लातूर : वृत्तसंस्था शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यातील दुकानाला शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. प्रचंड धूर इमारतीत पसरला अन् दुसऱ्या मजल्यावर राहणारे तिघे जण गुदमरून मृत्युमुखी पडले. तर तिघांनी गॅलरीला साडी बांधून खाली उतरत स्वत:चा जीव वाचविला. सुनील शिवाजी लोंढे (५५), प्रमिला सुनील लोंढे (५०) हे पती- पत्नी व त्यांच्या आई कुसुमबाई शिवाजी लोंढे (८०) अशी मयत तिघांची नावे आहेत. लोंढे यांचे शिवाई कॉम्प्लेक्स असून, तळमजल्यावर दुकाने, दुसऱ्या मजल्यावर लोंढे कुटुंबीय आणि तिसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहत होते. तळमजल्यावरील फुलांच्या दुकानाला लागलेल्या आगीने धुराचे लोट चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचले. दुसऱ्या मजल्यावरील लोंढे कुटुंबीय तिथेच अडकले. खूप…
Author: editor desk
धुळे : वृत्तसंस्था शौचालयातून घरी परतणाऱ्या अल्पवयीन युवतीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यातील एका खेड्यात घडली आहे. याप्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे तालुक्यातील एका खेड्यात राहणारी अल्पवयीन युवती दि. २६ जुलै २०२३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास शौचालयातून घरी परतत असताना संशयित अमन शामिल पवार याने तिचे अपहरण केले. तिला गावाबाहेर असलेल्या जंगलातील एका जुन्या झोपडीत नेवून तेथे त्याने युवतीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने तिला त्याच्या घरात बळजबरीने ठेवून घेतले. शिवाय युवतीला शिवीगाळ करून मारहाणही केली. पीडित युवतीचे आई-वडील तिला घेण्यासाठी त्याच्याकडे गेले…
नांदेड : वृत्तसंस्था राज्यभरात आता मराठा आंदोलनकर्ते संतप्त झाले जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत गावात पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली असून राज्यातील अनेक गावामध्ये राजकीय नेते आणि पुढाऱ्यांना मराठा संघटनांकडून गावबंदी करण्यात येत आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना देखील बसताना दिसून येत आहे. नांदेडचे भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर तेलंग याच्या भेटीसाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर गुरुवारी रात्री कंधार तालुक्यातील अंबुलगा गावात गेले होते. खासदार चिखलीकर गावात आल्याचं लक्षात येताच गावकरी आक्रमक झाले. आरक्षण दिल्याशिवाय आमच्या गावात पाय ठेवू नका, असं म्हणत संतप्त…
जळगाव : प्रतिनिधी शतपावलीसाठी गेलेल्या अर्जुन भिवसन चौधरी (वय ८५, रा. चौघुले प्लॉट शनिपेठ) यांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठमधील चौघुले प्लॉट परिसरात अर्जून चौधरी हे आपल्या पत्नी आणि चार मुलांसह वास्तव्याला होते. रोज पहाटे शतपावली करण्यासाठी जात होते. दरम्यान गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे फिरण्यासाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान जळगाव ते भादली दरम्यानच्या रेल्वे खंबा क्रमांक ४२१ – २ जवळ रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आले. परिसरातील अर्जुन चौधरी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील द्वारकानगर जवळ महामार्ग ओलांडत असतांना भरधाव वेगातील आयशरने दुचाकीवर जाणाऱ्या बापलेकाला उडविल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजता घडली. या अपघातात दोन्ही बापलेक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरील द्वारकानगर स्टॉपजवळील साईराज रेस्टॉरंटसमोर रात्री आठ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात दीपक गोकुळ सोनवणे व त्यांचा मुलगा लोकेश दीपक सोनवणे (वय ५, रा. बिबानगर) हे बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात दुचाकीस्वार दीपक सोनवणे व त्यांच्या मुलगा लोकेश हे दोघे गंभीर जखमी झाले. महामार्गावरुन जाणाऱ्या…
जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्री एक ३१ वर्षीय व्यापारी रेल्वे स्थानकावर कामानिमित्त आला असतांना काही तरुणांनी त्याला मारहाण करीत त्याच्या गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या जळगाव शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टॉपजवळ घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप येथे आलेला होता. त्यावेळी चेतन दिलीप येवले (वय १९) आणि अविनाश विजय…
पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात वाहतुकीचा मोठा प्रश्न सुरु असतांना अनेक चौकाचौकात पोलीस कर्मचारी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी सज्ज असतात. अशीच एक कारवाई बुधवारी सुरु होती. ट्रिपल सीटची दंडात्मक कारवाई केल्यामुळे एकाने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याच्या डोक्यात सिमेंटच्या ब्लॉकने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी पोलिसांनी सैन्य दलातील जवानाला अटक केली आहे. ही घटना बुधवार चौकात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बुधवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात फरासखाना वाहतूक विभागातील पोलिस कर्मचारी रमेश ढावरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिस कर्मचारी पंकज शंकर भोपळे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून वैभव संभाजी मनगटे (वय २५, रा.…
धुळे : वृत्तसंस्था खान्देशातील धुळे जिल्ह्यातील बोरकुंड व मोघन परिसरात गेल्या काही दिवसापासून बिबट्याचा चांगलाच हैदोस बघायला मिळत आहे. हल्ल्यात एका बालकाचा मृत्यू झाला असताना वन विभागाकडून अद्याप कोणताच बंदोबस्त करण्यात आलेला नाही. याच दरम्यान बिबट्याने आणखी एका मुलावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील धुळे तालुक्यातील बोरकुंड शिवारात शेतातून वडिलांसोबत घरी परतत असलेल्या लहान मुलावर हल्ला केला होता. त्यात चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील उघडकीस आली होती. त्यानंतर दोनच दिवसात त्याच परिसरामध्ये असलेल्या मोघन येथे बिबट्याने पुन्हा एकदा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.धुळे तालुक्यातील दहा वर्षाच्या बालकावर…
हिंगोली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यात मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन सुरु असतांना काही तरुणानी आरक्षणासाठी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना उजेडात येत असतांना पुन्हा एकदा अशीच एक धक्कादायक घटना हिंगोलीत देखील घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर असं मृत तरुणाचं नाव आहे. हिंगोलीच्या देवजना गावातील रहिवासी नवनाथ हा होता. त्याने बाळापूर आखाडा शिवारात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. दरम्यान, नवनाथने मराठा आरक्षणासाठीच आत्महत्या केली, असा दावा गावकऱ्यांकडून केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ कल्याणकर हा सोयाबीन काढण्यासाठी शेतात मळणी यंत्र घेऊन गेला होता. मजुरांना मळणी यंत्र सुरू करून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहेत. नुकतेच मुंबई येथील टिळकनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम स्कूल बस चालकाने ११ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी बसचालकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूल बसमधून घरी परतत होती. यावेळी बसमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी बसचालकाने…

