले होते. पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत शनिवारी रात्री ११ वाजता जोरदार वाद झाला होता. या वादात महिलेच्या भावासह भाच्याने उडी घेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या भादली बुद्रुक येथे राहत्या घरात विष प्राशन केलेल्या चुडामण रमेश नारखेडे (वय ३९) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे चुडामण नारखेडे हे वास्तव्यास असून त्यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी सोयाबीन रिफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ १६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाला वाचवण्याच्या प्रयत्न त उलटला होता. या अपघातात त्यावेळी वाहतूक संपूर्ण ऑईल वाहून गेले. तर नागरिकांनी वाहनाच्या टँकरमधील ऑईल लांबवल्याने सुमारे 39 लाखांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जीजे १२, बीएक्स – ९३२५ ) मधून सोयाबिन रिफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट ( वय ४७, खडीन, रामनगर, बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर…

