Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कुंटणखान्यावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी अटकेत
    क्राईम

    कुंटणखान्यावर छापा; अल्पवयीन मुलीची सुटका, आरोपी अटकेत

    editor deskBy editor deskJanuary 25, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    सहा महिन्यापुर्वी भाडेतत्वावर घेतलेल्या घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर एएचटीयू आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणाहून देहविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली. तर कुंटणखाना चालविणाऱ्या विजय सखाराम तायडे (वय ३२, रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याला अटक केली. ही कारवाई दि. २३ रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास केली. या कारवाईचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खेडी शिवारातील हनुमान नगरात विजय याने भाडेतत्वावर घर घेतल होते. त्याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून तो अल्पवयीन मुलीला डांबून ठेवत तेथे कुंटणखाना चालवित असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाली. त्यांनी दि. २३ रोजी मानव तस्करी विरोध विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार केले. या पथकाने रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास पथकाने डमी ग्राहक पाठविला आणि कारवाईसाठी परिसरात सापळा रचून बसले होते. डमी ग्राहकाने मिसकॉल देताच सापळा रचून बसलेल्या पथकाने कुंटणखाना सुरु असलेल्या घरावर छापा टाकला.घरावर छापा टाकल्यानंतर याठिकाणाहून अल्पवयीन मुलीसह कुंटणखाना चालविणाऱ्या संशयित विजय तायडे याला ताब्यात घेतले. त्या पीडित मुलीची चौकशी केली असता, तीने संशयित तायडे हा तीला घरात डांबून ठेवले होते आणि तिच्याकडून स्वतःच्या आर्थीक फायद्याकरीता वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे तीने सांगितले.

    कुंटणखाना चालक विजय सखाराम तायडे (रा. हनुमान नगर, खेडी शिवार) याच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात पोक्सोचे कलम वाढविण्यात आले आहे. संशयित तायडे याच्याविरुद्ध यापुर्वी कुंटणखाना चालवून वेश्या व्यवसाय करुन घेतल्याप्रकरणी तीन गुन्हे दाखल आहे.

    ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली मानव तस्करी विरोधी पथकाचे सपोनि हरिदास बोचरे, एलसीबीचे उपनिरीक्षक शरद बागल, सफौ, अतुल वंजारी, संजय हिवरकर, पोहेकॉ नितीन बाविस्कर, जितेंद्र पाटील, अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, रविंद्र पाटील, रविंद्र गायकवाड, अनिल पाटील, महिला सफौ निलीमा सुशीर, भुषण कोल्हे, वहिदा तडवी, राहुल वानखेडे यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.