Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बिगुल वाजला : लोकसभेआधी होणार विधानसभा निवडणूक : असा असेल कार्यक्रम !
    राजकारण

    बिगुल वाजला : लोकसभेआधी होणार विधानसभा निवडणूक : असा असेल कार्यक्रम !

    editor deskBy editor deskOctober 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

     

    पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा भारतीय निवडणूक आयोगाने आज जाहीर केल्या आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी मिझोराम, छत्तीसगड , मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केलं. मिझोराममधून १३ ऑक्टोबरपासून निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

    मिझोराम विधानसभा निवडणुकीचं मतदान ७ नोव्हेंबर घेतलं जाणार आहे. तर छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान तर १७ नोव्हेंबरला दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेतलं जाणार आहे. दरम्यान, मध्य प्रदेश- १७ नोव्हेंबर, राज्यस्थान -२३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबर रोजी मतदान घेतलं जाणार आहे, याबाबतची माहिती निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पाचही राज्यांच्या निवडणुकांची मतमोजणी ३ डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे. ५ डिसेंबरपर्यंत या पाच राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

    २०२३ च्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ६७९ विधानसभा मतदारसंघात सुमारे एक लाख ७७ हजार मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत. शिवाय पाच राज्यांच्या ९४० हून अधिक आंतरराज्य सीमेवरील चेक पोस्ट्सवर बेकायदेशीर रोकड, दारू, मोफत वस्तू आणि ड्रग्ज वाहतुकीच्या कोणत्याही सीमापार हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास आम्ही सक्षम आहोत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली.

    Loksabha nivdnuk Vidhansabha
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.