Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील पवन नगरातील २४ वर्षीय तरुण रेल्वे रुळ ओलांडतांना रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी रात्री २ वाजेपुर्वी घडली. या अपघातात दीपक सुकलाल सोनवणे (वय २४) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पवन नगरात दीपक सोनवणे हा कुटुंबियांसोबत वास्तव्याला होता. कटलरी व मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. रविवारी १२ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिपक सोनवणे हा कामाच्या निमित्ताने घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास खांबा क्रमांक ४२० च्या २६ ते २८ च्या सोमवारी १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २ वाजेच्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  राज्यभर दिवाळी सण मोठय उत्साहात साजरा होत असतांना अमळनेर तालुक्यातील एक गावात मात्र याच दिवशी एक दुर्देवी घटना घडली आहे. शौचालयाच्या टाकीत पडून दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पडली आहे. अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवार दि. १२ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घटना घडली आहे. यात भूषण दिलीप सोनवणे (वय-२) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेली होती. या टाकीजवळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एरंडोल शहरातील रहिवासी असलेल्या ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून धक्कादायक मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि.१३ रोजी संध्याकाळी उघडकीस आली आहे. शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत हि घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोल पंपामागील रहिवासी विशाल रविंद्र गायकवाड (वय ९) असे मयत बालकाचे नाव असून तो आई, वडील, लहान भाऊ- बहीण यांच्यासह राहतो. हातमजुरी करून त्याचा परिवार उदरनिर्वाह करतात. एरंडोल नगरपालिकेचे हिमालय पेट्रोलपंपामागे गटारीचे ढापे टाकायचे काम सुरु आहे. तेथे काही आसाऱ्या उघड्यावर धोकादायक स्थितीत ठेवलेल्या होत्या. सोमवारी विशाल त्याच्या मित्रांसह तेथे खेळत असताना अचानक तो पडला आणि एक आसारी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, AIIMS ने वैद्यकीय अधिकारी पदाची भरती जाहीर केली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही नोकरी मिळविण्यासाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तर पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने केली जाणार आहे. AIIMS भोपाळमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती केली जात आहे. हा करार आणखी 6 महिने किंवा एक वर्षासाठी वाढवला जाऊ शकतो. या भरतीअंतर्गत एकूण 4 जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी 1 पद अनारक्षित आहे. प्रत्येकी एक पद SC, ST, OBC आणि EWS साठी राखीव आहे. जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे MBBS पदवी असणे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर दिवाळीची धामधूम सुरु असतांना गुन्हेगारी घटना घडत उघडकीस येत आहे. अशाच एका घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि ३ मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला. मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला. मृताच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते कुणाल पवार यांची नुकतीच जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या “स्विकृत संचालक” पदी निवड करण्यात आली आहे. या आशयाचे पत्र देखील त्यांना संस्थेचे मानद सचिव वीरेंद्र भोईटे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. नियुक्ती पत्रात म्हटले आहे कि, जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या एक्झीकेटीव्ह कमेटी मध्ये झालेल्या चर्चेनुसार सर्वानुमते एक मताने आपली जळगांव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज मर्या., जळगांव या संस्थेच्या या संस्थेच्या एक्झीकेटीव्ह कमेटी वर “स्विकृत संचालक” म्हणून निवड करण्यात आलेली आहे. संस्थेच्या भरभराटीसाठी व विकासासाठी आपले योगदान मिळावे ही…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  देशभर दिवाळी सण साजरा होत आहे तर धरणगाव शहरात देखील दिवाळीची मोठी धामधूम असतांना शहराच्या माजी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांच्या माध्यमातून प्रभाग १ मधील परिसरातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी मिठाई वाटप करण्यात आली आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये माझी प्रभारी नगराध्यक्षा सुरेखाताई विजय महाजन यांच्या वतीने मातंग समाज बांधवाना मिठाई वाटप करतांना विजय भाऊ महाजन मित्र परिवार उपस्थित, होंते संतोष महाजन युवा सेना प्रमुख विशाल महाजन तालुका प्रमुख विध्यार्थी सेना, रामकृष्ण महाजन उप शहर प्रमुख, अविनाश महाजन उप शहर प्रमुख युवा सेना त्याच प्रमाणे प्रविण महाजन, गुलाब महाजन, गोलू महाजन, आणा महाजन, जीवन महाजन,…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील कापूसवडगाव या गावात दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. या प्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे. तर, संतोष दिनकर थोरात (वय 36 वर्ष), दिनकर माणिकराव थोरात (वय 60 वर्ष), रंजना दिनकर थोरात (वय 50 वर्ष) असे आरोपींचे नावं आहे. भारती ही झोपेतून उठत नसुन ती बेशुद्ध अवस्थेत असल्याचा फोन भारतीचा भाऊ ज्ञानेश्वर भगवान कदम यांना आला होता. तसेच, तिला वैजापुरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आग्याच्या ताजगंज येथील एका गेस्ट हाऊसमध्ये एका महिलेवर जबरदस्तीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गेस्ट हाऊसमधून महिलेचा आरडाओरडा ऐकून स्थानिक लोकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिस चौकशीत महिलेने आरोप केला की, तिला गेस्ट हाऊसमध्ये दारू पाजल्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि तिने विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त अर्चना सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी मुख्य आरोपी जितेंद्र राठौरसह त्याचे मित्र रवी राठौर, मनीष कुमार आणि देव किशोर यांना अटक केली आहे. पीडितेची प्रकृती गंभीर असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  दारुच्या नशेत असलेल्या मुलाच्या हातात आईला गावठी कट्टा दिसला. तो कट्टा हिसकवितांना गोळीबार होवून ती तरुणाच्या आईच्या हाताला लागली. यात कलाबाई प्रकाश सोनवणे (वय ६०) या गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास शिवाजीनगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगर परिसरात कलाबाई प्रकाश सोनवणे या सेवानिवृत्त आरोग्य सेविका आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कलाबाई या घरी असतांना त्यांचा मोठा मुलगा रोहीत हा दारुच्या नशेत त्यांना दिसला. त्याच्या हातात गावठी कट्टा असल्याने कलाबाई यांनी तो कट्टा त्याच्या हातातून हिसकविण्याचा प्रयत्न केला. यावेळी गावठी…

Read More