Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » स्कूल बस चालकाने केला शाळकरी मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    स्कूल बस चालकाने केला शाळकरी मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskOctober 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असून यामध्ये अल्पवयीन मुलीचं प्रमाण सर्वाधिक आहेत. नुकतेच मुंबई येथील टिळकनगर परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधम स्कूल बस चालकाने ११ वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.

    याप्रकरणी पीडित मुलीच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी बसचालकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरातून संतापाची लाट उसळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी शाळा संपल्यानंतर स्कूल बसमधून घरी परतत होती. यावेळी बसमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत आरोपी बसचालकाने तिला मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ दाखवले. इतकंच नाही, तर आरोपीने बस लोकमान्य टिळक टर्मिनसच्या कारशेड परिसरात नेली.

    तिथे तिच्यावर स्कूल बसमध्येच लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. दरम्यान, घरी आल्यानंतर पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवर अत्याचार झाल्याचं कळताच आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, पीडितेच्या आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपी बसचालकाविरोधात लैंगिक अत्याचार, विनयभंग, अपहरण तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत करण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक देखील केली आहे.

    #baschalk #criem #schoolbus Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    हिवाळ्यातही राहा फ्रेश आणि ग्लोइंग : परफेक्ट पार्टी लुकसाठी खास टिप्स

    December 8, 2025

    अंजली दमानिया सुपारीवर काम करतात; मास्टरमाइंडचा शोध घ्या !

    December 8, 2025

    विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाला शिंदे गटाचा विरोध !

    December 8, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.