Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चार मजली इमारतीला भीषण आग तर गुदमरून तिघांचा मृत्यू !
    क्राईम

    चार मजली इमारतीला भीषण आग तर गुदमरून तिघांचा मृत्यू !

    editor deskBy editor deskOctober 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लातूर  : वृत्तसंस्था

    शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकानजीक एका चार मजली इमारतीच्या तळमजल्यातील दुकानाला शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी सकाळी अचानक आग लागली. प्रचंड धूर इमारतीत पसरला अन् दुसऱ्या मजल्यावर राहणारे तिघे जण गुदमरून मृत्युमुखी पडले. तर तिघांनी गॅलरीला साडी बांधून खाली उतरत स्वत:चा जीव वाचविला.

    सुनील शिवाजी लोंढे (५५), प्रमिला सुनील लोंढे (५०) हे पती- पत्नी व त्यांच्या आई कुसुमबाई शिवाजी लोंढे (८०) अशी मयत तिघांची नावे आहेत. लोंढे यांचे शिवाई कॉम्प्लेक्स असून, तळमजल्यावर दुकाने, दुसऱ्या मजल्यावर लोंढे कुटुंबीय आणि तिसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहत होते. तळमजल्यावरील फुलांच्या दुकानाला लागलेल्या आगीने धुराचे लोट चौथ्या मजल्यापर्यंत पोहोचले. दुसऱ्या मजल्यावरील लोंढे कुटुंबीय तिथेच अडकले. खूप प्रयत्न करूनही त्यांनी बाहेर पडता आले नाही. तिसऱ्या मजल्यावर बीड येथील एक महिला व त्यांची दोन मुले भाड्याने राहतात. धुरामुळे पाययांवरून खाली उतरणे शक्य नसल्याचे लक्षात येताच जिनाब फातेमा (४५), सय्यद अजरा फराज (२२), सय्यद फहाज (२१) हे तिघे गॅलरीला साडी बांधून खाली उतरले आणि आपला जीव वाचविला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.