आजचे राशिभविष्य दि.२८ जानेवारी २०२६ मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी, तुमच्या पालकांचा सल्ला अवश्य घ्या. धर्म आणि अध्यात्मावरील तुमचा विश्वास दृढ राहील, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. वृषभ राशी आज तुम्ही मित्रांसोबत मजा करण्यात वेळ घालवाल. तुमच्या घरात काही सजावटीचे काम असेल. आजचा दिवस खूप भाग्यवान ठरेल. तुमच्या व्यवसायातील कामाचे पहिलं मोठं पेमेंट आज मिळू शकतं. ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद आणि उत्साह मिळेल. मिथुन राशी तुमचा संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. एखाद्या महत्त्वाच्या कामात उशीर होऊ शकतो. जर तुम्ही आज काहीतरी नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर सुरुवात…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजातील अपेक्षांना मोठा दिलासा मिळण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांनंतर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू केले होते. त्यानंतर मराठवाड्यातील अनेक मराठा बांधवांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळू लागला. मात्र, सातारा गॅझेट अद्याप लागू न झाल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला. उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसह हैदराबाद गॅझेटच्या कार्यप्रणालीवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत ठरले आहे की, राज्यातील जिल्हा परिषद…
मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (२७ जानेवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनतेच्या हिताचे पाच महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या निर्णयांचा थेट लाभ तरुण विद्यार्थी, कंत्राटदार, उद्योजक, शेतकरी व कामगार वर्गाला होणार असून रोजगार, उद्योग व महसूल विभागाशी संबंधित महत्त्वाच्या धोरणात्मक बाबींना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. १. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता आयटीआयमध्ये ‘पीएम सेतू’ योजना (रोजगार व कौशल्य विकास) राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (ITI) आता ‘पीएम सेतू’ (Pradhan Mantri Skilling And Employability Transformation through Upgraded ITIs) योजना राबवली जाणार आहे. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होणार आहेत. अंमलबजावणी: पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि…
भंडारा : वृत्तसंस्था भंडारा येथे आयोजित एका सार्वजनिक गायन कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बलात्काराच्या वाढत्या घटनांवर भाष्य करताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल निंदनीय व आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होत असून, या वक्तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, विरोधी पक्षातील नेत्यांनीही या विधानाचे समर्थन करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १३ जानेवारी रोजी भंडाऱ्यात भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंजली भारती यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी बोलताना त्यांनी राज्यात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटनांवर संताप व्यक्त केला.…
जालना : वृत्तसंस्था पुण्याकडून यवतमाळच्या दिशेने २७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला (MH-29 AW 4444) आज पहाटे सुमारे तीन वाजता भीषण आग लागली. जालना–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर तालुक्यातील शेळगाव येथील पेट्रोल पंपासमोर ही धक्कादायक घटना घडली. बसचे टायर फुटल्याने लागलेल्या या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्व २७ प्रवासी सुखरूप बचावले. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस काल रात्री पुण्यातून प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. पहाटे तीनच्या सुमारास शेळगाव परिसरात अचानक बसचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली; मात्र टायरच्या घर्षणामुळे क्षणार्धात बसने पेट घेतला. त्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असल्याने एकच गोंधळ…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून साकरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत झालेल्या दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून शाळेत शिक्षण घेत होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने किंवा संशयिताने दोन्ही मुलींना विहिरीत ढकलून त्यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला पोलिसांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात ताब्यात घेतले…
सांगली : वृत्तसंस्था राज्यात जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकीय वाकयुद्ध अधिकच तीव्र झाले आहे. सांगली येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत बोलताना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विरोधकांवर थेट टीका करत, आगामी निवडणुकांत त्यांच्या पराभवाचे भाकीत केले. चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचला आहे. लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या सन्मान योजनांमुळे सामान्य जनता समाधानी असून, सरकारच्या कामावर विश्वास व्यक्त करत आहे. “जनतेचा हा पाठिंबा येणाऱ्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्टपणे दिसून येईल,” असा दावा त्यांनी केला. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका…
पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग राज्यात तिसरा जळगाव | प्रतिनिधी महाराष्ट्र शासन व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया (QCI) यांच्या संयुक्त मूल्यमापनातून राबविण्यात आलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यातील तब्बल 57 मंत्रालयीन विभागांपैकी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने थेट तिसरा क्रमांक पटकावत 200 पैकी 170.50 गुण मिळवले आहेत. हा विभाग जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. या मूल्यमापनात पहिला क्रमांक सार्वजनिक बांधकाम विभागाने, तर दुसरा क्रमांक वन विभागाने मिळवला असला, तरी ग्रामीण जीवनाशी थेट निगडित, नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी जोडलेला पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग तिसऱ्या क्रमांकावर येणे ही मोठी प्रशासकीय कामगिरी मानली जात आहे.…
कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यात नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे उमेदवार प्रचारात व्यस्त असताना सांगली जिल्ह्यातील विटा शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात भाजपाचे माजी आमदार सदाशिव पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू व भानामती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या एका बंगाली भोंदू बाबाने आणि त्याच्या स्थानिक साथीदाराने घरासमोर अंधश्रद्धेशी संबंधित…
आजचे राशिभविष्य दि. २७ जानेवारी २०२६ मेष राशी व्यवसायात भागीदारी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या पालकांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. कौटुंबिक संबंधही सुसंवादी राहतील. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. वृषभ राशी तुमची आर्थिक परिस्थिती बरीच मजबूत असेल. पर्यटनाशी संबंधित लोकांना आर्थिक फायदा होईल. तुम्हाला उत्साही वाटेल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. तुम्ही स्वतःला काही सर्जनशील कामात गुंतवून घ्याल. मिथुन राशी तुम्ही तुमच्या कामात मित्राची मदत घेऊ शकता. संयमी निर्णय यशाचे नवीन मार्ग उघडू शकतात. आज कोणत्याही जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करणे टाळावं, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागू शकतो. कर्क राशी आज तुमची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण होतील.…

