जळगाव : प्रतिनिधी विषारी औषध प्राशन केलेल्या कृष्णा निवृत्ती शिंपी ( वय ५७, रा. आयोध्या नगर) यांचा उपचार सुरु असतांना प्राणज्योत मालवली. ही घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अयोध्या नगरात कृष्णा शिंपी हे वास्तव्यास असून ते बांधकाम व्यावसायीक होते. शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास राहत्या घरात विषारी औषध सेवन केले. त्या वेळी चक्कर येऊन ते खाली पडल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. हा प्रकार त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी कृष्णा शिंपी यांना लागलीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी मारहाण केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून अलोक भास्कर कोळी (वय २१, रा. भोकर) व त्याचा मित्र दीपक याला चौघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना शुक्रवारी रोजी भोकर गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील भोकर गावातील अलोक कोळी हा तरुण शुक्रवारी दुपारच्या सुमारास अलोक हा त्याचा मित्र दीपक सोबत घराच्या ओट्यावर बसलेला होता. त्यावेळी अलोकने गावातील एका जणाला दीपकला केलेल्या मारहाणीचा जाब विचारला. याचा राग आल्याने गावातील चार जणांनी दोघांना लाठ्या काठ्या आणि लोखंडी सळईने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच दोघांना जीवेठार मारण्याची धमकी…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फातेमा नगरातील रहिवासी सलीम राजू पटेल (३६) यांना तुझ्या दुकानामुळे आमचा फर्निचर व्यवसाय चालत नाहीये, असे म्हणत दोन जणांनी मारहाण केली. तू आमच्या नादी लागू नको, नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीदेखील दिली. ही घटना १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सलीम पटेल यांचा फर्निचरचा व्यवसाय आहे. हाच व्यवसाय असलेल्या शिरसोली रस्त्यावरील दोन जणांनी पटेल यांच्या दुकानाजवळ जाऊन तुझ्यामुळे आमचा व्यवसाय चालत नाही, असे म्हणून शिवीगाळ केली. त्यावेळी एकाने लाकडी दांडक्याने कपाळावर व डोळ्यावर, तर दुसऱ्याने मानेवर, हातावर मारून दुखापत केली. याप्रकरणी पटेल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था किक्रेट जगात अफगाणिस्तानने आपला दबदबा निर्माण केलाय. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाने अनेकांना चकित केलं आहे. वर्ल्ड कप २०२३ मधील दमदार कामगिरीमुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघाची चर्चा होतेय. याशिवाय अफगाणिस्तानचा सलामी फलंदाज रहमानउल्ला गुरबाजची चर्चा अधिक होऊ लागलीय. गुरबाजचं कृत्य पाहून नेटकरी त्याचं कौतुक करत आहेत. अहमदाबाद येथे रहमानउल्ला गुरबाज त्याच्या कारमधून जात होता. त्यावेळी त्याला निराधार आणि बेघर लोकं फुटपाथ झोपलेले दिसली. यानंतर गुरबाज आपल्या कारमधून बाहेर आला आणि दिवाळीनिमित्त सर्वांना भेटवस्तू देऊ लागला. गुरबाजने मध्यरात्री फुटपाथवर झोपलेल्या लोकांना पैसे देऊन मदत केली. गुरबाजने फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या उशाशी ५००- ५०० नोटा ठेवत त्यांना दिवाळीची भेट…
अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण सुरु असतांना अपघाताच्या देखील घटना घडत आहे. अशीच एक घटना अहमदनगर तालुक्यातील चास शिवारात पुण्याहून नगरच्या दिशेने येताना थांबलेल्या पिकअपला खासगी बसने मागून जोराची धडक दिली. यात दोन पुरुष व एक महिलेचा मृत्यू झाला तर इतर १२ जण जखमी झाले आहेत. हे सर्व बीड व धाराशिव जिल्ह्यातील आहेत. दिवाळीच्या निमित्ताने नगरमार्गे ते पुण्याहून बीडला गावाकडे जात असताना शनिवारी पहाटे ४.४० वाजता ही दुर्दैवी घटना घडली. चास शिवारात एका पेट्रोल पंपासमोर एक कार रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी थांबली. त्यामागे पिकअपही (एमएच १२, एलटी ३९१३) येऊन थांबली. त्यानंतर मागून आलेल्या खासगी बसने (एम.एच.४३ बी.पी.…
जळगाव : प्रतिनिधी दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करुन ४० हजारांच्या रोकडसह २० हजारांचा सुकामेवा व मसाले चोरुन नेले. ही घटना गुरवारी मध्यरात्रीच्या सुमारास दाणाबाजारात घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश नगरात हरिचंद्र कन्हैयालाल ललवाणी (वय ५४) हे वास्तव्यास असून त्यांचे शहरातील दाणाबाजारात सतगुरु ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. दिवाळी सणामुळे दुकानात सुकामेव्यासह इतर माल भरलेला आहे. दि. ९ रोजी रात्री ललवाणी हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेच्या सुमारास ते दुकानावर आले असता, त्यांना दुकानाच्या भिंतीला भगदाड पडलेले दिसून आले. त्यांनी दुकानातील सामानाची पाहणी केली…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील फुले मार्केट परिसरात खरेदीसाठी आलेल्यांच्या पिशवीतून साडेचार हजारांची रोकड लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. सणानिमित्त खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असल्याने चोरटे देखील सक्रीय झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरात सुवर्णसिंग भरतसिंग राजपूत (वय ५१) हे वास्तव्यास आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी राजपूत हे शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील फुले मार्केट परिसरात गेले होते. त्यांनी सोबतच्या कापडी पिशवीत रोख रक्कम ठेवली होती. मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी राजपूत यांनी कापडी पिशवीत ठेवलेली साडेचार हजारांची रोकड काढून घेतली. काही वेळानंतर हा प्रकार राजपूत यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी…
अमळनेर : प्रतिनिधी भरधाव वेगात चारचाकी पुलाच्या कठड्याला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजेच्या सुमारास जानवे गावाजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गिरणा पंपिंगजवळील रहिवासी भगवान दलपत सपकाळे ( वय ६३) हे विजया भगवान कोळी (५५) आणि कुंतला भगवान कोळी (२४) यांना चारचाकी (एमएच १९ एएक्स ६४५३) वर अमळनेरहून धुळ्याकडे जात होते. वेगाने वाहन चालवल्याने जानवे गावाजवळ हॉटेल फाल्गुनीच्याजवळ पुलाच्या कठड्याला चारचाकी धडकली. त्यानंतर उलटून त्यात भगवान सपकाळे जागीच ठार झाले. विजया आणि कुंतला कोळी दोन्ही गंभीर जखमी झाल्या. परिसरातील ग्रामस्थांच्या मदतीने १०८ रुग्णवाहिकेने त्यांना उपचारासाठी धुळे जिल्हा सरकारी रुग्णालयात रवाना करण्यात आले. घटनेचे वृत्त…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून अनेक महत्वपूर्ण घडामोडी घडत असतांना कल्याण-डोंबिवली महापालिका २०१० च्या निवडणुकीत आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते राज ठाकरे यांना उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने राज ठाकरे यांच्याविरोधात १३ वर्षांपूर्वी दाखल केलेला गुन्हा आणि आरोपपत्र शुक्रवारी रद्द केले. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत पोलीस उपायुक्तांनी बजावलेल्या तडिपारीच्या नोटिशीचे पालन न केल्याबद्दल राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी राज ठाकरे यांना २९ सप्टेंबर २०१० रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत रात्री १० नंतर न राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र, राज ठाकरे यांनी ती…
नाशिक : वृत्तसंस्था शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या कार अपघातांत तीन दुचाकीस्वार ठार झाले. या अपघातात एक जण जखमी झाला असून, याप्रकरणी म्हसरूळ, अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील परशराम सीताराम शेखरे (वय ३४, रा. कोकणगाव बु., ता. दिंडोरी) हे सोमवारी (दि. ६) रात्री आपल्या दुचाकीवर दिंडोरी रोडने प्रवास करत असताना हा अपघात झाला. करी लिव्हज हॉटेल समोरून ते प्रवास करीत असताना पाठीमागून भरधाव आलेल्या विंगर कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेखरे यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार हिरामण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक राकेश पाटील (रा. विजयनगर, सिडको) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात…

