मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात छोटे मोठे भांडण नेहमी होत असते पण काही वेळेनंतर हेच भांडण शांत देखील होत असते. अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीने पतीला काम सांगितले. या गोष्टीचा राग मनात धरुन चिडलेल्या पतीने घरातील बेडरुमधील पंख्याच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून पत्नीला फास देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पत्नी पतीच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. आठ महिन्यापूर्वीच खुशाल जाधव याचे तनिषा या तरुणीशी लग्न झाले आहे. हे दोघेही कल्याण पूर्वेतील मलंग रोड परिसरात राहतात. खुशाल हा कामावर जात नाही. घरात…
Author: editor desk
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव येथील पारोळा चौफुलीजवळ शनिवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास भरधाव बस चालकाने दिलेल्या धडकेत निंबा भिवसन कोळी (वय ६०, रा. गुढे ता. भडगाव) हे वृद्ध जागीच ठार झाले. यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गुढे येथील निंबा कोळी हे वृद्ध प्रसाद रविंद्र चौधरी (वय १६, रा. पिलखोड ता. चाळीसगाव) याला सोबत घेवून (एमएच १९ ऐएफ ३१२८) क्रमांकाच्या दुचाकीने गोंडगावकडून कजगावकडे येत होते. तर कजगावकडून भडगावकडे जात असलेली पुणे एरंडोल येथील (एमएच २० बीएल २६५२) क्रमांकाची बसने दुचाकीस्वाराला पारोळा चौफुलीजवळ जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर झाले.…
जळगाव : प्रतिनिधी कंपनीतून काढल्याचा राग आल्याने यशवंत रामकृष्ण महाजन ( वय ६४, रा. संतोषनगर, जळगाव) हे दुचाकीने घरी जात असताना त्यांना प्रमोद नामदेव पाटील (वय ३५, रा. नशिराबाद) यांने बांबूने मारहाण केली. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील संतोषनगरात यशवंत रामकृष्ण महाजन हे वास्तव्यास असून ते एका कंपनीत अधिकारी म्हणून नियुक्त आहेत. याच कंपनीत प्रमोद पाटील हा तरुण कामाला होता. त्याला कंपनीतून काढून टाकण्यात आल्याने हा राग त्याच्या मनात होता. कंपनीतील अधिकारी यशवंत रामकृष्ण महाजन हे दि. २६ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी दुचाकीन जळगाव येथे घरी परतत असताना नशिराबाद येथील उड्डाणपुलाजवळ…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील बडी खानकाह परिसरात राहणाऱ्या महिलेला कारण नसतांना चार जणांनी शिवीगाळ करत मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील बडी खानकाह जवळ हिना असीफ शहा (वय २८) या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २४ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजता महिलेला कारण नसतांना परिसरात राहणाऱ्या खलील मणीयार, शबीना खलील मणीयार, मुमताज मणीयार, कन्नो मणीवार सर्व राहणार बड़ी खानकाह जवळ, भुसावळ यांनी पाणी भरण्याचे नळीने आणि कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण करून दुखापत केली आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने भुसावळ बाजारपेठ…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंद पोलीस स्थानक व शनी पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या शहजाद खान उर्फ लल्ला सलीम खान (२५, रा. काट्या फाईल, शनिपेठ) व मयूर उर्फ विक्की दिलीप अलोणे (३१, रा. बारसे कॉलनी, स्मशानभूमीजवळ) या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. शनिपेठ पोलिस स्थानकाच्या हद्दीतील रहिवासी शहजाद खान, रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारा मयूर उर्फ विकी दिलीप आलोणे या दोघांवर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे व रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी दोघांच्या एमपीडीएचा प्रस्ताव स्थानिक गुन्हे शाखेकडे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात विधानसभा निवडणूक सुरु असतांना गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताअसलेले आसामधील माजी पंचायत सदस्य आणि भाजप नेते अब्दुल सत्तार यांचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. करीमगंज जिल्ह्यातील पाथरकांडी परिसरातून पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. भारतीय जनता पक्षाचे स्थानिक राजकारणी अब्दुल सत्तार २३ ऑक्टोबरपासून बेपत्ता होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. सत्तार यांच्या शरीरावर अनेक जखमा होत्या. त्यावरून त्यांच्यावर हल्ला झाल्याचे शंका आहे. करीमगंज जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक पार्थ प्रतिमा दास यांनीही हत्येचा संशय व्यक्त केलाय. तसेच सत्तार यांच्या कुटुंबियांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. अब्दुल सत्तारच्या हत्येत स्थानिक काँग्रेस नेता सुरमन अली आणि…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका २५ वर्षीय विवाहितेसह तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. २७ रोजी पहाटे चार वाजता संशयित इम्रान शहा याने अनधिकृतपणे महिलेच्या घरात प्रवेश करीत तिला व मुलांना ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार केला. फिर्यादीच्या पतीने सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यास हातावर चावा घेत शिविगाळ करण्यात आली. याप्रकरणी पीडीतेने तक्रार दिल्यानंतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहेत.
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यतील अनेक ग्रामीण भागात सध्या निवडणुकीचे वेध लागले आहे तर धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ.हेडगेवार नगर ग्रामपंचायतीमध्ये देखील निवडणुकीची धामधूम सुरु आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. २ मध्ये चांगलीच रस्सीखेच असतांना येथील चंदन दिलीपराव पाटील यांना उमेदवार मोहित प्रकाश पवार यांनी जाहीर पाठिंबा दिल्याने निवडणुकीचे आता चित्र बदलू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहर परिसरात असलेल्या डॉ. हेडगेवार नगर ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरु झाली असून माघारीच्या दिवशी वेळ संपल्याने प्रभाग क्र. २ मधील उमेदवार मोहित प्रकाश यांनी चंदन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत जाहीर पाठींबा दिला. यावेळी भीमराज पाटील,अॅड.शरद माळी, भूपेंद्र…
मुंबई : वृत्तसंस्था जगभरातील अनेक मुल मुली सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असतात. अशाच सोशल मिडीयावर अवघ्या दोन आठवड्यापूर्वी इंस्टाग्रामवर सुहाना नावाच्या मुलीची फ्रेंडशिप रिक्वेस्ट मिळाली. ती पॉलिसी विकणाऱ्या कंपनीच्या रिलेशनशिप मॅनेजरने एक्सेप्ट केली. त्यानंतर ती भेटायलाही आली आणि बोलण्यात गुंतवत त्याचा मोबाईल घेऊन पसार झाली. हा प्रकार मालाड पश्चिम परिसरात घडला असून बांगुर नगर पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार अब्दुल ( नावात बदल) याने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तो २५ ऑक्टोबर रोजी त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याला सुहाना या नावाचा आयडीवरून मालाड पश्चिम च्या इन्फिनिटी मॉलमध्ये भेटण्यासाठी मेसेज आला होता. त्याच्या दोन आठवड्यापूर्वी याच आयडीवरून आलेली रिक्वेस्ट…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक घटना सोशल मिडीयावर जलद गतीने व्हायरल होत असतात. असाच एक अनुभव नुकताच आला ज्यामुळे पोलिसांची नुसती धावपळ उडाली. असं काय होतं त्या ट्विटमध्ये ? जयपूर बांद्रा एक्सप्रेस मध्ये 4 संशयित दहशतवादी साधूच्या वेषात असल्याचे ट्विट आल्याने एकच खळबळ उडाली. एका इसमाने रेल्वे हेल्पलाइन वर ट्विट हे केलं होते. ही ट्रेन लवकरच पालघर स्टेशनवर पोहोचणार होती, हे कळताच पालघर रेल्वे स्टेशनला अक्षरश: छावणीचं स्वरूप आलं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका इसमाने ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेल्वे हेल्पलाइनला टॅग करत एक फोटो पोस्ट केला होता. जयपूर बांद्रा एक्सप्रेसमध्ये…

