Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव झाल्याच्या रागातून विनोद रघूनाथ सुर्यवंशी यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. ही घटना दि. ८ रोजी सकाळच्या सुमारास जळगाव तालुक्यातील अमोदा गावात घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील अमोदा गावात कल्पनाबाई सुभाष सुर्यवंशी या वात्तस्तव्यास आहेत. त्यांच्या गावात राहणारे विनोद सुर्यवंशी हे ग्रामपंचायत निवडणूक लढवली होती. परंतु निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने दि. ८ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते कल्पनाबाई यांच्या घराजवळ आले. त्यांनी त्यांना माझा ग्रामपंचायत निवडणूकीत तुझ्यामुळे पराभव झालेला आहे. त्यामुळे त्यांनी महिलेला अश्लिल शिवीगाळ केली. तसेच मी तुला जिवंत सोडणार नाही आणि तुझ्या नवऱ्याचा घात…

Read More

जामनेर :प्रतिनिधी  राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले असून जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर पेठ येथील नवनिर्वाचित सरपंच अब्बू तडवी व अन्न महामंडळ सदस्य रामेश्वर पाटील आदी पदाधिकारी यांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी रात्री १० वाजता पहूर ता.जामनेर येथे घडली. या थरार घटनेत १०ते १२ जण बचावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर महामार्गाच्या बाजूला असलेल्या पाटील यांच्या निवासस्थानासमोर अब्बू तडवी व रामेश्वर पाटील हे चर्चा करीत होते. त्याचवेळी एम.एच. १८ बी.जी. ४१४२ क्रमांकाचा मालवाहतूक ट्रक भरधाव वेगाने पदाधिकाऱ्यांच्या दिशेने आला. ट्रकचा वेग संशयास्पद वाटल्याने पाटील यांनी तडवी यांना ढकलत आरडाओरड केली. त्यामुळे उपसरपंच…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक जिल्ह्यात धक्कादायक घटना घडत आहे. यात अनेक महिलासह तरुणाचे मृतदेह आढळल्याच्या देखील घटना घडत असतांना अशीच एक बातमी दिल्लीतील एका हॉटेलमधून समोर आली आहे. एका हॉटेलच्या रुममध्ये विवाहित महिलेसह तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दोघांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने या प्रकरणात तपासाची चक्रे फिरवली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर समोर जी माहिती आली, ती ऐकून पोलिसही चक्रावून गेले. सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा असं मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन मुलांची आई असलेल्या मृत आयशाचे मेरठ येथील रहिवासी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या तरूणाईला सोशल मीडियावरील वेगवेगळे प्लॅटफॉर्म असतील. तसंच रिल्स बनवण्याच मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. पण अशातच काहीनां आपल्या जीवाला मूकावे लागते. तरी या गोष्टीतून धडा न घेता स्टंट करण्याचे तरुण तसेच तरुणी थांबत नाही. अशी एक घटना आगऱ्यातील लखनऊमध्ये घडली आहे. आगऱ्यामधील लखनऊ एक्सप्रेस हायवेवर काही तरुण स्वत:चा जीव धोक्यात टाकून रील्स बनवत होते. याबद्दलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या तरुणांविरोद्धात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि.८ बुधवारी रोजी ही घटना सोशल मीडियावरील इन्टांग्रामवरुन मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. व्हायरल व्हिडीओत आपल्याला दिसत आहे की, लखनऊमधील एका मोठ्या हायवेवर काही…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग मृत्यूचा सापडा बनला असून नेहमीच या महामार्गावर अपघात होत आहे. तर नुकतेच समृद्धी महामार्गावर मेहकरनजिक खाजगी लक्झरी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाला आहे. खाजगी लक्झरी बसचा रस्त्याच्या कडेला उभी असताना मागून येणाऱ्या ट्रकने बसला धडक दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून नागपूरच्या दिशेने गणराज ट्रॅव्हल्सची बस जात होती. सकाळी 5.45 वाजेच्या सुमारास मेहेकरनजिक बसच्या टायरची हवा चेक करण्यासाठी खाली उतरला होता. दरम्यान मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली. यात बस चालक जागीच ठार झाला. तर बस मधीलच एका प्रवाशाचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण 37 प्रवाशी…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक कारागृहातून कैदी फरार होत असल्याच्या घटना आता काही नवीन राहिलेल्या नाही. अशीच एक घटना संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी पलायन केल्याचे उघड झाले आहे. गंभीर गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या या आरोपींनी जेलचे गज तोडले आणि ते फरार झाले. बुधवारी पहाटे पाच वाजता घडलेल्या या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील जेलमध्ये या चार कैद्यांना इतरांसोबत ठेवण्यात आले होते. त्या कारागृहामध्ये मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे तीन पोलीस कर्मचारी बंदोबस्तास होते. राहुल देविदास काळे, रमेश थापा अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र…

Read More

मालेगाव : वृत्तसंस्था मालेगाव जवळील वाशीम येथे तुरीच्या शेतात काम करताना शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज ८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. राजेश भिमराव सौभागे (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सौभागे कुटुंबीय ज्ञानेश्वर वाढणकर यांच्या मालेगाव शेतशिवारातील शेत मक्त्याने करतात. दरम्यान, या शेतातील तुरीमध्ये रोटावेटर फिरविण्यासाठी त्यांनी एम. एच. ३७ एडी – ४९९८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर बोलाविले. यावेळी चालक अंकुश चवरे हा ट्रॅक्टर चालवित असताना राजेश हा ट्रॅक्टरवर बसलेला होता. अचानक त्याचा तोल जाऊन राजेश ट्रॅक्टरवरून कोसळून रोटावेटरमध्ये अडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक अंकुश हा घटनास्थळावरून पळून गेला. अशा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  पार्ट टाइम जॉब देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी टास्क पूर्ण करा, असे सांगत प्रियंका प्रवीण जैन (३२, रा. भुसावळ) यांची पाच लाख ८९ हजार ७९४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. यात नोकरी तर मिळाली नाही, शिवाय हातची रक्कमही गेली. याप्रकरणी निधी व अमित असे नाव सांगणाऱ्या दोघांविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील गृहिणी असलेल्या प्रियंका जैन यांच्याशी १९ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर दरम्यान वेळोवेळी निधी व अमित, अशी नावे सांगणाऱ्या दोघांनी संपर्क साधत त्यांना पार्ट टाइम जॉबचे आमिष दाखविले. त्यासाठी एक टास्क दिला व तो पूर्ण होण्यासाठी खाते रिचार्जच्या नावाने वेळोवेळी रक्कम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. यात महसूलसह पोलीस विभागात मोठय संख्येने कारवाई होत आहे. अशीच एक कारवाई जळगाव शहरात देखील झाली आहे.  जळगाव जिल्हा कारागृहातील कैदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या आईकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना सुभेदार भीमा उखई भिल, पोलिस कर्मचारी पूजा सोपान सोनवणे व हेमलता गयबू पाटील हे धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दि. ८ नोव्हेबर रोजी अडकले. यातील हेमलता पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. मिळालेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी तक्रारदार महिला मुलाला भेटण्यासाठी जिल्हा कारागृहाजवळ आल्या होत्या. त्यावेळी ड्युटीवर असलेले सुभेदार भीमा भिल, पूजा सोनवणे, हेमलता पाटील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाने जिल्ह्यात संयुक्तपणे हातभट्टी दारू निर्मूलन मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेत ७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात १०६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात १०० आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातून २७ लाख ५५ हजार ५५५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम राजकुमार, विभागीय उपायुक्त बी.एच.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात हातभट्टी निर्मिती व वाहतूक करणाऱ्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व पथके, नाशिक विभागीय भरारी पथक (कळवण), तसेच जळगाव पोलीस विभागांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई…

Read More