Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यभरात अनेक चोरीच्या घटना घडत असतांना आता या चोरीपासून अभिनेते सुद्धा दूर जावू शकले नाही. मराठी चित्रपटसृष्टील प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री याला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या घरात मदतनीस म्हणून काम करणाऱ्या महिलेने १० लाखो रुपयांहून अधिक किमतीचे दागिने चोरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या घरातील लाखभर रुपयाची रोख रक्कम आणि फॉरेन करन्सी देखील (परदेशी चलन) चोरीला गेली आहे. ही चोरी उघडकीस आल्यानंतर पुष्कर श्रोत्री याने पोलिसांत धाव घेत उषा घांगुर्डे आणि भानुदास घांगुर्डे या दोघांविरोधात फसवणूक आणि विश्वास भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पण पुष्कर श्रोत्री यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गांधीधाम एक्स्प्रेसमधून २६ किलो गांजा जप्त केला आहे. अकोला ते भुसावळ दरम्यान ड्यूटीवर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या शौचालयात दोन बेवारस गोण्या आढळून आल्या होत्या. त्याची तपासणी केली असता त्यात २ लाख ६२ हजारांचा गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी दि.२७ रोजी आचेगाव रेल्वेस्थानकादरम्यान करण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी संजय पाटील आणि जितेंद्र इंगळे हे शुक्रवारी (त. २७) श्र्वानपथकासह गांधीधाम एक्स्प्रेस (२०८०३) मध्ये ड्यूटीवर असताना आचेगाव स्थानकावरून गाडी सुटताच श्र्वानाला (वीरू) उग्र वासामुळे कोच क्रमांक एस ९ च्या पुढच्या बाजूला वॉशरूममध्ये दोन बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या. ही माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्रात चोरी झाल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी केंद्रातील औषधाचे दुकान फोडून त्यातील रोकड आणि इतर साहित्य चोरून नेले. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील चिंतामणी मोरया परिसरात श्री स्वामी समर्थ केंद्र आहे. अज्ञात चोरट्यांनी गुरुवारी रात्री केंद्रातील श्री स्वामी समर्थ मुद्रण आणि आयुर्वेदिक औषधीचे दुकान फोडून रोकड आणि इतर साहित्य असा एकूण अंदाजे अडीच हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एवढेच नव्हे तर चोरट्यांनी केंद्रातील दानपेटी ही लांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ही दानपेटी फोडण्यात अपयश आल्यामुळे चोरट्यांनी दानपेटी तेथेच सोडून पळ काढला. सकाळी नेहमी प्रमाणे भाविक केंद्रात आल्यावर चोरीचा प्रकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील एका २३ वर्षीय तरुणाने एका अल्पवयीन तरुणीला खोटे नाव सांगून ओळख निर्माण करीत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध निर्माण करीत व नंतर त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी अफताब उर्फ अप्पू कलमीस बेग (२३, रा. समतानगर) या तरुणाविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका भागात राहणारी तरुणी एका नामांकीत महाविद्यालयात इयत्ता अकरावीमध्ये शिक्षण घेत होती. सध्या ती एका महाविद्यालयात अभियांत्रिकीची शिक्षण घेत आहे. इयत्ता अकरावीमध्ये असतानाच तिच्याशी अप्पू याने खोटे नाव सांगून ओळख निर्माण केली. त्यांच्यात संवाद वाढत जाऊन त्याचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. नंतर ते…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील बिलखेडा या गावाची रचना झाली तेव्हा पासून या गावात मूलभूत सुविधांसह रस्ते नव्हते. आज या गावात जि प सदस्य प्रताप पाटील यांनी महिनाभर आपली दिलेले आश्वासन पाळत गावातील रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. महिनाभरापूर्वी जि प सदस्य प्रतापराव पाटील हे जळगाव ग्रामीण विधान सभा मतदार संघात प्रत्येक गणांत बैठका घेऊन गावातील समस्या जाणून घेत आहे. यादरम्यान धरणगाव तालुक्यातील बिलखेडा गावात गण बैठक मध्ये त्यांना या गावातील विकास कामाबाबत त्यांनी आश्वासन दिले होते. यात काही विकासाच्या समस्या होत्या त्या जाणून विविध किकास कामे सुचवण्यात आले होते. गण बैठकीत दिलेले आश्वासन महिन्याभरातच हे पूर्ण करण्याचे काम…

Read More

भडगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील गुढे येथील लवण शिवारात गट नंबर ९८ मध्ये बिबट्याने बांधलेल्या बैलावर हल्ला चढवीत फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या परिसरात असंख्य जनावरे बिबट्याच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. याबाबत तक्रार करूनही वनविभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून बहाळ नावरे, पथराड, कोळगाव, सावदे, जुवार्डी शेतशिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. शुक्रवारी पहाटे लवण शिवारात आनंदा महाजन यांच्या गट नंबर ९८ मध्ये बांधलेला चार वर्षांचा बैल बिबट्याने ठार केला. शेतकरी सुनील नामदेव महाजन सकाळी शेतात गेले असता बैल मृतावस्थेत दिसून आला. एखाद्या शेतकऱ्यांचा बळी गेल्यावर वन विभाग बिबट्याला जेरबंद करील का?…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावातून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस अनोळखी इसमांनी पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील हिगोणे या गावात १३ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.२२ रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास तिच्या राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी लागलीच धरणगाव पोलिसात धाव घेत अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपास पोहेकॉ.खुशाल पाटील हे करीत आहेत.

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महिला आई होण्यासाठी अनेक प्रयत्न करीत असतात तर काहीना मुल असल्यावर त्यांना चुकीची वागणूक तर काही तर पैश्यासाठी विक्री देखील करीत असल्याची प्रकार उघडकीस आला आहे. हरियाणातील सिरसा येथे एका आईने पैशाच्या लालसेपोटी स्वतःच्या नवजात बाळाला विकलं. मुलाचे वडील संजीव कौशल याने आरोप केला आहे की त्याची पत्नी प्रियंका हिने तिची आई आणि भावासोबत मुलाची 4.5 लाख रुपयांना विक्री केली आहे. पतीने सांगितलं की, त्याला सांगण्यात आलं की, मूल जन्मल्यानंतर दोन दिवसांनी आजारी पडलं नंतर त्याचा मृत्यू झाला. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. त्यानंतर, न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांनी या प्रकरणात आरोपी आई प्रियंकासह 6 जणांविरुद्ध एफआयआर…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात ४२ वर्षीय महिलेचा घरी जात जुन्या भांडणाच्या कारणाने शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी यावल पोलिसात दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील कोळन्हावी या गावात ४२ वर्षीय महिला शेती करून आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. दि.२५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गावातील दोन संशयित आरोपी दारूच्या नशेत येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेच्या घराबाहेर अश्लील शिवीगाळ तसेच त्यांच्या दोन मुलांना मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने पोलिसात धाव घेत दोन संशयित आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना सध्या अशाच एका गुन्हेगारी कृत्याने मुंबई येथील वडाळा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ट्रकच्या मागे एका अनोळखी महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचं वय साधारणपणे ३० ते ४० च्या दम्यान असल्याची माहिती मिळत आहे. या महिलेचे तीन तुकडे करण्यात आले होते. त्यापैकी डोकं धड आणि एक पाय पोलिसांना सापडला आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट येथील आमच्या गस्ती पथकाला एक संशयास्पद पिशवी सापडली होती, ज्यामध्ये एक जळालेला मृतदेह होता. आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. एका…

Read More