जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील अनेक परिसरात १५ गंभीर गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल भेजा भिकन शेख (२२) व आमीर उर्फ गुड्डन शेख महंमद (२०) (दोघे रा. गेंदालाल मिल) या दोन्ही रेकॉर्डवरील गुन्हेगारांना जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. तसे आदेश पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात टोळीने गुन्हे करणाऱ्या जुबेर उर्फ डबल आणि आमीर उर्फ गुड्न यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडेदोन्ही सराईत गुन्हेगारांच्या हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाचीउपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी चौकशी केल्यानंतर…
Author: editor desk
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे शनिवारी भरदुपारी गावाच्या मध्यभागी असलेल्या शेतकऱ्याच्या घरातून ८० हजार रोख रकमेसह सोने चोरीला गेल्याने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी पाचोरा पोलिसांसह जळगाव वरून श्वानपथक दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील माहिजी येथील रहिवासी संजय मन्साराम पाटील हा अल्पभूधारक शेतकरी आपल्या घरच्या शेतातील काम आटोपून दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरी आला. घरात असलेल्या लोखंडी कपाटातील साहित्य अस्तव्यस्त झालेले पाहून त्यांनी गावातील पोलिस पाटील राजेंद्र पाटील यांना माहिती दिली. पोलिस पाटील यांनी तत्काळ पाचोरा पोलिस स्टेशनशी संपर्क साधला. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांनी पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, सचिन पवार,…
जळगाव : प्रतिनिधी एकत्र कुटुंबातून वेगळे निघालेल्या भावजयीच्या घरात घुसून दिराने विनयभंग केला. ही घटना विवाहितेच्या सासरी घडल्यानंतर ती माहेरी आल्यावरदेखील येथे सासरा व जेठाने येऊन मारहाण करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावातील माहेर असलेल्या तरुणीचे २००७ मध्ये पंजाबमधील तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सासरची मंडळी विवाहितेला शारीरिक व मानसिक त्रास देऊ लागले. त्यामुळे विवाहिता वेगळी निघाली. २०२१मध्ये विवाहितेच्या दिराने घरात येऊन विवाहितेचा विनयभंग केला. तसेच वारंवार फोन करून जिवे ठार मारण्याची धमक्या दिल्या जात आहे. या प्रकरणी विवाहितेने जिल्हापेठ पोलिसात फिर्याद दिली. सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा…
चाळीसगाव : प्रतिनिधी एका बँकेतून बाहेर पडलेल्या इसमाच्या दुचाकीला लावलेल्या पिशवीतील तीन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना चाळीसगाव शहरातील स्टेशन रोडजवळ शनिवारी दुपारी १.५० वाजता घडली. दरम्यान या घटनेतील दोघे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील ओझर येथील राजेंद्र तान्हीराम वाणी (५७) यांनी बडोदा बँकेतून ३ लाखाची रक्कम काढली. बाहेर आल्यावर त्यांनी मोटारसायकलच्या मागील सीटच्या कडीला प्लॅस्टिक पिशवी लावली. काही वेळाने ही तीन लाख रुपये असलेली ही पिशवी लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. बँकेच्या…
सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील पोलीस खात्यातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. हि घटना सोलापूरमध्ये घडली आहे. या घटनेत पोलीस अधिकाऱ्यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं असावं याचा पोलीस शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस निरीक्षकाचं नाव आनंद मळाले असल्याचे समजते. ते पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. नांदेड जिल्ह्यात ते कर्तव्यावर असायचे. काही दिवसांपूर्वीच ते सोलापुरातील कुमठा नका परिसरातील त्यांच्या घरी आले होते. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हलवरने स्वत:वर गोळी झाडून घेतलीये. आनंद मळाले सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयामध्ये अनेक वर्ष पोलीस कॉन्स्टेबल म्हणून…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था नोएडा पोलिसांनी एनसीआर परिसरात अंमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या पती-पत्नीला अटक केली आहे. या दोघांनाही सेक्टर 112 जवळ अंमली पदार्थांचा पुरवठा करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केली. अटकेदरम्यान चौकशी सुरू केली असता, ते झोपडपट्टीसह पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणांना अंमली पदार्थांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले. सध्या तो कोणत्या ठिकाणी पुरवला जातो, या टोळीत किती लोक सामील आहेत, याची माहिती पोलीस गोळा करत आहेत. अंमली पदार्थांची तस्करी करणारी महिला आणि तिच्या पतीच्या ताब्यातून 200 ग्रॅम अल्प्राझोलम औषध जप्त करण्यात आले. बदाऊन येथील रहिवासी झोफिसा उर्फ जानवी आणि अखिलेश कुमार अशी तस्करांची नावे आहेत. हे दोघेही सध्या दिल्लीतील…
अकोला : वृत्तसंस्था राज्यातील विदर्भातून एक अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यात बुलढाण्याचे भाजप नेते व माजी आ.विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक झाली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजप नेते आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेवून ते अमरावतीकडे निघाले होते. यावेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे हे…
चाळीसगाव : प्रतिनिधी सध्या सोशल मिडीयावर अनेक तरुणीसोबत गेल्या काही वर्षापासून धक्कादायक घटना घडत असतांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसात देखील अशीच एक घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे अमिश दाखवून एका 26 वर्षीय महिलेवर चाळीसगाव येथे बलात्कार केल्याचा प्रकार ५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी एकाविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्याच्या एका गावात राहणाऱ्या २६ वर्षीय भाजी विक्री करणाऱ्या महिलेची इंस्टाग्रामवर आरोपी हृतिक पाटील पूर्ण नाव माहित नाही रा. धुळे याच्याशी इंस्टाग्राम द्वारे एक दोन महिन्यापूर्वी महिलेची…
पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीवर एकाला सात ते आठ जणांनी फायटरने डोक्याला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि रोकड बळजबरीने लुटल्याप्रकरणी पाचोरा पॊलिस स्टेशनला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा शहरातील नाथनगर ,जारगाव येथे दीपक शामराव पाटील वय ४१ हे वास्तव्याला असून ते ड्रायव्हिंग करून आपला उदरनिर्वाह चालवितात. ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास आरोपी निलेश दिलीप नागणे ,शुभम,भैय्या (पूर्ण नाव गाव माहीत नाही) आणि इतर सात ते आठ जण यांनी दीपक पाटील यांना जारगाव चौफुली येथे चापट बुक्क्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करून निलेश नागणे याने त्याच्याजवळील फायटरने डोक्यावर मारून दुखापत…
भुसावळ : प्रतिनिधी यावल शहरात चहा पिताना झालेल्या मस्करीतून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात जखमी झालेल्याचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. हि घटना दि.६ रोजी सायंकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, यावल शहरात दि.६ रोजी सायंकाळच्या सुमारास बोरावल गेट परिसरात धनगरवाडा येथील रहिवासी प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५) हे चहाच्या स्टॉलवर बसलेले असतांना या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू होते. यातूनच रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) या व्यक्तीने चेष्टा मस्करी चालु असतांना त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात धनगर हे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत तात्काळ प्रभाकर धनगर यांना…

