Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील शिरसोली गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एमआयडीसीतील महावीर कंपनीजवळून अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. याबाबत गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरातील महावीर कंपनीजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चारचाकी वाहनात आलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकासह दोघांना गावठी पिस्टल व पाच जिवंत काडतुसांसह अटक केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. रेल्वे स्थानकाच्या केला सायडींगजवळ ही कारवाई गुरुवारी पावणेतीन वाजेच्या सुमारास करण्यात आली. योगेश महेश वंजारे (बौद्ध विहार, खडका, ता. भुसावळ) व विशाल भीमराव साळुंखे (वीटभट्टी ताजी, धुळे, ह.मु. खड़का सबस्टेशनजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत तर झायलो मालक विलास सपकाळे (शांती नगर, भुसावळ) हे पसार आहेत.तिन्ही संशयितांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहराचे निरीक्षक गजानन पडघण यांना गावठी पिस्टलासह संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांना कारवाईचे निर्देश…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सोशल मिडीयावर गेल्या काही दिवसापासून अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रोत पुरुषांच्या जोरदार हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसते की, एक तरुण आणि एका वयोवृद्ध प्रवाशांमध्ये वाद होत आहे. यामध्ये नुसता वाद होत नसून चक्क लाथाबुक्क्यांनी हाणामारी होत आहे. सुरुवातीस क्षुल्लक वाटणारा हा वाद काही क्षणात हाणामारीत रुपांतरित होईल असे कुणालाही वाटले नव्हते. https://twitter.com/gharkekalesh/status/1722576626888954150?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1722576626888954150%7Ctwgr%5E334fb080bd36862b3355b2c7c5613d3b9bec32ad%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fviral-videos%2Ftwo-man-fighting-in-delhi-metro-viral-video-tsp2000 वयस्कर व्यक्तीने तरुणाला लाथेने मारलं, ज्यामुळे तरुण खाली पडतो.तरुण खाली पडतो तेव्हा मेट्रोत बाजूला असलेला एक व्यक्ती वृ्द्ध व्यक्तीचे केस खेचतो. मात्र वाद वाढत आहे हे लक्षात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात अजित पवार यांच्या गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वात पक्ष संघटनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संजय पवार म्हणले की, आगामी होणाऱ्या निवडणुका संदर्भात धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे, काही अडचणी असतील तर माझ्याशी संपर्क साधून त्या तातडीने सोडाव्यात असे देखील त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. शिवसेनाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील उभी फूट पडल्याने शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तयार झाला आहे. आगामी काळात पक्ष संघटना नगरपालिका, जिल्हा परिषद गट , पंचायत समिती गण गावापातडीवर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक महामार्गावर अनेक अपघात होत असतात काही दिवसानंतर याची चौकशी देखील थांबत असते पण गेल्या आठ वर्षांपूर्वी गुरुग्रामच्या सेक्टर 57 जवळील रेल्वे विहार जवळ दहावीचा विद्यार्थी अमित चौधरी याचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. आपल्या काकांसोबत घरी चाललेल्या अमित याला एका अज्ञात वाहनचालकाने जोरदार ठक्कर मारली होती. रुग्णालयात त्याला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 279 ( बेपर्वाईने गाडी चालविणे ), 304 अ ( सदोष मनुष्यवध ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. परंतू चालकाची ओळख न पटल्याने पोलिसांनी फाईल बंद केली. अमितचे वडील जितेंद्र यांनी पोलिसांच्या पायऱ्या झिझवल्या परंतू त्यांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना एक भीषण अपघाताची घटना मुंबई शहरातील वरळी सी लिंकवरील टोल नाक्यावर एक भीषण अपघात गुरुवारी घडल्याचे समोर आले आहे. टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा ते सात वाहनांना भरधाव कारने मागून येत जोरदार धडक दिली आहे. हि घटना रात्री १० वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, वरळीहून वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेली एक इनोव्हा…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारने गेल्या काही दिवसाआधी राज्यातील ४० तालुक्यांना दुष्काळ जाहीर केला आहे पण राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी यावर आक्रमक होत आता आंदोलने सुरु झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात देखील राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या सुचनेनुसार धरणगाव तालुका दुष्काळ जाहीर करावा तसेच आणेवारी ५० पैशाच्यां आत लावावी व गिरणा धरण चे दोन आवर्तन रब्बी हंगामासाठी सोडावे या मागणीसाठी तहसीलदार धरणगाव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी धनराज माळी तालुकाध्यक्ष व दीपक वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मोहन नाना जेष्ठ नेते, रविदादा पाटील मार्केट कमिटी संचालक धरणगाव, अरविंद देवरे कार्याध्यक्ष, दिलीप…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विनापरवाना अवैध लाकडांची वाहतूक सुरु असताना पोलिसांनी एका संशयित आरोपीवर कारवाई करीत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमी मिळाली होती. दि. ८ नोव्हेंबर रोजी टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन (क्रमांक एमएच १५ डीके ३५६) या वाहनामध्ये अवैध लाकडाची वाहतुक होत आहे. बातमीनुसार संध्याकाळी साडेपाच वाजता नेरी नाका, पांचाळ गल्ली समोर रोडवर जळगाव टाटा कंपनीचा छोटा हत्ती वाहन मिळुन आले होते. त्यामधे निंब जातीच्या झाडाचे ओले लाकुड मिळाले होते. वाहनावर असलेला चालक सैय्यद मुस्तकिन सैय्यद मुनाफ (वय २५ वर्ष रा.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मराठा समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध पकड वॉरंट मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी बकालेला गुरुवारी बजावले आहे. तपासधिकाऱ्यांनी न्यायायालकडे बकाले याला फरार घोषीत करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बकाले याला कोणत्याही क्षणी अटक होवू शकते. मुख्यन्याय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या पकड़ ऑर्डरला स्थगिती मिळावी यासाठी बकाले याने मुख्यन्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात दि. ७ नोव्हेंबर रोजी पत्र दाखल केले होते. त्याला स्थगिती मिळावी बकाले याने न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने तपासधिकाऱ्यांचा खुलासा मागविला होता. परंतु यावर हरकत घेतली जाईल म्हणून बकाले याने दुसऱ्या दिवशी न्यायायालयात सादर केलेला अर्ज वकीलांमार्फत मागे घेतला. या संपूर्ण बाबीची माहिती मिळाल्यानंतर…

Read More

पारोळा : प्रतिनिधी  एका ४३ वर्षीय प्रौढाचा दि.७ रोजी पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि घटना पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील इंदाशी धरणात घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील अशोक जाधव (वय ४५) रा वसंतनगर हे दि.७ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास शेतात कामासाठी चाललो असे सांगून गेले होते. त्या दिवशी संध्याकाळपर्यंत घरी न आल्याने गावातील मंडळी व परिवाराचे सदस्यांनी सर्वत्र शोधाशोध करूनही आढळून आले नाही. मात्र आज दि.९ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास पिंपळकोठा शिवारात असलेल्या इंदाशी धरणात त्यांचा मृत्यू देह पाण्यात तरंगताना आढळून आला,…

Read More